मराठ्यांनो अर्ज करा, आडनाव सेम असेल तर… शिष्टमंडळ भेटताच जरांगेंचा थेट आदेश, ती मागणी मान्य
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जालन्यातील आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केले आङे. या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. आज राधाकृष्ण विखे पाटील, प्रसाद लाड, उदय सामंत या सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली.

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जालन्यातील आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केले आङे. या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. आज राधाकृष्ण विखे पाटील, प्रसाद लाड, उदय सामंत या सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. यावेळी मनोज जरांगे पाटलांनी शिष्टमंडळाशी चर्चा केल्यानंतर मराठा समाजाला उद्यापासून कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज करम्याचे आवाहन केले आहे. तर विखे पाटलांनी अर्ज करण्यास अडचण येत असेल तर अधिकाऱ्यांना भेटा असं आवाहन मराठा समाजाला केले आहे.
काय म्हणाले जरांगे पाटील?
शिष्टमंडळाच्या भेटीनंतर बोलताना जरांगे पाटलांनी म्हटले की, हैदराबाद गॅझेटनुसार जी संख्या आहे, त्याप्रमाणे तुम्हाला प्रमाणपत्र देण्यात यावीत. तुम्ही प्रमाणपत्र द्याल, पण व्हॅलिडिटी कशी देणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे. कारण SOP वंशावळ मागते आणि ती वंळावळ मान्य केली जात नाही. नाते, रक्ताचे नाते आणि कुळ याप्रमाणे प्रमाणपत्र देण्यास शिष्टमंडळाने मान्यता दिली आहे.
उद्यापासून अर्ज करा
पुढे बोलताना जरांगे पाटलांनी म्हटले की, उद्यापासून मराठवाड्यातील मुलांनी अर्ज करावेत. रक्तातले नाते, सेम आडनाव असेल तर अर्ज करा. नसेल तर तुमचं कुळ एक आहे का ते पहा. कुळानुसार अर्ज करा. तुम्ही नाते संबंधातील आहेत का पहा आणि उद्यापासून अर्ज करा. त्यानंतर आपण सरकारला व्हॅलिडीटी आणि प्रमाणपत्र मागू. नाही निघाल्यानंतर त्यांना SOP मध्ये बदल करायला सांगू. दोन दिवसात काय परिस्थिती आहे ती समोर येईल.
अर्ज स्वीकारले नाही तर इथे या…
जरांगे पाटलांनी पुढे बोलताना म्हटले की, तुमचे अर्ज स्वीकारले नाही तर तुम्ही पुन्हा इथे या. मी यांना फोन करून सांगतो की अर्ज नाही घेतले. यावर बोलताना विखे पाटलांनी म्हटले की, गॅझेटनुसार तुम्ही अर्ज केले आणि अर्ज नाही घेतले तर जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करा. यामुळे तुम्हाला काही अडचण येणार नाही. त्यानंतर कलेक्टर संबंधित अधिकाऱ्यांना सांगून कार्यवाही करतील. यामुळे तुम्हाला धावपळ करण्याची गरज नाही.
