AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नसरापूर हादरले! चिमुरडीच्या तोंडात मोजा कोंबून क्रूर हत्या; शवविच्छेदन अहवालातून अंगावर शहारे आणणारी माहिती

नसरापूर येथे चार वर्षांच्या चिमुकलीवर 65 वर्षीय व्यक्तीने अत्याचार करुन हत्या केली. त्यानंतर दीड तासामध्ये पोलिसांनी आरोपीला अटक केली. आता पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये समोर आलेल्या माहितीने अंगावर अक्षरश: काटा आला आहे.

नसरापूर हादरले! चिमुरडीच्या तोंडात मोजा कोंबून क्रूर हत्या; शवविच्छेदन अहवालातून अंगावर शहारे आणणारी माहिती
नसरापूर प्रकरणImage Credit source: Tv9 Marathi
| Updated on: May 05, 2026 | 7:40 AM
Share

सध्या राज्यात पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील चार वर्षांच्या चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने संताप व्यक्त केला जात आहे. या हत्येच्या घटनेने माणुसकीला काळीमा फासला आहे. या प्रकरणातील तपासादरम्यान ससून रुग्णालय प्रशासनाने पोलिसांना सोपवलेल्या प्राथमिक शवविच्छेदन अहवालातून अंगावर शहारे आणणारी माहिती समोर आली आहे. 65 वर्षांच्या नराधम आरोपीने या चिमुरडीचा आवाज दाबण्यासाठी आणि तिची निर्घृण हत्या करण्यासाठी तिच्या तोंडात पाय मोजा (Socks) कोंबल्याचे वैद्यकीय तपासणीत निष्पन्न झाले आहे. या क्रूर कृत्यामुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

अहवालात काय समोर आले?

शवविच्छेदन अहवालात नमूद केल्यानुसार, पीडित मुलीच्या शरीरावर आणि विशेषतः छातीवर मारहाणीचे गंभीर वळ उमटले आहेत. आरोपीने केवळ लैंगिक अत्याचारच केला नाही, तर मुलीने प्रतिकार करू नये किंवा तिचा आवाज बाहेर जाऊ नये यासाठी अत्यंत अमानवीय मार्गाचा अवलंब केला. या धक्कादायक खुलाशामुळे पोलिसांवरील तपासाचा दबाव वाढला असून, गुन्हेगाराला कठोरात कठोर शासन करण्यासाठी भक्कम पुरावे गोळा केले जात आहेत.

वाचा: पुणे हादरलं! 4 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्याची कुंडली समोर, पुतणीलाही सोडलं नव्हतं

सोलापूरात मोर्चा

या भीषण घटनेचे पडसाद सोलापूर शहरात तीव्रतेने उमटले आहेत. सोलापूरकर मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले असून शहरातील चौपाड परिसरात एकत्र येत त्यांनी या घटनेचा जाहीर निषेध नोंदवला. निषेध सभेनंतर विठ्ठल मंदिर परिसरातून नवी पेठ मार्गे एक भव्य कॅण्डल मार्च काढण्यात आला. या मूक मोर्चामध्ये सहभागी झालेल्या नागरिकांनी आरोपीला त्वरित फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी आणि महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर धरण्यासाठी आज सकल हिंदू समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात येणार आहेत. गुन्हेगाराला कायद्याचा धाक बसेल अशी शिक्षा व्हावी, हीच भावना सध्या संपूर्ण राज्यभरात व्यक्त होत आहे.

नेमकं प्रकरण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, नसरापूरध्ये ही घटना दुपारी साडेतीन ते चार वाजेच्या सुमारास घडली. मुलगी बेपत्ता झाल्याचे लक्षात येताच कुटुंबीयांनी शोध सुरू केला. दुपारी ४:३० वाजता पोलिसांकडे तक्रार प्राप्त झाली आणि ५:१५ च्या सुमारास पोलिसांनी तातडीने शोधमोहीम राबवली. पोलिसांनी अत्यंत वेगाने हालचाली करत अवघ्या दीड तासात आरोपीला ताब्यात घेतले.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी