कोल्हापुरातल्या मित्रांची कमाल, आता चहा प्यायचा आणि कप खायचा !

कोल्हापुरातल्या मित्रांची कमाल, आता चहा प्यायचा आणि कप खायचा ! (A unique biscuit cup made by three friends from Kolhapur)

कोल्हापुरातल्या मित्रांची कमाल, आता चहा प्यायचा आणि कप खायचा !
आता चहा प्यायचा आणि कप खायचा !
Follow us
| Updated on: Feb 10, 2021 | 4:34 PM

कोल्हापूर : दिवसेंदिवस प्रदूषणाची समस्या वाढत आहे. त्यामुळे आरोग्याच्या समस्या वाढत आहेत. या समस्या दूर करण्यासाठी शासन, सामाजिक संस्था विविध योजना राबवत आहे. मात्र प्रदूषण रोखण्यासाठी सरकारने हाती घेतलेली विशेष मोहिम म्हणजे प्लॅस्टिक बंदी. याच प्लॅस्टिक बंदी मोहिमेला हातभार लागावा म्हणून कोल्हापुरातील तीन मित्रांनी विशेष मोहिम हाती घेतली आणि ती यशस्वीही केली. कोल्हापुरातल्या मित्रांनी चहाच्या प्लॅस्टिक कपला पर्याय उपलब्ध करीत बिस्किट कप तयार केलाय. आता चहा प्यायचा आणि कप खायचा. ऐकून आश्चर्य वाटलं ना ? पण ही किमया साधलीय जगात भारी असलेल्या कोल्हापुरातल्या तीन तरुणांनी. कोल्हापुरातल्या तीन मित्रांनी मिळून पर्यावरण पूरक असा बिस्किट कप तयार केलाय. ज्याची जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे. (A unique biscuit cup made by three friends from Kolhapur)

कसा आहे बिस्किट कप?

चहा आणि कॉफी प्यायल्यानंतर अनेक ठिकाणी सध्या प्लास्टिक कप फेकलेले पाहायला मिळतात. प्लास्टिकला पर्याय म्हणून समोर आलेल्या कागदी कपाचीही नंतर हीच अवस्था झालीय. परिणामी प्रदूषण कमी होण्याऐवजी ते वाढतानाच दिसतेय. याच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी कोल्हापुरातील दिग्विजय गायकवाड, आदेश कारंडे आणि राजेश खामकर या तरुणांनी बिस्किट कपाळाचा पर्याय समोर आणलाय. मैद्यापासून तयार होणाऱ्या या कपातून तुम्ही चहा पिऊ शकता आणि चहा पिऊन झाल्यानंतर किंवा चहा सोबतच कप खाण्याचा देखील अनोखा आस्वाद तुम्ही घेऊ शकता. मॅग्नेट एडीबल कटलरी या ब्रँड खाली हे बिस्किट कप सध्या शहरात अनेक टपर्‍यांवर वापरले जात आहेत. या कपाच्या निर्मितीमागची संकल्पनाही थोडी हटकेच आहे.

लॉकडाऊननंतर नवा स्टार्टअप

लॉकडाऊननंतर नवा स्टार्टअप करण्याच्या हेतूने या तिघांनी कप तयार करण्याच मशीन बाहेरून तयार करून घेतलं. या मशिनची यशस्वी चाचणी झाल्यानंतर गेल्या पंधरा दिवसापासून या बिस्किट कपाची निर्मितीही सुरू झालीय. सुरवातीला कप तयार करताना येणाऱ्या अडचणी आता काही प्रमाणात कमी झाल्यात, शिवाय या कपाची मागणी देखील हळूहळू वाढतेय. पर्यावरण पूरक उद्योग करायच्या हेतूने या तरुणाने आणि तयार केलेल्या नव्या उपक्रमाचं पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासह अनेकांनी कौतुक केलंय. सध्या शहरातील अनेक टपऱ्यांवर हा बिस्कीट कप विक्रीसाठी उपलब्ध आहे. ज्याला ग्राहकांचीही पसंती मिळतेय. (A unique biscuit cup made by three friends from Kolhapur)

इतर बातम्या

भारतात UPI Transactions मध्ये WhatsApp पेमेंट पिछाडीवर, PhonePe, Google Pay ची बाजी

Redmi चा ढासू स्मार्टफोन मार्चमध्ये लाँच होणार, 10 प्रोडक्ट्स मोफत

Non Stop LIVE Update
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.