AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! ऑपरेशन टायगरनंतर आता ऑपरेशन तुतारी? शरद पवार गटाच्या खासदाराने घेतली फडणवीसांची भेट, घडामोडींना वेग

शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट पडल्याचं पहायला मिळालं, शिवसेना ठाकरे गटाच्या सहा खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर आता राज्यात ऑपरेशन तुतारीची चर्चा सुरू झाली असून, घडामोडींना वेग आला आहे.

मोठी बातमी! ऑपरेशन टायगरनंतर आता ऑपरेशन तुतारी? शरद पवार गटाच्या खासदाराने घेतली फडणवीसांची भेट, घडामोडींना वेग
राज्यात पुन्हा ऑपरेशन तुतारीची चर्चा Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 27, 2026 | 3:23 PM
Share

शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट पडली आहे, शिवसेना ठाकरे गटाच्या 9 पैकी 6 खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. हा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. आता शिवसेना ठाकरे गटाकडे फक्त तीनच खासदार आहेत. तर शिवसेना शिंदे गटातील खासदारांची संख्या वाढून ती 13 वर पोहोचली आहे. दरम्यान खासदार फुटीनंतर आता उद्धव ठाकरे यांनी मोठा निर्णय घेतला आहे, जिथे-जिथे बंडखोरी झाली त्या -त्या प्रत्येक मतदारसंघात जाऊन ते सभा घेणार आहेत. एकीकडे राज्यात ऑपरेशन टायगर यशस्वी झालं, या सर्व सहा खासदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. दरम्यान त्यानंतर आता राज्यात ऑपरेशन तुतारीची चर्चा सुरू झाली आहे.

राज्यात ऑपरेशन तुतारीची चर्चा सुरू असतानाच बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने चर्चेला उधाण आलं आहे. यावर आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि आमदार रोहित पवार यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. आमचे आणि समाजवादी पार्टीचा एकही खासदार फुटणार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले रोहित पवार?

खासदार फोडण्यासाठी त्यांना टार्गेट केले जाणार आहे. परंतु आमचे, राष्ट्रवादी काँग्रेसचे व समाजवादी पक्षाचे खासदार फुटणार नाहीत. डेलीमिटेशनसाठी भाजपला आणखी 41 खासदारांची गरज आहे, परंतु असे काही होणार नाही. खासदार बजरंग सोनवणे यांनी मुलावर होत असलेल्या आरोपांमुळे फडणवीस यांची भेट घेतली असेल, राज्याचे गृहमंत्री पद हे मुख्यमंत्र्यांकडे आहे तर केंद्रातलं गृहमंत्रिपद अमित शहा यांच्याकडे आहे. त्यामुळे सोनवणे फडणवीसांना भेटले असतील, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.  शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या प्रश्नावर जनजागृती करण्यासाठी आमदार रोहित पवार हे सध्या बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. आमदार रोहित पवार यांनी राज्यात ऑपरेशन तुतारी वगेरे काहीही होणार नसल्याचं म्हटलं आहे.

शरद पवार गटाकडे किती खासदार? 

शरद पवार गटाकडे एकूण 9 खासदार आहेत, त्यापैकी 8 लोकसभेच्या खासदार आहेत, तर एक राज्यसभा खासदार आहे. सुप्रिया सुळे (बारामती), अमोल कोल्हे (शिरूर), धैर्यशील मोहिते-पाटील (माढा), अमर काळे (वर्धा), बजरंग सोनवणे (बीड), निलेश लंके (अहिल्यानगर), भास्कर भग्रे (दिंडोरी) आणि सुरेश म्हात्रे (भिवंडी हे सर्व लोकसभेचे खासदार आहेत, तर शरद पवार हे राज्यसभेचे खासदार आहेत.

Follow Us
अजित दादांचा पक्ष आता नेतृत्त्वहीन; पक्षातील अंतर्गत... विकास लवांडेंच
Vikas Lavande : अजित दादांचा पक्ष आता नेतृत्त्वहीन; पक्षातील अंतर्गत... विकास लवांडेंचा मोठा दावा
गोकुळच्या सत्तेसाठी घाईघाईने अध्यादेश? सतेज पाटलांचा गंभीर आरोप,
गोकुळच्या सत्तेसाठी घाईघाईने अध्यादेश? सतेज पाटलांचा गंभीर आरोप, न्यायालयात जाणार!
शिवसेनेत पालकमंत्र्यांविरोधात नाराजीचा सूर; आमदारांनी थेट....
शिवसेनेत पालकमंत्र्यांविरोधात नाराजीचा सूर; आमदारांनी थेट एकनाथ शिंदेंकडे मांडली तक्रार!
रोहित पवारांच्या एका सूचक ट्वीटने राजकीय वर्तुळात खळबळ; विलीनीकरण...
रोहित पवारांच्या एका सूचक ट्वीटने राजकीय वर्तुळात खळबळ; विलीनीकरणाच्या चर्चांदरम्यान नेमका कोणाला दिला इशारा?
कराडमध्ये गुळाच्या सौद्यांचा शुभारंभ! पहिल्याच दिवशी गुळाला मिळाला...
कराडमध्ये गुळाच्या सौद्यांचा शुभारंभ! पहिल्याच दिवशी गुळाला मिळाला विक्रमी भाव, शेतकऱ्यांना दिलासा!
गोकुळ दूध संघावर महायुतीचा झेंडा! राजेश पाटील यांची अध्यक्षपदी निवड...
गोकुळ दूध संघावर महायुतीचा झेंडा! राजेश पाटील यांची अध्यक्षपदी निवड होताच पहिली प्रतिक्रिया
महायुतीचा मोठा डाव! राजेश पाटील यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड...
Gokul Milk Union Big Update : महायुतीचा मोठा डाव! राजेश पाटील यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड
आगामी राजकारणावर भाष्य करत कैलास पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले
आगामी राजकारणावर भाष्य करत कैलास पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले, आज उद्धव ठाकरे...
गोकुळच्या अध्यक्षपदाचा फैसला आज! राजेश पाटील बाजी मारणार की धक्का बसणा
गोकुळच्या अध्यक्षपदाचा फैसला आज! राजेश पाटील बाजी मारणार की धक्का बसणार? हसन मुश्रीफांचं मोठं विधा
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर फडणवीसांचं मोठं विधान, अधिकृत भाष्य....
NCP Merger : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं विधान, अधिकृत भाष्य करण्याचा अधिकार केवळ...; नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री?