AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

परभणी लोकसभा : अंतर्गत नाराजीने शिवसेनेला बालेकिल्ल्यातच भगदाड

परभणी : देशभरात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु होत आहे. राज्यातील सर्व लोकसभा मतदारसंघाचा आढावा टीव्ही 9 मराठी घेत आहे. परभणी लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी सतत पाच वेळा शिवसेनेचा खासदार निवडून आलेला आहे. सध्या शिवसेनेचे संजय जाधव हे खासदार असून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे विजय भांबळे यांचा पराभव केला होता. 2014 […]

परभणी लोकसभा : अंतर्गत नाराजीने शिवसेनेला बालेकिल्ल्यातच भगदाड
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:44 PM
Share

परभणी : देशभरात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु होत आहे. राज्यातील सर्व लोकसभा मतदारसंघाचा आढावा टीव्ही 9 मराठी घेत आहे. परभणी लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी सतत पाच वेळा शिवसेनेचा खासदार निवडून आलेला आहे. सध्या शिवसेनेचे संजय जाधव हे खासदार असून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे विजय भांबळे यांचा पराभव केला होता.

2014 साली झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे संजय जाधव यांना 5 लाख 78 हजार 455 मते मिळाली होती. त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे विजय भांबळे यांना 4 लाख 51 हजार 300 मतं मिळाली. या निवडणुकीत संजय जाधव यांचा 1 लाख 27 हजार 155 मतांनी विजय झाला होता.

मतदारसंघांचं समीकरण

परभणी लोकसभा मतदारसंघात एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यापैकी परतूर आणि घनसावंगी हे दोन विधानसभा मतदारसंघ जालना जिल्ह्यात आहेत. परभणी विधानसभा मतदारसंघ गेल्या 25 वर्षांपासून शिवसेनेच्या ताब्यात आहे. येथे सध्या डॉक्टर राहुल पाटील हे आमदार आहेत. त्यांनी एमआयएमचे सज्जूलाला आणि भाजपचे आनंद भरोसे यांचा पराभव केला होता.

गंगाखेड विधानसभा मतदारसंघ हा पूर्वी अपक्ष आमदार सीताराम घनदाट यांच्या ताब्यात होता. मात्र गेल्या निवडणुकीत तेथे राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉक्टर मधूसुदन केंद्रे हे विजयी झाले. त्यांनी माजी आमदार सीताराम घनदाट, उद्योगपती रत्नाकर गुट्टे यांचा पराभव केला होता.

जिंतूर विधानसभा मतदारसंघ गेल्या 25 वर्षांपासून काँग्रेसच्या ताब्यात आहे. येथे रामप्रसाद बोर्डीकर चार वेळा आमदार झाले होते. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजय भांबळे यांनी रामप्रसाद बोर्डीकर यांचा पराभव करत आमदारकी मिळवली.

पाथरी विधानसभा मतदारसंघात यापूर्वी शिवसेनेच्या मीरा रेंगे या आमदार होत्या. मात्र गेल्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार मोहन फड यांनी मीरा रेंगे, बाबाजानी दुर्राणी, सुरेश वरपुडकर यांचा पराभव करत आमदारकी मिळवली.

सध्या या चार विधानसभा मतदारसंघांपैकी शिवसेना एक, राष्ट्रवादी काँग्रेस दोन आणि अपक्ष एक असे आमदार आहेत. तर जालना जिह्यातील परतूर मतदारसंघात भाजपचे बबनराव लोणीकर हे निवडून आले. सध्या ते राज्यमंत्री आहेत. घनसावंगी येथे राष्ट्रवादीचे राजेश टोपे हे आमदार आहेत.

शिवसेनेला बालेकिल्ल्यातच धक्का बसणार?

खरं तर परभणी हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. मात्र 2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये हा बालेकिल्ला घसरण्याची चिन्हं दिसत आहेत. त्याचं कारणही तसंच आहे. गेल्या 25 वर्षांपासून राष्ट्रवादीचे आणि काँग्रेसच्या आपापसात भांडणाचा फायदा शिवसेनेला मिळाला. मात्र या वेळी चित्र वेगळं आहे. परभणी विधानसभेचे शिवसेनेचे आमदार राहुल पाटील हे खुलेआम खासदारांचा विरोध करत आहे. म्हणून खासदार संजय जाधव यांना मोठा फटका बसणार आहे. तर दुसरीकडे गंगाखेड येथील संतोष मुरकुटे माजी शिवसेना उपजिल्हा प्रमुख यांनी खासदारांवर नाराजगी व्यक्त करत पक्षाला जय महाराष्ट्र केला.

शिवसेना आणि भाजपची युती न झाल्यास माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांची कन्या मेघना साकोरे लोकसभेत नशिब आजमवणार आहेत. त्यामुळे हिंदू मतांचं शंभर टक्के विभाजन होईल. खासदार संजय जाधव यांचे गुरू माजी मंत्री सध्या काँग्रेसचे जिल्हा अधक्ष्य आहे. त्यामुळे त्यांनीही जाधव यांच्याकडे आपली पाठ फिरवली आहे. राष्ट्रवादीकडून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेश विटेकर यांच्या नावाची चर्चा सुरू असून आमदार विजय भांबडे हे इच्छुक दिसत आहेत.

संबंधित बातम्या :

कोल्हापूर लोकसभा: विरोधक कुणीही असो, लढत मुन्ना विरुद्ध बंटीच!
रायगड लोकसभा : तटकरेंच्या घराणेशाहीला कंटाळलेले नेतेच राष्ट्रवादीला दगा देणार?
हिंगोली लोकसभा : मोदी लाटेतही निवडून येणाऱ्या राजीव सातवांचा मार्ग खडतर
नागपूर लोकसभा: संघभूमी विरुद्ध दीक्षाभूमी, गडकरींसमोरील आव्हानं काय?
उस्मानाबाद लोकसभा : राष्ट्रवादी जिव्हारी लागलेल्या पराभवाचा बदला घेणार?
माढा लोकसभा : मोदी लाटेतही टिकलेले मोहिते-पाटील पुन्हा गड राखणार?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.