Ahmednagar Lok Sabha Result 2019 : अहमदनगर लोकसभा मतदारसंघ निकाल

Ahmednagar Lok Sabha Result 2019 अहमदनगर लोकसभा मतदारसंघ :  अहमदनगर लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार सुजय विखे यांनी दणदणीत विजय मिळवला. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संग्राम जगताप यांचा पराभव केला. भाजपचे सुजय विखे यांना तब्बल 7 लाख 04 हजार 660 मते मिळाली, तर राष्ट्रवादीच्या संग्राम जगताप यांना 4 लाख 23 हजार 186 मतांवर समाधान मानावं लागलं. सुजय …

Ahmednagar Lok Sabha Result 2019 : अहमदनगर लोकसभा मतदारसंघ निकाल

Ahmednagar Lok Sabha Result 2019 अहमदनगर लोकसभा मतदारसंघ :  अहमदनगर लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार सुजय विखे यांनी दणदणीत विजय मिळवला. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संग्राम जगताप यांचा पराभव केला. भाजपचे सुजय विखे यांना तब्बल 7 लाख 04 हजार 660 मते मिळाली, तर राष्ट्रवादीच्या संग्राम जगताप यांना 4 लाख 23 हजार 186 मतांवर समाधान मानावं लागलं. सुजय विखेंनी तब्बल 2 लाख 81 हजार 474 मतांनी विजय मिळवला.

या ठिकाणी तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला मतदान झालं होतं. यंदा या मतदारसंघात 63 टक्के मतदानाची नोंद झाली. राज्यातील प्रतिष्ठा पणाला लागलेल्या महत्वाच्या मतदारसंघामध्ये अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचा समावेश होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी या मतदारसंघात विशेष लक्ष घातल्याने ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती. त्याला विखे-पवार या जुन्या वादाचीही किनार होती.

अहमदनगर लोकसभा मतदारसंघ

पक्षउमेदवारनिकाल
भाजप/शिवसेनासुजय विखे (भाजप)विजयी
काँग्रेस/ राष्ट्रवादीसंग्राम जगताप (राष्ट्रवादी)पराभूत
अपक्ष/इतरसुधाकर आव्हाड (VBA)पराभूत

शरद पवारांनी या मतदारसंघात तब्बल पाच सभा घेतल्या. तसेच विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनीदेखील मुलाच्या प्रचारसाठी अनेक बैठक घेतल्या. त्यामुळे या मतदारसंघाकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं.  अहमदनगर दक्षिण मतदारसंघ हा खरा तर अघाडीचा बालेकिल्ला. सहकार साखर कारखानदारी, दूध व्यवसाय, शिक्षण संस्था आणि सहकाराचा घट्ट जाळं या मतदारसंघात आहे. मात्र खासदार दिलीप गांधी यांनी गटबाजीचा फायदा घेत भाजपाचं खातं खोललं. गेल्या दोन टर्मपासासून त्यांनी खासदारकी भूषवली.

गेल्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लाटेवर ते तरंगले. मात्र यंदा त्यांची धोक्याची घंटा अनेक दिवसांपासून वाजत होती. शिवाय भाजपमध्येच गांधींना मोठा विरोध सुरू होता. त्यामुळे पक्षांतर्गत गटबाजीचाच दिलीप गांधींना मोठा फटका बसला. अखेर दिलीप गांधींचा पत्ता कट करून राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा चिरंजीव सुजय विखेला भाजपने उमेदवारी दिली. तर शेवटपर्यंत राष्ट्रवादीने ही जागा काँग्रेसला  सोडली नाही. त्यामुळे विखे आणि पवार संघर्ष पुन्हा एकदा दिसून आला.

अहमदनगर दक्षिण मतदारसंघाकडे सुरुवातीपासूनच राज्याचं लक्ष लागले होते. पवारांनी या मतदारसंघात विशेष लक्ष घातल्याने, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील राज्याकडे लक्ष न देता, सुरुवातीला मुलासाठी गुप्त प्रचार केला. नंतर थेट भाजपच्या बैठकांमध्ये सहभाग घेतला. इथे पंतप्रधान मोदींची एक आणि मुख्यमंत्र्यांच्या 3 सभा झाल्या. इथे सुजय विखे विरुद्ध संग्राम जगताप अशी लढत असली तरी प्रतिष्ठा पवार-विखेंची पणाला लागली आहे.

अहमदनगर दक्षिण मतदारसंघ अत्यंत संवेदनशील मतदारसंघ आहे. या मतदारसंघात विधानसभेचे सहा मतदारसंघ येतात. एक खासदार तीन आमदारांसह भाजपचं प्राबल्य आहे.  राष्ट्रवादी तीन आमदारांसह दुसर्‍या स्थानावर तर सेना आणि काँग्रेस  एका आमदारासह तिसर्‍या स्थानी आहे.

सुरवातीला ही निवडणूक विखेंसाठी एकतर्फी वाटत होती. मात्र संग्राम जगताप यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर निवडणूक सोपी न राहता अवघड बनत गेली. संग्राम जगताप यांचा प्रचार उशिरा सुरु झाला. मात्र त्यांनी संपूर्ण जिल्हा पिंजून काढत विखेंसमोर मोठं आव्हान उभे केलं.

विधानसभानिहाय पक्षीय बलाबल

मतदार                       पक्ष               आमदार 

राहुरी –                    भाजप            शिवाजी कर्डीले

शेवगाव – पाथर्डी       भाजप            मोनिका राजळे

कर्जत – जामखेड     भाजप            राम शिंदे

नगर शहर              राष्ट्रवादी           संग्राम जगताप

पारनेर                  शिवसेना             विजय औटी

श्रीगोंदा                 राष्ट्रवादी       राहुल जगताप

अहमदनगर दक्षिण मतदारसंघात भाजपचं वर्चस्व आहे. मात्र खासदार दिलीप गांधींच्या विरोधात मोठ्या प्रमाणात पक्षांतर्गत नाराजी होती. तर गांधी आणि वाद हे समीकरण नेहमीचं आहे.  सहाही मतदारसंघात गांधींना पक्षांतर्गत  विरोध होता. तर सुजय विखेंना पक्षाने उमेदवारी दिल्याने गांधी नाराज होते. मात्र अखेर स्वतः आपल्या मुलासाठी राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलीप गांधीची नाराजी दूर केल्यानंतर गांधी प्रचारात सक्रिय झाले.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *