Latur Lok sabha result 2019 : लातूर लोकसभा मतदारसंघ निकाल

Latur Lok sabha result 2019 : लातूर लोकसभा मतदारसंघ निकाल
लातूर : सुधाकरराव श्रंगारे

लातूर लोकसभा मतदारसंघ : लातूर लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यात 18 एप्रिलला मतदान झालं. इथे यंदा 62.19 टक्के मतदानाची नोंद झाली. लातूर लोकसभा मतदारसंघात भाजपकडून सुधाकर शृंगारे, काँग्रेसकडून मच्छिंद्र कामत आणि वंचित बहुजन आघाडीकडून राम  गारकर यांना मैदानात उतरवलं. इथे भाजपने विद्यमान खासदार सुनील गायकवाड यांचं तिकीट कापून सुधाकर शृगांरे यांना तिकीट दिलं होतं. अखेर सुधाकर श्रृंगारे यांनी भरघोस मतांनी बाजी मारली.

पक्षउमेदवारनिकाल
भाजप/शिवसेनासुधाकरराव श्रंगारे (भाजप) विजयी
काँग्रेस/ राष्ट्रवादीमच्छिलिंद्र कामत (काँग्रेस)पराभूत
अपक्ष/इतरराम गारकर (VBA)पराभूत

लातूर लोकसभा हा अनुसूचित जातीच्या उमेदवारासाठी राखीव मतदारसंघ आहे. राजकीय दृष्ट्या उपेक्षित किंवा कमकुवत असलेल्या समूहाला राजकीय आणि सामाजिक प्रवाहात आणून त्यांना नेतृत्व करण्याची संधी देण्यासाठीचा हा मतदारसंघ. मात्र इथे राजकारणाची गणिते निव्वळ पैशांवर होताना पाहायला  मिळतात. इतर लोकसभा मतदारसंघापेक्षा पैशांची लाखो आणि कोटीतली उधळण लातूरच्या लोकांनी जवळून अनुभवली आहेत.  त्यामुळं ज्याच्याकडे सर्वात जास्त पैसा  त्यालाच उमेदवारी, ही पात्रता भाजपा आणि काँग्रेसने इथे राबविली.

मुंबई-पुण्यात राहणारे पण राजकारणासाठी आपलं गाव न विसरणारे उमेदवार यंदा रिंगणात होते.

लातूर लोकसभा मतदारसंघाचा आवाका लक्षात घेतला तर सहा विधानसभा इथे आहेत . ज्यामध्ये 18 लाख 83 हजार 535 मतदार आहेत. त्यापैकी 11 लाख 70 हजार 398 मतदारांनीच मतदान केले आहे. त्यामुळं मतदानाची टक्केवारी 62.19 इतकी झाली.

मतदान सुरळीत करवून घेण्यासाठी २ हजार ७५ केंद्रे उभारण्यात आली होती. तर ३ हजारावर कर्मचाऱ्यांनी ही मतदान प्रक्रिया यशस्वी केली. अहमदपूर तालुक्यातल्या सुनेगाव येथील मतदान केंद्रावर एकही मतदान झालं नाही. इथे साधरणतः 600 मतदार होते. त्यांनी रस्त्याच्या मागणीसाठी बहिष्कार घातला.

प्रचारातल्या  आघाडीचा विचार केला तर भाजपाच्या  जाहीर सभांमुळे ही निवडणूक गाजली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, पियुष गोयल,उद्धव ठाकरे, रामदास आठवले यांच्या सभा भाजपाने आवर्जून घेतल्या. तर काँग्रेसच्या बाजूने म्हणाव्या तशा सभा झाल्या नाहीत. काँग्रेसचा एकही बडा  नेता लातूर लोकसभा मतदारसंघात प्रचाराला बोलावला  गेला नाही.

काँग्रेसकडून आमदार अमित देशमुख हेच प्रामुख्याने प्रचाराची धुरा सांभाळत होते. तर त्यांना शिवराज पाटील चाकूरकर ,दिलीपराव देशमुख,शिवाजीराव पाटील निलंगेकर हे मदत करताना दिसले. भाजपाकडून प्रचाराची पूर्ण यंत्रणा कामगारमंत्री संभाजी पाटील निलंगेकर हे एकहाती सांभाळत होते.

वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड.प्रकाश आंबेडकर यांच्या लातूर,अहमदपूर आणि निंलगा  इथे सभा झाल्या. त्यांच्या सभांना मोठी गर्दी होती. सभेला आलेले लोक त्यांना आर्थिक मदत देण्यासाठी मोठी गर्दी करीत होते. मतही द्या आणि पैसेही द्या अशी जिद्द आंबेडकरी जनतेत यावेळी  दिसली.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI