Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विरोधकांना काही कामधंदा नाही…; मुख्यमंत्री शिंदे मविआवर भडकले

CM Eknath Shinde on Mahavikas Aghadi : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या अहमदनगरच्या दौऱ्यावर आहेत. शिर्डीत बोलताना त्यांनी महाविकास आघाडीवर घणाघात केला आहे. आता विरोधकांना काही कामधंदा नाही... मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं का म्हणाले? वाचा सविस्तर....

विरोधकांना काही कामधंदा नाही...; मुख्यमंत्री शिंदे मविआवर भडकले
Follow us
| Updated on: Apr 22, 2024 | 7:21 PM

आता विरोधकांना काही कामधंदा उरलेला नाही. कामं आम्ही करतोय. आपला महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे. त्यामुळे एवढ्या खालच्या स्तरावर जाऊन आरोप, टीका असं कधीच झालेलं नाही. महिलांवर टीका ही आपली संस्कृती नाही. आरोपांना उत्तर आम्ही कामातून आणि जनता मतपेटीतून देईल. त्यांची तीन तिघाडी काम बिघाडी आहे. ते एकमेकांच्या तांगड्यात तंगडे घालून पडणार आहेत, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवर घणाघात केलाय. अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डीत जात मुख्यमंत्र्यांनी साईबाबांचं दर्शन घेतलं. तेव्हा ते बोलत होते.

मुख्यमंत्र्यांनी घेतलं साईबाबांचं दर्शन

साईबाबांच्या दर्शनाने मनाला समाधान आणि आनंद झाला. श्रद्धा सबुरीचा मंत्र प्रत्येकाने आचरणात आणला पाहिजे. साईबाबांना सगळं माहिती आहे. त्यांना काही मागायची गरज नाही. सर्वसामन्यांची प्रगती आणि राज्याचा विकास यासाठी आमचे काम सुरू आहे. राज्याची प्रगती व्हावी हीच प्रार्थना यावेळी केली, असं मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं आहे.

ठाकरेंच्या दाव्यावर शिंदे म्हणाले…

2019 आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याचा शब्द देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता, असं उद्धव ठाकरे यांनी एका मुलाखती दरम्यान सांगितलं. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी जे बोललो ते खरंच असतं. आणखी बऱ्याचशा खऱ्या गोष्टी ब्रेक के बाद समोर येतील. जेव्हा एखादा कार्यकर्ता एवढा मोठा निर्णय घेतो तेंव्हा त्याला मोठी कारणं असतात. मी आयुष्यात कधी खोटं बोललो नाही आणि बोलणारही नाही. आनंद दिघे साहेबांच्या शिकवणीत मी तयार झालोय. जिथे अन्याय तिथे न्यायासाठी झगडणार हा माझा स्वभाव आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.

उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय असणारे मिलिंद नार्वेकर हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा होतेय. यावर मिलिंद नार्वेकर अजून तरी संपर्कात नाहीत, असं शिंदेंनी म्हटलं. तर अंबादास दानवे त्यांच्या मनाविरुद्ध बोलले असतील. त्यांच्या मनात वेगळं असेल. त्यांनी बाळासाहेबांच्या विचारांना मूठमाती दिलीय खुर्चीसाठी तडजोड केली ती आम्ही करणार नाही, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

जळगावात दोन गटात तूफान राडा
जळगावात दोन गटात तूफान राडा.
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख.
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला.
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया.
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय...
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय....
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?.
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली...
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली....
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी.
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'.
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन.