Jalgaon Lok sabha result 2019 : जळगाव लोकसभा मतदारसंघ निकाल

Jalgaon Lok sabha result 2019 : जळगाव लोकसभा मतदारसंघ निकाल
जळगाव : उन्मेष पाटील

जळगाव लोकसभा मतदारसंघ :  जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपच्या उन्मेश पाटील यांनी बाजी मारली. त्यांनी राष्ट्रवादीच्या गुलाबराव देवकर यांचा पराभव केला.   जळगाव लोकसभा मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला मतदान झालं.  जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपकडून उन्मेश पाटील विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे गुलाबराव देवकर यांच्यात लढत झाली. जळगावातील जळगाव लोकसभा आणि रावेर लोकसभा या मतदारसंघांसाठी 23 एप्रिललाच मतदान झाले. जळगाव लोकसभा मतदारसंघात 56.11 टक्के मतदानाची नोंद झाली. मागील लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत मतदारसंघांत मतदानाचा टक्का दोन टक्क्यांनी घसरला. 2014 मध्ये जळगाव मतदारसंघात 58 टक्के मतदानाची नोंद झाली होती.

जळगाव लोकसभा मतदारसंघ

पक्ष उमेदवारनिकाल
भाजप/शिवसेना उन्मेष पाटील (भाजप)विजयी
काँग्रेस/ राष्ट्रवादी गुलाबराव देवकर (राष्ट्रवादी)पराभूत
अपक्ष/इतर अंजली रत्नाकर बाविस्कर (VBA)पराभूत

जळगाव लोकसभा मतदारसंघात पुरुष मतदार १०,०८,८१८ तर स्त्री मतदार ९,१६,४७०, इतर मतदार ६४ होते. यामध्ये एकूण मतदार १९,२५,३५२ होते. या वेळी मतदान केलेले मतदार पुरुष ५,८४,४६५, स्त्री ४,९५,८१५, इतर १३ असे एकूण १०,८०,२९३ मतदारांनी हक्क बजाविला. या मतदानाची टक्केवारी पुरुष ५७.९४ टक्के, स्त्री ५४.१० टक्के आणि इतर २०.३१ टक्के अशी एकूण ५६.११ टक्के मतदान झाल्याची नोंद आहे.

जळगाव लोकसभा मतदारसंघ अनेक वर्षांपासून भाजपकडे असला तरी अंतर्गत गटबाजीचा परिणाम यावेळी जळगावात भाजपच्या कामगिरीवर होईल असा अंदाज जाणकारांनी सुरुवातीपासून वर्तवला.

भाजपने विद्यमान खासदार ए.टी. पाटील यांचं तिकिट कापल्यानंतर जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्या पत्नी आणि विधानपरिषद सदस्या स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर केली. मात्र, ऐनवेळी त्यांना माघार घ्यायला लावल्यानंतर चाळीसगावचे आमदार उन्मेश पाटील यांना भाजपने उमेदवार झाले. अंतर्गत गटबाजीने अमळनेरच्या मेळाव्यात मंत्री गिरीश महाजनांदेखत हाणामारी झाली. या बाबींचा परिणाम भाजपच्या कामगिरीवर होणार असून त्यामुळे गुलाबराव देवकरांना अधिक संधी असल्याचा अंदाज मतदानापासून वर्तवला गेला.

पण जळगाव मतदारसंघातील उमेदवार उन्मेश पाटील हे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय असून, महाजन यांनी जळगाव मतदारसंघात शर्थीने प्रयत्न केले. तसेच जळगाव मतदारसंघात भाजपचा उमेदवार निवडून येईल असा विश्वास त्यांनी सुरुवातीपासून व्यक्त केला होता.

जळगावमध्ये काँग्रेस भाजपचा विजयरथ रोखू शकलेलं नव्हतं. 2009 आणि 2014 च्या निवडणुकीत इथून ए. टी. नाना पाटील खासदार म्हणून निवडून आले होते.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI