AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मराठी मुद्दा होता है क्या, फालतू बाते करते है…’, अबू आझमी नेमकं काय म्हणाले?

राज्यात सध्या मराठीच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलंच तापलं आहे, यावर आता सपा नेते अबू आझमी यांनी प्रतिक्रिया देताना मोठं वक्तव्य केलं आहे.

'मराठी मुद्दा होता है क्या, फालतू बाते करते है...', अबू आझमी नेमकं काय म्हणाले?
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 22, 2025 | 2:54 PM
Share

राज्यात पहिलीपासून हिंदी भाषा शिकवण्याच्या निर्णयानंतर मराठी भाषेचा मुद्दा आता चांगलाच तापला आहे, पहिलीपासून हिंदी भाषा नको यासाठी जोरदार विरोध होत आहे. वातावरण चांगलंच तापलं आहे. याविरोधात मनसे मैदानात उतरल्याचं दिसून येत आहे. यावर  प्रतिक्रिया देताना आता सपा नेते अबू आझमी यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. ‘मराठी क्या मुद्दा होता है क्या, फालतू बाते करते है’ महाराष्ट्रात राहतात ते सर्व मराठीवर प्रेम करतात. कोणाचीच मराठी सोबत नफरत नाही. एक भाषा अशी असली पाहिजे कश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत याचा सन्मान झाला पाहिजे. एक राज्यातल्या भाषेचाही सन्मान झाला पाहिजे,’ असं अबू आझमी यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले अबू आझमी?

‘मराठी क्या मुद्दा होता है क्या, फालतू बाते करते है’ महाराष्ट्रात राहतात ते सर्व मराठीवर प्रेम करतात. कोणाचीच मराठी सोबत नफरत नाही. एक भाषा अशी असली पाहिजे कश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत याचा सन्मान झाला पाहिजे. एक राज्यातल्या भाषेचाही सन्मान झाला पाहिजे, असं आझमी यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की,  संसदेत एक कमिटी आहे भाषेच्या नावावर 45 मेंबर आहेत ते भारतभर जाऊन हिंदीतून काम करण्यासाठी प्रोत्साहित करतात. केंद्र सरकारचे पूर्ण काम हिंदीतून असतं. महाराष्ट्रात जर तीन भाषा असतील तर सगळ्यात पहिल्यांदा मराठी असली पाहिजे. दुसरी भाषा हिंदी आणि त्यानंतर इंग्लिश असायला पाहिजे. महाराष्ट्रात जर तिसरी भाषा हिंदी नसेल तर तुम्हीच सांगा कोणती भाषा पाहिजे? असा सवालही यावेळी आझमी यांनी उपस्थित केला आहे.

मनसे, ठाकरे गट युतीच्या चर्चेवर प्रतिक्रिया 

दरम्यान सध्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती होणार असल्याची देखील जोरदार चर्चा सुरू आहे, यावर देखील आझमी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते एकाच घरात जन्माला आले असतील तर सोबत राहातील, त्यात आम्हाला आनंद आहे. राज ठाकरेंची काही ताकद नाही, ते फक्त नफरतचं राजकारण करतात. दररोज  उत्तर भारतीयांविरोधात आणि हिंदी विरोधात बोलणं हाच त्यांचा धंदा आहे, अस आझमी यांनी म्हटलं आहे.

Follow Us
सावित्रीबाईंनीही हेच...; चाकणकरांच्या त्या वक्तव्यावर ठोंबरे भडकल्या
Rupali Chakankar : सावित्रीबाईंनीही हेच सहन केलं होतं; रुपाली चाकणकरांच्या त्या वक्तव्यावर रुपाली ठोंबरे भडकल्या, म्हणाल्या कोणी लिपस्टिक लावली म्हणजे ...
शरद पवारांचे विद्या प्रतिष्ठानमध्ये रोबोटने केले अनोखे स्वागत, व्हिडीओ
शरद पवारांचे विद्या प्रतिष्ठानमध्ये रोबोटने केले अनोखे स्वागत, व्हिडीओ आला समोर
निवडणूक आयुक्तांना तात्काळ तुरुंगात टाका, त्यांनी... उद्धव ठाकरे मागणी
निवडणूक आयुक्तांना तात्काळ तुरुंगात टाका, त्यांनी... उद्धव ठाकरे यांची मोठी मागणी
गौतमी पाटीलचा डान्स अन् एकच जल्लोष; बड्या नेत्याच्या मुलाचा...
गौतमी पाटीलचा डान्स अन् एकच जल्लोष; बड्या नेत्याच्या मुलाच्या वाढदिवसाचा व्हिडिओ व्हायरल
मुख्यमंत्र्यांचा दुष्काळी स्थिती पाहणी दौरा, वडेट्टीवार काय म्हणाले?
Vijay Wadettiwar : मुख्यमंत्र्यांचा दुष्काळी स्थिती पाहणी दौरा, अन् विजय वडेट्टीवार काय म्हणाले?
उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदेंबद्दल कोर्टाचा मोठा निर्णय, 17 वर्षांपासून....
Vasant Davkhare Case : 17 वर्षांपासून सुरू असलेल्या मानहानी प्रकरणाचा निकाल! उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदेंबद्दल कोर्टाचा मोठा निर्णय....
फडणवीस यांचा लातूरमध्ये दुष्काळ पाहणी दौरा; शेतकरी बांधवांना...
Latur Drought : मुख्यमंत्री फडणवीस यांचा लातूरमध्ये दुष्काळ पाहणी दौरा; शेतकरी बांधवांना काय दिला शब्द?
शेतकऱ्यांना जास्तीत-जास्त मदत करू... पाहणी दौऱ्यादरम्यान फडणवीसांचं
शेतकऱ्यांना जास्तीत-जास्त मदत करू... पाहणी दौऱ्यादरम्यान CM फडणवीसांचं शेतकऱ्यांना आश्वासन
मुख्यमंत्री थेट शेताच्या बांधावर; शेतकऱ्यांन फोडला हंबरडा, काय घडलं?
CM Fadnavis At Latur : मुख्यमंत्री थेट शेताच्या बांधावर; शेतकऱ्यांन फोडला हंबरडा, काय घडलं?
सणासुदीआधी शेतकऱ्यांसाठी मोठी मागणी; राणा जगजीतसिंह पाटील...
सणासुदीआधी शेतकऱ्यांसाठी मोठी मागणी; राणा जगजीतसिंह पाटील मुख्यमंत्र्यांना काय म्हणाले?