AAP Vs MVA Vs BJP: मुंबईत राजकारणाचा खो खो, आपच्या तक्रारीवर आघाडी सरकारची कारवाई, भाजप टार्गेट!

AAP Vs MVA Vs BJP:  मुंबईत राजकारणाचा खो खो, आपच्या तक्रारीवर आघाडी सरकारची कारवाई, भाजप टार्गेट!
मुंबईत राजकारणाचा खो खो, आपच्या तक्रारीवर आघाडी सरकारची कारवाई, भाजप टार्गेट!
Image Credit source: tv9 marathi

एकीकडे ईडी, सीबीआय आणि आयकर विभागाच्या कारवायांनी आघाडीतील नेते त्रस्त आहेत. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्याने विरोधकांनी त्यांचा राजीनामा मागितला आहे.

भीमराव गवळी

|

Mar 30, 2022 | 4:45 PM

मुंबई: एकीकडे ईडी, सीबीआय आणि आयकर विभागाच्या कारवायांनी आघाडीतील नेते त्रस्त आहेत. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्याने विरोधकांनी त्यांचा राजीनामा मागितला आहे. त्यामुळे आघाडीची चांगलीच कोंडी झालेली असतानाच आता सत्ताधाऱ्यांच्या हातात आयतच कोलीत मिळालं आहे. आम आदमी पार्टीने भाजप नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जोरदार आंदोलन केलं आहे. मुंबै बँक घोटाळ्याप्रकरणी (Mumbai Bank case) आपने (AAP)  ही आंदोलने केली. या प्रकरणी दरेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी करत आपच्या कार्यकर्त्यांनी स्वत:ला अटक करवून घेतली. त्यामुळे दरेकर यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हे आहेत. आघाडी सरकारनेही आपच्या तक्रारीची गंभीर दखल घ्यायला सुरुवात केली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात राज्याच्या राजकारणाला वेगळं वळण लागण्याची चिन्हे दिसत आहेत.

दरेकरांचा राजीनामा का घेत नाही?

दरम्यान, आपच्या कार्यकर्त्यांनी आज जोरदार आंदोलन केलं. पोलिसांनी आमचे कपडे फाडले आहेत, आम्हाला मारलं आहे. पोलीस दडपशाही करत आहेत, असा आरोप यावेळी आपच्या कार्यकर्त्यांनी केला. तसेच भाजपला जरा जरी लाज उरली असेल तर मुंबईला लुटणाऱ्या प्रवीण दरेकरांचा राजीनामा घ्यावा, अशी तिखट प्रतिक्रिया यावेळी आपच्या कार्यकर्त्यांनी दिली आहे. तसेच प्रवीण दरेकरांचा जोपर्यंत राजीनामा घेणार नाही, तोपर्यंत आम्ही शांत होणार नाही. पंतप्रधान मोदी बोलतात. ना खाऊंगा, ना खाने दुंगा, मग प्रवीण दरेकरांचा राजीनामा का घेत नाही? असा सावल यावेळी आपच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. हे आंदोलन आता फक्त सुरू झालं आहे. असाही इशारा आपने दिला आहे. तसेच राष्ट्रवादीचा दरेकरांना पाठिंबा असल्याचा आरोपही आम आदमी पार्टीने केला आहे.

आपचा आरोप काय?

“प्रवीण दरेकर हे कामगार संस्थेचे सभासद होण्यासाठी पात्र नाहीत आणि तरीही त्यांनी मुंबै बँकेच्या संचालकपदासाठी कामगार मतदारसंघातून अर्ज भरला. ते बँकेचे अध्यक्ष झाले आणि त्यांनी 2011 ते 2021 अशी 10 वर्ष संचालकपद भूषवले” असा आरोप सहकारी संस्था, मुंबईच्या सहनिबंधकांनी दिलेल्या आदेशाच्या आधारे आप नेते धनंजय शिंदे यांनी केला सहकार विभागाच्या चौकशी अहवालात असे दिसून आले आहे की, प्रतिज्ञा मजूर सोसायटीची नोंदणी 1994 साली झाली आणि तीन वर्षांनंतर दरेकर हे तिचे सभासद झाले, परंतु सहकार विभागाने केलेल्या तपासणीत त्यांच्या सभासदत्वाची नोंद उपलब्ध झाली नाही. “मुसळधार पावसात नोंदी खराब झाल्या, असे कारण सांगण्यात आल्याचे न्यायालयाने नमूद केले होते.

“तपासणीत पुढे असे दिसून आले की संबंधित सोसायटीकडे कामाच्या वितरणाचे रजिस्टर नव्हते. एप्रिल 2017 मध्ये 30 दिवस, नोव्हेंबर 2017 मध्ये 20 दिवस आणि डिसेंबर 2017 मध्ये 10 दिवस हजेरी दाखवून दरेकर यांना कामगार म्हणून कामासाठी 25 हजार 750 रुपयांची रक्कम रोख स्वरुपात देण्यात आली. अर्जदाराने पर्यवेक्षक म्हणून रजिस्टरवर स्वाक्षरी केली आहे. गुन्ह्यात अर्जदाराचा सहभाग दर्शवण्यासाठी प्रथमदर्शनी साहित्य (prima facie material)आहे. ते कथित गुन्ह्यात थेट लाभार्थी आहेत” असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले होते.

आप आणि तक्रारी

  1. यापूर्वी आपने भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्याविरोधात विधान परिषद सभापती, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली होती. मुंबै बँक प्रकरणी लाड यांनी फसवणूक केल्याचा आरोप आपने केला आहे. मुंबै बँकेच्या 2021-2026 या पंचवार्षिक निवडणुकीसाठीच्या मतदार यादीनुसार प्रसाद लाड हे ‘क्रिस्टल कर्मचारी सहकारी संस्था मर्यादित’ या संस्थेतर्फे मतदार आहेत. लाड हे उद्योजक आहेत. ते पगारदार नोकर नाहीत. तरीही ते या वर्गातून निवडून कसे येतात असा सवाल आपने केला होता.
  2. एप्रिल 2021मध्ये आम आदमी पार्टीने नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांच्या विरोधातही तक्रार नोंदवली होती. कोरोनाच्या संकटात वीज कनेक्शन तोडल्यामुळे राऊत आणि महावितरणचे मुख्य अभियंता, सहायक अभियंत्याविरोधात तक्रार नोंदवली होती.
  3. डिसेंबर 2021मध्ये आपने जनसुराज्य पक्षाचे नेते विनय कोरे यांच्या चौकशीची मागणी केली होती. महापौरपदाच्या निवडणुकीत नगरसेवकांना प्रत्येकी 35-35 लाख रुपये दिल्याचा दावा कोरे यांनी केला होता. त्यामुळे आपच्या पदाधिकाऱ्यांनी लाचलूचपत प्रतिबंधक विभाग आणि वडगाव पोलीस ठाण्यात कोरे यांच्याविरोधात तक्रार केली होती.
  4. 300 युनिटच्या खाली आलेल्या वीजबिलात 30 टक्के कपात करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवडणूक जाहीरनाम्यातून केलं होतं. हे वचन पूर्ण करण्यात आलं नाही असं सांगत आपने नागपूरच्या बर्डी पोलीस ठाण्यासह इतर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. मुख्यमंत्र्यांनी आमची फसवणूक केल्याचा दावा यावेळी करण्यात आला होता.

संबंधित बातम्या:

AAP In Mumbai: गली गली मे शोर है, बीजेपीवाले चोर है, दरेकरांच्या राजीनाम्यासाठी ‘आप’नं मुंबई दणाणून सोडली

मद्यधुंद फेरीवाल्याची पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण, आंबिवली स्थानकातील धक्कादायक प्रकार

Maharashtra News Live Update : महाविकास आघाडी सरकार किमान समान कार्यक्रमावर चालतंय : मनीषा कायंदे

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें