AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘खासदार करून तुम्हीच मला लांब लोटलं’, सुजय विखे यांचं मोठं वक्तव्य, चर्चांना उधाण

सुजय विखेंना आगामी लोकसभा निवडणुकीचं तिकीट मिळणार नाही, अशी एकीकडे चर्चा आहे. किंवा लोकसभा निवडणुकीत मी निवडून येणार नाही, असं सुजय विखेंना वाटतंय का? असाच प्रश्न त्यांच्या वक्तव्यामुळे उपस्थित होतोय.

'खासदार करून तुम्हीच मला लांब लोटलं', सुजय विखे यांचं मोठं वक्तव्य, चर्चांना उधाण
| Updated on: Mar 02, 2024 | 8:02 PM
Share

अहमदनगर | 2 मार्च 2024 : अहमदनगरचे खासदार सुजय विखे पाटील यांच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. “तुमच्या आशीर्वादाने मी नगरचा खासदार झालो. मात्र तुमच्यापासून दुरावला गेलो आहे. माझे दोन महिने होऊ द्या. नंतर मी कायमचा इकडेच येईल. काळजी करू नका”, असं वक्तव्य सुजय विखे पाटील यांनी केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या वक्तव्याचा नेमका अर्थ काय? असाच प्रश्न उपस्थित करण्यात येतोय. सुजय विखेंना आगामी लोकसभा निवडणुकीचं तिकीट मिळणार नाही, अशी एकीकडे चर्चा आहे. किंवा लोकसभा निवडणुकीत मी निवडून येणार नाही, असं सुजय विखेंना वाटतंय का? असाच प्रश्न उपस्थित होतोय.

अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत आज शिर्डी जवळील राहाता शहरात महिला बचत गटाला साहित्य आणि निधी वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी बोलताना त्यांनी सूचक विधान केलं आहे. “आमच्यावर झालेल्या प्रत्येक आरोपाला मी दोन महिन्यानंतर उत्तर देईन. सध्या लोकसभेची व्यस्तता आहे. शिर्डी मतदारसंघातील जनतेच्या आशीर्वादाने मी खासदार झालो आहे. मात्र खासदार करून तुम्हीच मला लांब लोटलं. माझे दोन महिने होऊ द्या. नंतर मी कायमचा इकडे (शिर्डी) येईल. काळजी करू नका”, असं वक्तव्य केल्याने सुजय विखेंना नेमकं म्हणायचं काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

सुजय विखेंनी कार्यकर्त्यांना खडेबोल सुनावलं

दरम्यान, सुजय विखे यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना कार्यकर्त्यांना खडेबोल सुनावलं. “जो जनतेची कामे करील यापुढे त्याच कार्यकर्त्यांच्या हस्ते मी सत्कार घेईन. मला हार तुरे नको. तर जनतेची कामे करणारे कार्यकर्ते हवेत. आपल्यावर होणाऱ्या प्रत्येक आरोपांचे उत्तर जनतेची कामे करून द्या. आपल्यावर नेहमीच आरोप होतात. आमच्या विरोधकांना नीचा दाखवून तुम्ही तुम्हाला दरबारात कुठलेही पुरस्कार मिळणार नाही. आपल्या विरोधात कुणी कितीही मोर्चे काढू द्या. विखे पाटलांना शिव्या देणाऱ्यांचा निषेध करत विरोधकांचा अपमान करणारा आमचा सच्चा कार्यकर्ता नाही. तुम्ही आमच्या विरोधाकांना अपमानीत करून आमच्या मनामध्ये स्थान निर्माण कराल असे वाटत असेल तर तो तुमचा गैरसमज. कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांची ही शिकवण नाही”, अशा शब्दांत सुजय विखेंनी कार्यकर्त्यांना सुनावलं.

Follow Us
नाशिकच्या दिंडोरीत भीषण अपघात; विहिरीत कार कोसळून 9 जणांचा मृत्यू
नाशिकच्या दिंडोरीत भीषण अपघात; विहिरीत कार कोसळून 9 जणांचा मृत्यू.
सिलेंडरसाठी संघर्ष सुरूच; नागपूर, अमरावती, मुंबईत नागरिक हैराण
सिलेंडरसाठी संघर्ष सुरूच; नागपूर, अमरावती, मुंबईत नागरिक हैराण.
अशोक खरात सोबत शिंदे, चाकणकरांचे कॉल्स; अंजली दमानियांकडे CDR?
अशोक खरात सोबत शिंदे, चाकणकरांचे कॉल्स; अंजली दमानियांकडे CDR?.
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील.
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?.
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद....
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी.
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?.
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.