AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता नवा मंत्री अभिजीत दिपकेच्या टार्गेटवर, आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेताच नवा प्लान

नाशिकमध्ये विद्यार्थ्यांचं गेल्या 12 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. मात्र त्यांच्या मागण्यांकडे अजूनही दुर्लक्ष केलं जात आहे. असं असताना कॉक्रोज जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी उपोषणस्थळी जाऊन आंदोलकांची भेट घेतली. तसेच त्यांच्या मागण्यांवरून थेट मंत्र्यांना टार्गेटवर घेतलं.

आता नवा मंत्री अभिजीत दिपकेच्या टार्गेटवर, आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेताच नवा प्लान
आता नवा मंत्री अभिजीत दिपकेच्या टार्गेटवर, आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेताच नवा प्लान Image Credit source: TV9 Network
| Updated on: Sep 03, 2026 | 9:28 PM
Share

नाशिकमध्ये गेल्या 12 दिवसांपासून विविध मागण्यांसाठी विद्यार्थ्यांचं उपोषण सुरू आहे. मात्र असं असूनही सरकारने या आंदोलनाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. आता या आंदोलनाची दखल कॉक्रोज जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी घेतली आहे. अभिजीत दिपके यांनी उपोषण स्थळी जाऊन सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं. यावेळी त्यांनी आंदोलक विद्यार्थ्यांना आदिवासी विकासमंत्र्यांच्या राजीनाम्याबाबत थेट प्लान सांगून टाकला. अभिजीत दिपके म्हणाले की, ‘आदिवासी विकासमंत्र्याचा राजीनामा मुंबईला जाऊन मागावा. मुंबई इथून लांब आहे.’ आता थेट मुंबईत जाऊन आंदोलन करण्याची वेळ आल्याचं अभिजीत दिपके यांनी आंदोलकांना सांगितलं आहे.  विद्यार्थी गेल्या 12 दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. मात्र सरकारने दखल घेतली नसल्याने अभिजीत दिपके यांनी संताप व्यक्त केला. इतकंच काय तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही खडे बोल सुनावले.

मंत्री इथे आले होते ते करमध्ये बसून हसत गेले.  मंत्री साहेबांच्या मुलाला सर्प दंश झाला असता तर हसत गेले असते का? असा सवालही अभिजीत दिपके यांनी केला.  इतकंच काय तर आदिवासी विकास मंत्र्यांना त्यांनी रडारवर घेतलं. हे  जेवण तुमच्या मुलांना खाऊ घालणार का? असा प्रश्नही केला.   एवढा करोडोचा निधी येतो तो जातो कुठे?  यांची पोट भरत नाही मग कुणाची भारतात? ग्रामीण भागातील शाळांसाठी निधी येतो जातो कुठे? याचे उत्तरही अभिजीत दिपके यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागितलं.

कोणत्या सरकारी शाळेत एडमिशनसाठी रांगा लागत नाही, असं का होत असावं असा प्रश्नही त्यांनी या निमित्ताने उपस्थित केला.  आश्रम शाळेत जाऊन 75 टक्के प्रवेश आहे का दाखवा? तुमच्या मुलांना परदेशात पाठवता, आता हे मुले त्यांचा अधिकार मागत आहे.  तुमच्या मुलांना 5 स्टार हॉटेलचे जेवण येथे या मुलांचे काय या मुलांचा जीव नाही का?   दार नसलेले वॉशरूम मंत्र्यांचे मुले वापरतील का? मुख्यमंत्री तुमच्या विदर्भात जाऊ आणि ५० आश्रम शाळा दाखवा चांगल्या आहेत का? असा प्रश्नांचा भडीमार केला.

Follow Us
जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
Manoj Jarange Hunger Strike | जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर...
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर तीव्र आंदोलन, असं काय घडलं?
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत...
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत नेमकं काय घडलं?
तोडगा निघणार? मनोज जरांगेंना भेटण्यापूर्वी शिष्टमंडळाची अभ्यासक...
तोडगा निघणार? मनोज जरांगेंना भेटण्यापूर्वी शिष्टमंडळाची अभ्यासकांसोबत सविस्तर चर्चा
भिवंडी पालिकेत महत्त्वाची बैठक, नगरसेविका कँडी क्रश खेळण्यात मग्न
भिवंडी पालिकेत महत्त्वाची बैठक, नगरसेविका कँडी क्रश खेळण्यात मग्न
36 Jilhe 50 Batmya | 36 जिल्ह्यांतील 50 महत्त्वाच्या बातम्या;
36 जिल्ह्यांतील 50 महत्त्वाच्या बातम्या; मराठा आंदोलनासह राज्यात मोठ्या घडामोडी, जाणून घ्या एका क्लिकवर
दादांच्या जाण्याचं दुःख माझ्यापेक्षा जास्त कुणाला असणार- सुनेत्रा पवार
दादांच्या जाण्याचं दुःख माझ्यापेक्षा जास्त कुणाला असणार' सुप्रिया सुळेंचे नाव घेत सुनेत्रा पवार म्हणाल्या...
बोरीवलीतील दहीहंडी महोत्सवासाठी जय्यत तयारी; सेलिब्रिटी आणि राजकीय...
बोरीवलीतील दहीहंडी महोत्सवासाठी जय्यत तयारी; सेलिब्रिटी आणि राजकीय नेत्यांची असणार मांदियाळी
ठाण्यातील संकल्प प्रतिष्ठानच्या २१व्या दहीहंडी उत्सवाची तयारी सरु
आमदार रवींद्र फाटक यांनी केली ठाण्यातील २१व्या संकल्प प्रतिष्ठान दहीहंडी महोत्सवाची घोषणा
विद्यानंद बापट यांच्या डीजेविरोधी भूमिकेला पालकांचा पाठिंबा;
विद्यानंद बापट यांच्या डीजेविरोधी भूमिकेला पालकांचा पाठिंबा; हल्ल्याचा निषेध करत केली मोठी मागणी