Maharashtra Day 2024 : महाराष्ट्र दिनानिमित्त द्या मराठमोळ्या शुभेच्छा! वाचा एकापेक्षा एक सुंदर मेसेज

आज संपूर्ण राज्यात महाराष्ट्र दिन साजरा केला जात आहे. 1 मे हा दिवस महाराष्ट्र दिन आणि कामगार दिवस म्हणूनही साजरा केला जातो. मराठी भाषा आणि संस्कृतीचे वैभव लक्षात ठेवण्याची आणि राज्याचा समृद्ध वारसा समजून घेण्याची संधी हा दिवस देतो. हा दिवस महाराष्ट्राच्या स्थापना दिनानिमित्त साजरा केला जातो.

Maharashtra Day 2024 : महाराष्ट्र दिनानिमित्त द्या मराठमोळ्या शुभेच्छा! वाचा एकापेक्षा एक सुंदर मेसेज
Follow us
| Updated on: May 01, 2024 | 8:39 AM

आज संपूर्ण राज्यात महाराष्ट्र दिन साजरा केला जात आहे. 1 मे हा दिवस महाराष्ट्र दिन आणि कामगार दिवस म्हणूनही साजरा केला जातो. 1960 साली महाराष्ट्र स्वतंत्र राज्य म्हणून स्थापन झाल्याचा हा दिवस आहे. मराठी भाषा आणि संस्कृतीचे वैभव लक्षात ठेवण्याची आणि राज्याचा समृद्ध वारसा समजून घेण्याची संधी हा दिवस देतो. हा दिवस महाराष्ट्राच्या स्थापना दिनानिमित्त साजरा केला जातो. विशेष म्हणजे आज गुजरात दिवसही आहे.

स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्याच्यानंतर काही काळ गुजरात आणि महाराष्ट्र हे दोन्ही राज्य मुंबई प्रांताचे भाग होते. त्यावेळी या मुंबई प्रांतात मराठी आणि गुजराती भाषकांची संख्या अधिक होती. दोन्ही भाषिकांकडून स्वतंत्र राज्याची मागणी केली जात होती. त्यामुळे भाषावार प्रांतरचनेमुळे गुजरात आणि महाराष्ट्र या दोन वेगळ्या राज्याची घोषणा करण्यात आली. 1 मे 1960 रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला. त्यामुळे 1 मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा केला जातो. तसेच 1 मे हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणूनही ओळखला जातो.

महाराष्ट्र दिनानिमित्त नागरिक एकमेकांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देतात. तुम्ही देखील मेसेजस, कोट्स शेअर करू आपल्या मित्र-परिवारास महाराष्ट्र दिनाच्या खास शुभेच्छा देऊ शकता.

वाचा शुभेच्छा संदेश :
  • आम्हाला अभिमान आहे, महाराष्ट्रीय असल्याचा, आम्हाला गर्व आहे मराठी भाषेचा, आम्ही जपतो आमची संस्कृती, आमची निष्ठा, महाराष्ट्र दिनाच्या मनापासून शुभेच्छा.. जय महाराष्ट्र..!
  • महान संतांची जन्मभूमी, विज्ञानाने जेथे केली प्रगती प्रेम, आदर, स्नेह आणि माणुसकी हीच आहे आमची संस्कृती. महाराष्ट्र दिनाच्या मनापासून शुभेच्छा.. जय महाराष्ट्र..!
  • जन्मलो ज्या मातीस ती माती मराठी… गुणगुणलो जे गीत गीत मराठी… मराठी बांधवांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
  • पुर्नजन्म घेतला तरी महाराष्ट्रात घेईन आणि या मातीत जन्मलेल्या वीरांसारखा शूरवीर होईन… महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
  • मंगल देशा, पवित्र देशा महाराष्ट्र देशा, प्रणाम घ्यावा माझा हा महाराष्ट्र देशा….महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
  • महाराष्ट्राची यशो गाथा, महाराष्ट्राची शौर्य कथा, पवित्र माती लावू कपाळी, धरणी मातेच्या चरणी माथा …जय महाराष्ट्र ! महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
  • महाराष्ट्रदिन चिरायु होवो , सर्वांना मनापासून महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
Non Stop LIVE Update
या जिल्ह्यातील विद्यार्थीन 12 वीत पटकावले 100 %; सांगितला फ्युचर प्लॅन
या जिल्ह्यातील विद्यार्थीन 12 वीत पटकावले 100 %; सांगितला फ्युचर प्लॅन.
संजय शिरसाट म्हणाले, कितीही मोठ्या बापाचा माजलेला लेक असला तरीही…
संजय शिरसाट म्हणाले, कितीही मोठ्या बापाचा माजलेला लेक असला तरीही….
बच्चू कडूंचे सचिन तेंडुलकरला 'हे' 2 पर्याय अन् घरासमोर आंदोलनाचा इशारा
बच्चू कडूंचे सचिन तेंडुलकरला 'हे' 2 पर्याय अन् घरासमोर आंदोलनाचा इशारा.
पिसारा फुलवणाऱ्या मोरासोबत सेल्फी काढलाय? व्हिडीओ बघा, तुम्ही म्हणाल..
पिसारा फुलवणाऱ्या मोरासोबत सेल्फी काढलाय? व्हिडीओ बघा, तुम्ही म्हणाल...
EVM हॅकचा प्रयत्न फसला म्हणून... संजय राऊतांचा भाजपसह आयोगावर हल्लाबोल
EVM हॅकचा प्रयत्न फसला म्हणून... संजय राऊतांचा भाजपसह आयोगावर हल्लाबोल.
झाले Election जपा Relation, मतदान संपताच बॅनरबाजी; ठाण्यात एकच चर्चा
झाले Election जपा Relation, मतदान संपताच बॅनरबाजी; ठाण्यात एकच चर्चा.
राज ठाकरेंचं 'धनुष्यबाणा'ला तर उद्धव ठाकरेंचं पहिल्यांदाच 'पंजा'ला मत
राज ठाकरेंचं 'धनुष्यबाणा'ला तर उद्धव ठाकरेंचं पहिल्यांदाच 'पंजा'ला मत.
मुंबईसह राज्यात 13 जागांवर मतदान, मतदानाचा टक्का घसरला, कोणाला संधी?
मुंबईसह राज्यात 13 जागांवर मतदान, मतदानाचा टक्का घसरला, कोणाला संधी?.
12th Result : 12 वीचा निकाल 93.37 टक्के, दुपारी 1 वाजता असा बघा निकाल
12th Result : 12 वीचा निकाल 93.37 टक्के, दुपारी 1 वाजता असा बघा निकाल.
भाजपचा नीच खेळ, ठाकरे भडकले अन् मुंबईतील मतदानावर भाजपसह आयोगावर आरोप
भाजपचा नीच खेळ, ठाकरे भडकले अन् मुंबईतील मतदानावर भाजपसह आयोगावर आरोप.