आजोबांना घरी न्या, उपचारांचा काही उपयोग नाही, 93 वर्षीय वृद्धाने कोरोनासोबत डॉक्टरांनाही हरवलं

बाबुराव कृष्णाजी सुतार उर्फ आण्णा यांनी वयाच्या 93 व्या वर्षी प्रबळ इच्छा शक्तीच्या जोरावर कोरोनावर यशस्वी मात केली आहे. (old COVID Positive Man recovers)

आजोबांना घरी न्या, उपचारांचा काही उपयोग नाही, 93 वर्षीय वृद्धाने कोरोनासोबत डॉक्टरांनाही हरवलं
वृद्धाची कोरोनावर मात
Follow us
| Updated on: May 11, 2021 | 2:13 PM

कराड : कोरोनाबाधित 93 वर्षीय आजोबांना घरी घेऊन जा, उपचारांचा काही उपयोग होणार नाही, असं सांगून डॉक्टरांनी वृद्धाला घरी पाठवलं. मात्र आजोबांनी घरीच उपचारांना साथ देत प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर कोरोनावर मात केली आहे. सातारा जिल्ह्यातील 93 वर्षीय बाबूराव सुतार यांनी धीर सोडणाऱ्या कोरोनाग्रस्तांसमोर नवा आदर्श ठेवला आहे. (93 Years old COVID Positive Man recovers after Doctor told treatment is meaningless)

सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील मल्हारपेठमध्ये ही घटना समोर आली आहे. कोयना कृषक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि महाराष्ट्र शासनाने सहकार महर्षी पुरस्काराने सन्मानित केलेले बाबुराव कृष्णाजी सुतार उर्फ आण्णा यांनी वयाच्या 93 व्या वर्षी प्रबळ इच्छा शक्तीच्या जोरावर कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

डॉक्टर म्हणाले, आयुष्य काही दिवसांचं

कोरोना झाल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना दवाखान्यात अॅडमिट न करता घरी घेऊन जाण्याचा सल्ला दिला. त्यांचं आयुष्य काही दिवसांचं असून त्यांना खाऊपिऊ घाला. या वयात उपचारांचा काही उपयोग होणार नाही, असे डॉक्टरांनी सांगितले होते.

आजोबा म्हणतात, नव्या युगातील नवा रोग

अण्णांना त्यांच्या कुटुंबीयांनी घरी परत आणले. धीर न सोडता घरीच डॉक्टरांच्या सल्ल्याने फोनवरुन तसेच इतर माहिती घेऊन शक्य ते अनेक उपचार केले. आजोबांनीही या उपचारांना सकारात्मक प्रतिसाद देत कोरोनावर मात केली. हा नव्या युगातील नवा रोग असून एकदम उद्भवतो, त्याचे स्वरुप दिसत नाही. मी प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर वाचलो अशी प्रतिक्रिया आजोबांनी दिली

आजोबांना 5 एप्रिल 2021 रोजी कोरोनाची लागण झाल्याचा रिपोर्ट आला होता. छातीत खूप इन्फेशन होते. हॉस्पिटलमध्ये नेले असता आपण यांना घरी घेऊन जा. घरीच चार पाच दिवस सेवा करा. या वयात उपचारांचा काही उपयोग होणार नाही, असे डॉक्टरांनी सांगितले होते.

घरच्या घरीच उपचार

आजोबांना घरी आणल्यावर श्वास घेताना अडचण होत होती. ताप येऊन घसा दुखत होता. ऑनलाईन पद्धतीने डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार सुरु केला. ऑक्सिजन लेव्हलही कमी होती, म्हणून घरातच ऑक्सिजन मशीन लावले. सर्व उपचार पद्धती केल्यावर एनर्जी सायन्सचे काही विशेष उपाय केले. घरातील वातावरण फ्रेश होण्यासाठी उपाय केले. काही विशेष प्रार्थना केल्या. त्यांच्या उपचारासाठी कुटुंबातील सर्वांनी घेतलेल्या कष्टाचा फळ मिळाल्याची प्रतिक्रिया त्यांचे पुत्र अधिक बाबूराव सुतार यांनी दिली. कोणत्याही वयात प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर कसल्याही संकटावर मात करता येते हेच आजोबांनी दाखवून दिले आहे.

संबंधित बातम्या :

आतापर्यंत 4 वेळा कोरोना पॉझिटिव्ह, एकदा ऑक्सिजनचीही गरज, आता प्लाझ्मा देऊन वाचवतोय लोकांचा जीव!

Positive Story | पुण्यात एकाच कुटुंबातील 21 जणांनी कोरोनाला परतवलं, बाळापासून आजीपर्यंत सर्व ठणठणीत

(93 Years old COVID Positive Man recovers after Doctor told treatment is meaningless)

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.