मावसभावामुळे हिंगणघाट येथील तरुणाच्या आयुष्यात चैतन्य पसरले, मुख्यमंत्र्यांनी दिला आधार
हिंगणघाट येथे राहणाऱ्या करण याच्यावर यकृत प्रत्यारोपणाची शस्रक्रिया यशस्वी झाली आहे.त्याला स्वत: त्याच्या मावसभावामुळे जीवनदान मिळाले आहे. मुख्यमंत्री सहायता निधीची या अवघड शस्रक्रियेसाठी मदत झाली.

आजच्या काळात नातीगोती हे व्यवहारावर टीकली आहेत. मालमत्ता आणि पैशांसाठी सख्खे भाऊ एकमेकांचे वैरी होतात. अशा काळात काही चांगली माणसं आजही आपल्या निर्मळ मन आणि त्यागाने माणूसकीला जीवंत ठेवून आहेत. अशाच प्रकार हिंगणघाट येथे घडला आहे. येथील २५ वर्षीय करण गजानन ठाकरे या तरुणावर मोठे संकट कोसळले. घराचा भार असलेल्या या तरुणाचे यकृत निकामी झाल्याने मोठे संकट ओढवले. कारण यकृत रोपणाशिवाय त्याला वाचवणे कठीण होते. करणला वाचवण्यासाठी यकृत प्रत्यारोपणाशिवाय काहीही पर्याय नव्हता. करण यकृतदान करणारा दाता हवा होता.
या यकृत प्रत्यारोपणासाठी डॉक्टरांनी सुमारे ३० लाख रुपयांचा खर्च सांगितला. हा खर्च पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. करणचे वडील वारलेले, आई आजारी,त्याच्या दोन बहिणींची लग्नं नुकतीच झालेली. तरीही त्या भावावर जीव ओवाळून टाकायला तयार झाल्या. वैद्यकीय कारणांनी त्यांचं यकृत घेणे शक्य नव्हते. त्याचं लग्न झालेले असल्याने त्यांना अनेक अडचणी होत्या. या सर्व त्रास त्याच्याहून वर्षांनी लहान असलेला मावस भाऊ चैतन्य पाहात होता.
पुण्यात हॉस्पिटलमधून ने-आण करणे आणि बहिणींची भावासाठी सुरु असलेली तडफड चैतन्य पाहात होता. त्यामुळे त्याने क्षणाचाही विचार न करता करणला मी माझे यकृत देतो हे डॉक्टरांना सांगितले. हा निर्णय त्याच्या आयुष्याशी खेळणारा होता. परंतू भावासाठी त्याचा त्याग पाहून डॉक्टरही थक्क झाले. अखेर चैतन्य याने रक्ताची नात्यांहून माणूसकी आणि त्याग महत्वाचा आहे. चैतन्य याच्या यकृताचा काही भाग करणला लावण्याचा पर्याय योग्य ठरला.
परंतू अजूनही ऑपरेशनचे पैसे कसे उभे करायचे हे मोठे संकट होतेच. पैशांचे सोंग आणता येत नाहीय अखेर हिंगणघाटच्या भाजप कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री सहायता निधी आणि धर्मादाय मदत कक्षाचे रामेश्वर नाईक यांच्याशी संपर्क साधला. ही त्यागाची हृदयस्पर्शी कहाणी ऐकूण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिला. करणच्या संपूर्ण उपचाराची जबाबदारी मुख्यमंत्री सहायता निधी आणि धर्मादाय मदत कक्ष घेईल असे त्यांनी हॉस्पिटलला कळविले.
खर्चाची जबाबदारी अशी उचलली
अखेर पुणे डेक्कन येथील सह्याद्री हॉस्पिटल येथे शस्त्रक्रियेची तयारी करण्यात आली. हॉस्पिटलने ३० लाखांचा अंदाज दिला होता. त्यापैकी नातेवाईकांनी ५ लाख भरले, मुख्यमंत्री सहायता निधीतून २ लाख दिले गेले आणि उर्वरित २३ लाख धर्मादाय मदत कक्षातून देण्यात आले. यामुळे करणसारख्या सर्वसामान्य घरातील मुलावर ३० लाखांची आधुनिक शस्त्रक्रिया संपूर्णपणे मोफत झाली.
मुख्यमंत्र्यांची संवेदनशील मदत
ऑपरेशन थिएटरमध्ये तासन्तास चाललेली शस्त्रक्रिया अखेर यशस्वी झाली. करणच्या शरीरात चैतन्य याचं यकृत रोवण्यात आलं आणि डॉक्टरांनी दिलासा देत ऑपरेशन पूर्णपणे यशस्वी झाल्याचे सांगितले. करण हॉस्पिटलमधून डिस्चार्ज झाला आहे.रुग्णालयातून बाहेर पडताना त्याने हातवर करून विजयचिन्ह दाखवले. त्याच्या हसऱ्या चेहऱ्यामागे आहे मावसभावाचा त्याग आणि मुख्यमंत्र्यांची संवेदनशील मदत आहे.
