AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Osmanabad : लाखोंची गर्दी अन् एकच मागणी, ‘या’ निर्णयावर मराठा समाजाचे मोर्चेकरी ठाम

आरक्षणाच्या मागणीसाठी उस्मानाबादसह मराठवाड्यातून समाजबांधव या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. भर पावसात हा मोर्चा निघाल्याने सर्वाचे लक्ष वेधून घेतले होते.

Osmanabad : लाखोंची गर्दी अन् एकच मागणी, 'या' निर्णयावर मराठा समाजाचे मोर्चेकरी ठाम
कळंब येथील मराठा मोर्चामध्ये सहभागी झालेले मराठा समाज बांधव
| Edited By: | Updated on: Sep 19, 2022 | 3:23 PM
Share

उस्मानाबाद : मराठवाड्यात गेल्या दोन दिवसांपासून चर्चा आहे ती, (Kalamb) कळंब जि. उस्मानाबाद येथे होणाऱ्या मराठा समाजाच्या मोर्चाची. (Reservation) आरक्षणाच्या मागणीसाठी या समाजाने यापूर्वीही (Silent front) मूक मोर्चे काढून देशाचे लक्ष वेधले होते. असे असतानाही समाजाला आरक्षण हे मिळालेले नाही. त्यामुळे पुन्हा हा समाज आक्रमक झाला असून मार्चाच्या माध्यमातून आपल्या मागण्या मांडल्या जाणार आहेत. कळंब येथे पार पडलेल्या मोर्चामध्ये भर पावसात लाखो समाजबांधवांनी हजेरी लावली होती. तर मुस्लिम समाज बांधवांनी केवळ पाठिंबाच दर्शवला नाही तर मोर्चामध्ये सहभागी असणाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागतही केले.

उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब या तालुक्याच्या ठिकाणी मराठा समाजाचा मोर्चा निघाला होता. आरक्षणाच्या मागणीसाठी उस्मानाबादसह मराठवाड्यातून समाजबांधव या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. भर पावसात हा मोर्चा निघाल्याने सर्वाचे लक्ष वेधून घेतले होते.

आरक्षणाच्या मागणीचा मुद्दा पुढे करीत मराठा समाज पुन्हा आक्रमक होत आहे. आता 2 दिवसांचे विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी मोर्चेकरांनी केली आहे. त्यावर सरकार काय निर्णय घेणार हे देखील पहावे लागणार आहे.

आरक्षणबाबत मराठा समाजाच्या पदरी केवळ आश्वासनाशिवाय काहीच पडलेले नाही. आता आरक्षण मिळाल्याशिवाय माघार नाही, असा सूर मराठा समाजबांधवांचा आहे. जर सरकारने वेळकाढूपणा केला तर मात्र, नो आरक्षण नो व्होट अशीच भूमिका घेतली जाणार आहे.

यापूर्वी आरक्षणाच्या मागणीसाठी सबंध राज्यभर जिल्ह्याच्या ठिकाणी मूक मोर्चे निघाले होते. शिवाय आरक्षणाची मागणी करीत काही तरुणांनी आत्महत्या देखील केल्या होत्या. त्यामुळे आता आरक्षण मिळाल्याशिवाय माघार नसल्याचे समाजाचे म्हणणे आहे.

कळंबसारख्या तालुका ठिकाणच्या शहरात हा मोर्चा पार पडला. पाऊस सुरु असतानाही मोर्चेकरांनी माघार घेतली नाही. तर मुस्लिम समाज बांधवांनीही मोर्चाला पाठिंबा तर दर्शवलाच पण सहभागी असणाऱ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. लाखोंच्या संख्येने मराठा समाज बांधव उपस्थित होते.

पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.