नाशिक जिल्ह्यात ६१८ माध्यमिक शाळा सुरू, कोरोनामुळे पालक चिंतेत

कोरोनाची (corona) दुसरी लाट ओसरल्यानंतर नाशिक (Nashik) जिल्ह्यात ६१८ माध्यमिक शाळा (Secondary school) सुरू आहेत. मात्र, नियमित निर्जंतुकीकरण आणि कोरोना प्रतिबंधात्मक उपायोजना म्हणाव्या तशा नसल्याने पालकांमध्ये चिंता आहे.

नाशिक जिल्ह्यात ६१८ माध्यमिक शाळा सुरू, कोरोनामुळे पालक चिंतेत
कोरोनामुळे बहुतांश शाळा ऑनलाइन सुरू आहेत.
Follow us
| Updated on: Sep 10, 2021 | 11:26 AM

नाशिकः कोरोनाची (corona) दुसरी लाट ओसरल्यानंतर नाशिक (Nashik) जिल्ह्यात 618 माध्यमिक शाळा (Secondary school) सुरू आहेत. मात्र, नियमित निर्जंतुकीकरण आणि कोरोना प्रतिबंधात्मक उपायोजना म्हणाव्या तशा नसल्याने पालकांमध्ये चिंता आहे. (618 schools started in Nashik district, but parents are worried due to corona)

कोरोनाच्या दोन्ही लाटांनी महाराष्ट्राला हादरवले. गेल्या दोन वर्षांपासून अनेक मुले शाळेत गेले नाहीत. अनेक विद्यार्थी प्ले ग्रुप, अंगणवाडी वगळता थेट पहिलीत जातील. मात्र, अजूनही राज्यात पूर्णतः शाळा सुरू झाल्या नाहीत. दुसरी लाट ओसरल्यानंतर राज्य सरकारने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील ज्या गावामध्ये महिनाभरापासून कोरोना रुग्ण नाही, तेथील शाळा सुरू केल्या जात आहेत. या नियमानुसार नाशिक जिल्ह्यातील 618 माध्यमिक शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. या शाळांमध्ये कोरोनापूर्वीची विद्यार्थ्यांची उपस्थिती ही 1 लाख 7 हजार 285 इतकी होती. मात्र, आता केवळ 62 हजार 165 विद्यार्थी नियमित शाळेत येत आहेत.

पालक उत्सुक नाहीत

राज्य सरकारने शाळा सुरू केल्या असल्या तरी पालक मात्र विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यासाठी उत्सुक नाहीत. अनेक शाळांमध्ये निर्जंतुकीकरण केले जात नाही. कोरोना प्रतिबंधात्मक उपायोजना म्हणाव्या तशा नाहीत. या उपायोजना लागू कराव्यात म्हणून सरकारने आदेशही काढले नाहीत. त्यामुळे पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेमध्ये पाठवण्यासाठी सपशेल नकार दिलेला आहे. त्यामुळे पट संख्येत घसरण झालेली पाहायला मिळते आहे.

मुख्यध्यापकांची कोंडी

एकीकडे शासनाने शाळा सुरू करण्याचे आदेश दिले. मात्र, निर्जंतुकीकरण आणि इतर कोरोना प्रतिबंधात्मक उपायोजनांसाठी निधी दिला नाही. इतकेच काय शाळेत सॅनिटायझर ठेवायचे म्हटले तरी खिशातून पैसे घालावे लागतात. या ढिसाळपणामुळे पालकही विद्यार्थ्यांना पाठवायला तयार नाहीत. त्यामुळे मुख्याध्यापकांची कोंडी झाली आहे. सरकारने कोरोना प्रतिबंधात्मक उपायोजनांसाठी शाळांना थोडा फार निधी दिला, तर यातून मार्ग निघू शकतो.

तिसऱ्या लाटेची भीती

नाशिकमध्ये सध्या रोज कमी कोरोना रुग्ण निघत असले तरी अजूनही तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, त्या पार्श्वभूमीवर नागरिक बिनधास्त फिरताना दिसत आहेत. शहरातील पंचवटी, द्वारका, मुंबईनाका, कॉलेजरोड, गंगापूररोड, अशोकामार्ग, मुख्य बसस्थानक परिसर या भागातही बहुतांश जण नियमांचे पालन करत नाहीत. मास्क हल्ली क्वचितजणच वापरतात. अनेक ठिकाणी गर्दी होते. शहरात विविध आंदोलनेही सुरू असतात. हे पाहता तिसरी लाट आल्यास तिला आवरणे नक्कीच कठीण होणार आहे (618 schools started in Nashik district, but parents are worried due to corona)

इतर बातम्याः

नाशिकमध्ये महापालिका सुरू करणार सीबीएसई शाळा

अहो सोने स्वस्त! गेल्या महिन्याच्या तुलनेत 790 रुपयांची घसरण!!

विघ्नहर्त्या बाप्पांची या मुहूर्तावर करा प्राणप्रतिष्ठा!

Non Stop LIVE Update
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.