11 तारखेपर्यंत मागण्या पूर्ण करा, जरांगे यांचे आंदोलन सुरुच, काम झाले तर मुंबईत गुलाल उधळू
मराठा आंदोलन मनोज जरांगे यांनी गेल्या २९ ऑगस्ट पासून सुरु केलेले उपोषण आंदोलन अजूनही मागे घेतलेले नाही. सरकारी शिष्ठमंडळाने गुरुवारी रात्री मनोज जरांगे यांची भेट घेऊन त्यांना प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले. तरीही जरांगे यांचे समाधान झाले नाही आणि त्यांनी ११ तारखेपर्यंत प्रश्न सोडवण्याची मागणी करीत उपोषण सुरुच ठेवण्याचा निर्णय घेतला.

मनोज जरांगे यांनी २९ ऑगस्ट पासून सुरु केलेले उपोषण आंदोलन आज सरकारचे मंत्री उपोषण स्थळी आल्यानंतरही मागे घेतलेले नाही. तुम्हाला मराठ्यासाठी ११ तारखेपर्यत जे काम करायचे ते करा, ११ तारखेपर्यंत आंदोलन काही थांबणार नाही. सरकार १० तारखेची वाट पहायला लावणार नाहीत अशी मला खात्री आहे. काम झाले तर गुलाल टाकायला मुंबईत जाऊ आणि शिरसाठ आणि बावनकुळेंवर जास्त गुलाल टाकू असे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला अल्टीमेटम देत सांगितले आहे.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
