AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ती मुले भ्रष्टाचार करतील की… वांगचुक यांच्या त्या व्हिडिओवर अभिजीत दिपकेंचे मोठे विधान

Abhijit Dipke : सोनम वांगचुक यांनी अभिजीत दीपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांच्याबाबत मोठे विधान केले होते. आता यावर अभिजीत दिपके यांनी भाष्य केले आहे.

ती मुले भ्रष्टाचार करतील की... वांगचुक यांच्या त्या व्हिडिओवर अभिजीत दिपकेंचे मोठे विधान
Abhijit Dipke on Wangchuk statementImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Aug 30, 2026 | 7:43 PM
Share

सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षण सुधारक सोनम वांगचुक यांनी ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) शी संबंधित तीन प्रमुख नेते अभिजीत दीपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांच्याबाबत मोठे विधान केले होते. एका पॉडकास्टमध्ये वांगचुक यांनी म्हटले होते की, या नेत्यांमध्ये राजकीय महत्त्वाकांक्षा आहे आणि भविष्यात ते भ्रष्ट होणार नाहीत, याची कोणतीही हमी देता येणार नाही. मात्र, त्यांनी हेही स्पष्ट केले की राजकीय महत्त्वाकांक्षा असणे ही स्वतःमध्ये चुकीची गोष्ट नाही. आता वांगचुक यांच्या या विधानावर अभिजीत दिपके यांनी भाष्य केले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे. त्यांना सोनम वांगचुक यांनी केलेल्या भ्रष्टाचाराबाबत केलेल्या विधानाबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बोलताना दिपके यांनी म्हटले की, सोनम वांगचुक म्हणाले ही मुलं भ्रष्टाचार करतील असं वाटत नाही. मुलांनी आतापर्यंत केलेलं काम चांगलं आहे असं ते म्हणाले. तुम्ही एडिटेड क्लिप बघू नका.’

नेमकं काय म्हणाले होते वांगचुक ?

सोनम वांगचुक म्हणाले होते की, ‘या लोकांचा राजकीय पक्षाशी जोडलेला भूतकाळ राहिला आहे. सुरुवातीला काही लोकांकडून हे प्रश्न उपस्थित केले जात होते की, हे लोक नेमके कुठून आले आहेत? त्यांनी सांगितले की, हे लोक यापूर्वी आम आदमी पक्षाशी जोडलेले होते. मात्र, वांगचुक यांनी स्पष्ट केले की, एखाद्या व्यक्तीच्या राजकीय भूतकाळाबाबत ते फारसे प्रश्न उपस्थित करत नाहीत. कोणत्याही राजकीय पक्षाशी जोडलेले असणे हे स्वतःमध्ये चुकीचे नाही.

राजकीय महत्त्वाकांक्षा आहे…

वांगचुक यांना विचारण्यात आले की, या नेत्यांमध्ये राजकीय महत्त्वाकांक्षा आहे का? यावर त्यांनी होकारार्थी उत्तर दिले. सोनम वांगचुक म्हणाले की, जेव्हा त्यांनी या लोकांना जवळून पाहिले आणि त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांच्यामध्ये राजकीय महत्त्वाकांक्षेची चिन्हे दिसून आली. मात्र यामध्ये काहीही गैर नाही. ते काही संत नाहीत की, ज्यांनी सर्वस्वाचा त्याग केला आहे आणि त्यांना राजकारणातून काहीही मिळवण्याची इच्छा नाही. त्यामुळे भविष्यात ते भ्रष्ट होणार नाहीत, याची कोणतीही हमी देता येणार नाही. राजकीय महत्त्वाकांक्षा असणे स्वाभाविक आहे आणि त्यात काहीही चुकीचे नाही.

Follow Us
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम