AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ambadas Danve: ओमराजे निंबाळकरांचं आव्हान स्वीकारलं… अंबादास दानवे धाराशिवमधून खासदारकीची निवडणूक लढणार? शिंदे सेनेला मोठा इशारा

Ambadas Danve on Omraje Nimbalkar: आता ठाकरे सेना खासदार ओमराजे निंबाळकरांच्या विरोधात उतरली आहे. अंबादास दानवे यांनी नुकतेच शिंदे सेनेत दाखल झालेल्या खासदार ओमराजे निंबाळकरांना मोठा इशारा दिला आहे.

Ambadas Danve: ओमराजे निंबाळकरांचं आव्हान स्वीकारलं... अंबादास दानवे धाराशिवमधून खासदारकीची निवडणूक लढणार? शिंदे सेनेला मोठा इशारा
अंबादास दानवे, ओमराजे निंबाळकर
| Updated on: Sep 26, 2026 | 12:27 PM
Share

श्रीराम क्षीरसागर, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी : शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी नुकतेच शिंदे सेनेत सामील झालेल्या खासदार ओमराजे निंबाळकर विरोधात लढण्याचा इशारा दिला आहे. पक्षाने सांगितलं तर धाराशिव मधून निवडणूक लढवणार, महाराष्ट्रात कुठूनही निवडणूक लढू शकतो. ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. यापूर्वी निंबाळकर यांनी दानवे यांच्यावर जळजळीत टीका केली होती. 2029 ला धाराशिवमधून निवडणूक लढवण्याचं आव्हान त्यांनी दिले. एकदा जनतेतून निवडणूक लढवावी म्हणजे स्वतःची लायकी कळेल, अशी टीका त्यांनी केली. काही लोकांना काहीच काम नाही, उठायचं आणि सोशल मीडियावर पोस्ट करायची, असा टोला निंबाळकरांनी लगावला होता. त्याला आता दानवे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

दोन दिवसात आठ जिल्ह्यांचा दौरा

आदित्य ठाकरे हे दोन दिवसात आठ जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत. आदित्य ठाकरे हे बांधावर जाऊन शेतकर्‍यांच्या भेटी घेऊन त्यांना दिलासा देणार आहेत. 1972 च्या दुष्काळापेक्षा यंदाचा दुष्काळ मोठा आहे, असे दानवे म्हणाले.मुख्यमंत्र्यांच्या दुष्काळी दौऱ्यात मुख्यमंत्री कोणाला भेटले हा शेतकर्‍यांना पडलेला प्रश्न आहे. ज्या शेतकऱ्यांना मुख्यमंत्री भेटले त्यांच्याशी संवाद साधला असा शेतकरी मला दाखवावा. त्या भेटीला अर्थ असतो तसा तर मुख्यमंत्र्यांचा दौरा हेलिकॉप्टर मधूनही झाला असता. दुष्काळी पाहणी करताना शेतकऱ्यांशी मुख्यमंत्र्यांनी बोललं पाहिजे होतं. शेतकऱ्यांशी बोलायची मुख्यमंत्र्यांची हिंमत नाही. शेतकऱ्यांच्या बांधावर जाताना दोऱ्या किंवा बॅरिकेट्स लावून दौरा करतात, मुख्यमंत्र्यांना कशाची भीती आहे. तुम्हाला लोकांची भीती आहे. याचा अर्थ सरळ आहे की, लोकांमध्ये तुमच्या बाबतीत अस्वस्थता आहे, अशी टीका दानवे यांनी फडणवीस यांच्या दुष्काळ पाहणी दौऱ्यावर केली.

सरकारने विशेष अधिवेशन बोलवावे

राज्य सरकार सांगते, 5 ऑक्टोबर पर्यंत दुष्काळ जाहीर करू मात्र कर्नाटक सरकारने आधीच दुष्काळ जाहीर केला आहे. आमची मागणी आहे, विशेष अधिवेशन सरकारने बोलवावं. कर्नाटक सरकारने 177 तालुक्यात दुष्काळ जाहीर केलाय. ज्या काँग्रेसवर टीका करतात त्याच काँग्रेसने विशेष अधिवेशन बोलवलं. विशेष अधिवेशनात त्या त्या ठिकाणचे लोकप्रतिनिधी विषय मांडतात. याला सामोरे जाण्याची हिंमत राज्य सरकारमध्ये नाही भाजप आमदार अमित साटम यांच्याबाबत बोलायला आता मला शब्द नाहीत, असे विधान परिषद सदस्य अंबादास दानवे म्हणाले.

Follow Us
राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
Maharashtra Drought Issue : राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265..
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265 तालुक्यांमध्ये...
अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
Lalbagcha Raja 2026 : अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन
सर्व गणेश भक्तांकडून समुद्राचं पाणी उडवत लालबागच्या राजाला सलामी
Lalbugcha Raja Visarjan : सर्व गणेश भक्तांकडून समुद्राचं पाणी उडवत लालबागच्या राजाला सलामी
मुंबई चौपाटीवर गणेश विसर्जनानंतर 'Sea Shore Shine' स्वच्छता मोहिम,
मुंबई चौपाटीवर गणेश विसर्जनानंतर 'Sea Shore Shine' स्वच्छता मोहिम, अमृता फडणवीसांचा निर्धार
कोळी बांधवांचा मान कायम! त्यांच्याच मदतीने होणार लालबागच्या राजाचे...
Lalbaugcha Raja Visarjan video : कोळी बांधवांचा मान कायम! त्यांच्याच मदतीने होणार लालबागच्या राजाचे विसर्जन
राजाची शेवटची आरती संपन्न थोड्याच वेळात राजाचा तराफा खोल समुद्रात...
Lalbaugcha Raja Visarjan : राजाची शेवटची आरती संपन्न थोड्याच वेळात राजाचा तराफा खोल समुद्रात जाणार
थोड्याच वेळात लालबागच्या राजचं विसर्जन होणार, भाविकांचे डोळे पाणावले
Lalbaugcha Raja Visarjan | थोड्याच वेळात लालबागच्या राजचं विसर्जन होणार, भाविकांचे डोळे पाणावले
लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी अनंत अंबानी गिरगाव चौपाटीवर उस्थिती
Anant Ambani : लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी अनंत अंबानी गिरगाव चौपाटीवर उस्थिती