AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ashok Kharat Case: शुद्धिकरणाच्या नावाखाली 38 वर्षाच्या महिलेसोबत… भोंदूबाबाचं आणखी एक चीड आणणारं कृत्य आलं बाहेर

Ashok Kharat Case: नवरा बाहेर वाट बघता थांबला आणि खरातने रुमच्या आता शुद्धिकरणाच्या नावाखाली 38 वर्षाच्या महिलेसोबत..भोंदूबाबाचं आणखी एक चीड आणणारं कृत्य आलं बाहेर

Ashok Kharat Case:  शुद्धिकरणाच्या नावाखाली 38 वर्षाच्या महिलेसोबत... भोंदूबाबाचं आणखी एक चीड आणणारं कृत्य आलं बाहेर
Ashok Kharat
| Updated on: Mar 28, 2026 | 12:58 PM
Share

Ashok Kharat Case: राज्यात फक्त एकच विषय चर्चेत आहे आणि तो म्हणजे भोंदूबाबा अशोक खरात… मर्चेंट नेवी कॅप्टनपासून ज्योतिषी झालेल्या खरात याची सगळी काळी प्रकरण हळू हळू समोर येत आहे… याच दरम्यान, एका 38 वर्षीय महिलाने समोर येत भोंदूबाबावर गंभीर आरोप केले आहेत. शुद्धिकरणाच्या नावाखाली भोंदूबाबाने महिलेचं लैंगिक शोषण केल्याचे आरोप आहेत… तर एका उद्योजकाने देखील फसवणुकीचे आरोप केले आहेत… बलात्कार प्रकरणातील आरोपी अशोक खरातची चौकशी करणाऱ्या विशेष तपास पथकाला (एसआयटी) गेल्या पाच दिवसांत, त्याने केलेल्या कथित गुन्ह्यांची माहिती देणारे 50 हून अधिक फोन आले आहेत.

वैवाहिक कलह थांबवण्यासाठी शुद्धिकरण…

स्वयंघोषित धर्मगुरू अशोक खरात याच्या गुन्ह्याची यादी दिवसागणिक मोठी होत जात आहे. अशोक खरात याच्या विरोधात आणखी 2 गुन्हे दाखल केले आहेत. 38 वर्षीय महिलेने भोंदूबाबावर कथित रित्या लैगिंक शोषणाते आरोप केले आहेत. खरातने वैवाहिक कलह टाळण्यासाठी ‘शुद्धीकरण’ विधी करण्याच्या बहाण्याने महिलेच्या पतीला बाहेर थांबायला सांगितलं आणि नंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केला, असा आरोप आहे.

संबंधित प्रकरण, सरकारवाडा पोलीस स्टेशन दाखल करण्यात आलं आहे… असं सांगण्यात येत आहे, महिलेच्या घरात गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरु होते आणि तिच्या पतीने तिला भोंदूबाबा याच्याकडे घेऊन गेला… अशात ‘मानसिक आणि शारीरिक शुद्धिकरणाच्या नावाखाली भोंदूबाबाने महिलेसोबत शारीरिक संबंध ठेवले….’

दुसऱ्या एका प्रकरणात, नेवासा येथील एका उद्योजकाची 2.62 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप आहे. खरातवर आरोप आहे की, त्याने पीडित व्यक्तीच्या व्यवसायात समृद्धी आणेल असा दावा करत, अंगठीमध्ये तथाकथित ‘चिंचोका’ दगड बसवून त्याच्याकडून पैसे घेतलं. व्यापाऱ्याचं नाव राजेंद्र भगवत असं आहे. पण जेव्हा खरात भोंदूबाबा असल्याचं कळल्यानंतर, त्याने पोलिसांत तक्रार दाखल केली. हे अशोक खरात विरोधात दाखल झालेला 11 वा गुन्हा आहे.

5 दिवसांत 50 फोन कॉल… काळ्या कमांचा पर्दाफाश

अशोक खरात प्रकरणी चौकशी करत असलेल्या विशेष तपास पथकाला गेल्या 5 दिवसांपासून 50 पेक्षा अधीक फोन कॉल आहे आहेत. ज्यामध्ये, भोंदूबाबा विरोधात माहिती देण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी शुक्रवारी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र सरकारने नियुक्त केलेल्या एसआयटीने खरातबद्दल माहिती देण्यासाठी किंवा त्याने केलेल्या कोणत्याही गुन्ह्याची तक्रार करण्यासाठी दोन मोबाईल फोन नंबर जारी केले होते. त्या क्रमांकावर आता सतत फोन येत आहे… आतापर्यंत भोंदूबाबा विरोधात 11 गुन्हे दाखल झाले आहेत.

Follow Us
मंगेश चिवटेंच्या उमेदवारीवर शहाजी बापू पाटलांचा यू-टर्न
मंगेश चिवटेंच्या उमेदवारीवर शहाजी बापू पाटलांचा यू-टर्न, विरोध मागे घेऊन प्रचारात सक्रिय
Video: ट्रिपल इंजिन सरकार विरोधात टोळीयुद्ध सुरू - हर्षवर्धन सपकाळ
Video: ट्रिपल इंजिन सरकार विरोधात टोळीयुद्ध सुरू - हर्षवर्धन सपकाळ
8 तास ड्युटी, अन्...; पोलिसांच्या कामाच्या तासांवर राऊतांच फडणवीसांना
Sanjay Raut : 8 तास ड्युटी, अन् 16 तास...; पोलिसांच्या कामाच्या तासांवर संजय राऊतांचं थेट मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र
वर्धा पदवीधर मतदार संघात मविआला मोठा झटका; त्या नेत्याची बंडखोरी करत..
MVA : वर्धा पदवीधर मतदार संघात मविआला मोठा झटका; त्या नेत्याची बंडखोरी करत थेट मैदानात एंट्री
10 बाटल्या भरल्या अन् खळबळ उडाली; विहिरीतून पेट्रोलसदृश ज्वलनशील....
Sangli : 10 बाटल्या भरल्या अन् खळबळ उडाली; विहिरीतून पेट्रोलसदृश ज्वलनशील पदार्थ, व्हिडिओ बघाच
ज्ञानेश कुमारांना दिलासा की पुढे संकट?; सुप्रीम कोर्टाने अंतरिम कारवाई
Gyanesh Kumar Hearing Update : ज्ञानेश कुमारांना दिलासा की पुढे संकट?; सुप्रीम कोर्टाने अंतरिम कारवाई नाकारली, कारण...
लाज आम्हाला नाही, तर...; चित्रा वाघ यांचा रोहित पवारांवर थेट पलटवार
Chitra Wagh vs Rohit Pawar : लाज आम्हाला नाही, तर...; चित्रा वाघ यांचा रोहित पवारांवर थेट पलटवार
MPSC च्या आंदोलनासाठी बारामतीतून गाड्या आणल्या म्हणत थेट व्हिडीओच...
MPSC च्या आंदोलनासाठी बारामतीतून गाड्या आणल्या म्हणत थेट व्हिडीओच दाखवला; रोहित पवारांवर गंभीर आरोप
नवरात्रीचा खर्च कमी करून दुष्काळग्रस्तांसाठी मोठी मदत; 18 लाख...
इतर खर्च कमी करून दुष्काळग्रस्तांसाठी मोठी मदत; 11 लाख देण्याचा निर्णय, भाजप नेत्याचा पुढाकार
बोरिवलीतील सावरकर उद्यानात गुजराती बॅनरवरून मनसेचे आंदोलन, मराठी...
बोरिवलीतील सावरकर उद्यानात गुजराती बॅनरवरून मनसेचे आंदोलन, मराठी-गुजराती मुद्द्यावरून वाद