Redmi चा ढासू स्मार्टफोन मार्चमध्ये लाँच होणार, 10 प्रोडक्ट्स मोफत

शाओमी (Xiaomi) कंपनीने नुकतेच जाहीर केले आहे की, कंपनी मार्च 2021 मध्ये त्यांच्या लोकप्रिय नोट सिरीजमधील स्मार्टफोन लाँच करणार आहे.

Redmi चा ढासू स्मार्टफोन मार्चमध्ये लाँच होणार, 10 प्रोडक्ट्स मोफत
Redmi Note 10

मुंबई : शाओमी (Xiaomi) कंपनीने नुकतेच जाहीर केले आहे की, कंपनी मार्च 2021 मध्ये त्यांच्या लोकप्रिय नोट सिरीजमधील स्मार्टफोन लाँच करणार आहे. कंपनीने बुधवारी ट्विटरवर एक पोस्टर जारी केलं आहे, ज्यामध्ये अशी माहिती देण्यात आली आहे की, शाओमीचा एक मिड रेंज स्मार्टफोन मार्च 2021 मध्ये लाँच केला जाणार आहे. या स्मार्टफोनसोबत कंपनी 10 वेगवेगळे प्रोडक्ट्स देणार असल्याचे बोलले जात आहे. (Redmi Note 10 is coming in March and Xiaomi is giving 10 fans free stuff, here are the details)

कंपनीने जारी केलेल्या टीजरमध्ये या फोनबाबतची कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. असं म्हटलं जातंय की, या फोनमध्ये 120Hz चा डिस्प्ले दिला जाईल. दरम्यान, कंपनीने याबाबतची घोषणा करण्यापूर्वी शाओमी इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक मनू कुमार जैन यांनी सांगितले होते की, MI 10 सिरीजच्या लाँचिंगसह शाओमीच्या चाहत्यांना अजून एक ऑफर दिली जातेय. ग्राहकांना MI 10 सोबत मोफत 10 गुडीज जिंकण्याची संधी दिली जात आहे.

किंमत आणि फीचर्स

या फोनबाबत अधिक माहिती मिळालेली नाही. परंतु मार्चमध्ये जेव्हा हा फोन लाँच केला जाईल तेव्हा हा फोन मार्केटमध्ये धुमाकूळ घालणार आहे, असा आशावाद कंपनीने व्यक्त केला आहे. रेडमी नोट सिरीज कंपनीसाठी नेहमीच फायदेशीर ठरली आहे. शाओमीने नुकतेच रेडमी नोट सिरीजचे 20 कोटीहून अधिक स्मार्टफोन विकले आहेत. या फोनच्या किंमतीबाबत बोलायचे झाल्यास या सिरीजमधील बेस मॉडेलची किंमत 15,000 रुपयांच्या आसपास असेल.

काही लीक्सद्वारे माहिती मिळाली आहे की, रेडमी नोट 10 आणि रेडमी नोट 10 प्रो असे दोन वेरियंट्स लाँच केले जाण्याची शक्यता आहे. या सिरीजमध्ये अजून किती स्मार्टफोन लाँच केले जातील, याबाबतची कोणतीही माहिती कंपनीकडून देण्यात आलेली नाही.

हेही वाचा

अवघ्या 10 मिनिटात तुमचा फोन फुल चार्ज होणार, ढासू चार्जर लाँच होतोय

प्रतीक्षा संपली, Huawei चा फोल्डेबल फोन लाँच होतोय, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

चार कॅमेरे आणि शानदार फिचर्ससह Nokia 5.4, Nokia 3.4 भारतात लाँच, किंमत खूपच कमी

(Redmi Note 10 is coming in March and Xiaomi is giving 10 fans free stuff, here are the details)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI