धनगर आरक्षणासाठी पुन्हा न्यायालयीन लढा; पुनर्विचार याचिकेद्वारे दाद मागणार, गोपीचंद पडळकरांची भूमिका

Dhangar Reservation : धनगर आरक्षणासाठी पुन्हा एकदा न्यायालयीन लढा देण्यात येणार आहे. सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठाविण्यात येणार आहे. त्यासाठी न्यायपालिकेत पुनर्विचार याचिका दाखल करण्यात येणार असल्याचे पडळकर यांनी सांगितले.

धनगर आरक्षणासाठी पुन्हा न्यायालयीन लढा; पुनर्विचार याचिकेद्वारे दाद मागणार, गोपीचंद पडळकरांची भूमिका
धनगर आरक्षणासाठी पुनर्विचार याचिका
Follow us
| Updated on: May 31, 2024 | 4:59 PM

धनगर आरक्षणासाठी पुन्हा न्यायालयीन लढाईची तयारी करण्यात येत आहे. सुप्रीम कोर्टात दाद मागण्यात येणार आहे. पुनर्विचार याचिकेद्वारे न्याय मागणी मांडण्यात येईल. चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा 299 वी जयंती सोहळ्यात आज भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी याविषयीची भूमिका जाहीर केली. त्यांनी मराठा, ओबीसी वादासह इतर ही मुद्यांवर त्यांचे मत मांडले.

ओबीसी-मराठाप्रकरणात भूमिका

ओबीसी हक्काच्या लढाईत आम्ही भुजबळांसोबत असल्याचे पडळकर म्हणाले. भुजबळंची राजकीय भूमिका काय आहे हे मला माहित नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. मराठा समाज हा मोठा भाऊ आहे आणि ओबीसी हा लहान भाऊ आहे. मराठा- ओबीसी समाजातील वातावरण दूषित करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न होत असल्याचा आरोप पण त्यांनी केला.

हे सुद्धा वाचा

एसटीमध्ये समावेशासाठी आम्ही आग्रही

धनगर समाजाचा संघर्षाचा काळ आहे. महाराष्ट्रातील धनगर समाजाचे आरक्षणाचे एसटीमध्ये समाविष्ट होणे हे आमचे ध्येय आहे.सरकारी बाबूंनी कागदपत्रांमध्ये फेरफार केल्यामुळे आमच्यावर वाईट वेळ आली.हायकोर्टाचा निकाल आमच्या विरोधात गेला. सुप्रीम कोर्टामध्ये काही लोकांनी पुनर्विचार याचिका केली होती ती पण फेटाळण्यात आली. मात्र देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यावर आमचा आजही विश्वास आहे. आता पुनर्विचार याचिका दाखल करत आहे. सरकारने पाठबळ देण्याची मागणी त्यांनी केली.

जाणीवपूर्वक द्वेष वाढला

बाराबलुतेदार,अठरापगड जाती, शेतकरी मराठा, धनगर आम्ही सगळे एकत्रित राहिलेलो आहोत. गाव खेड्यात पूर्वीपासून आम्ही खेळीमेळीच्या वातावरणात राहिलो. मात्र गेल्या काही दिवसापासून वातावरण दूषित करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न होत आहे, असा आरोप पडळकर यांनी केला. त्यांचा रोख कुणावर आहे, हे त्यांनी स्पष्ट केले नाही.  तो थांबला पाहिजे. ओबीसी हा गरीब समाज आहे. तो कोणाच्या भानगडीत पडणारा नाही. मराठा समाज हा मोठ्या भावाच्या भूमिकेत आहे ते तसेच पुढे गेले पाहिजे. भुजबळांच्या राजकीय भूमिकेविषयी जादा भाष्य करणे पडळकर यांनी टाळले. त्यांच्या राजकीय भूमिकेविषयी भुजबळांना विचारा असे ते म्हणाले. पण त्यांच्या ओबीसीच्या लढ्यात सोबत असल्याचे पडळकर यांनी स्पष्ट केले.

'हट्ट धरू नका, एकच वचन द्या',जरांगेंनी मराठ्यांकडून कोणता मागितला शब्द
'हट्ट धरू नका, एकच वचन द्या',जरांगेंनी मराठ्यांकडून कोणता मागितला शब्द.
तर राज ठाकरेंनी सोबत यावं, शिंदेंच्या नेत्याचं मनसे अध्यक्षांना आवाहन
तर राज ठाकरेंनी सोबत यावं, शिंदेंच्या नेत्याचं मनसे अध्यक्षांना आवाहन.
प्रितमताई निवडणुकीच्या रिंगणात उतरणार? पंकजा मुंडेंनी काय दिले संकेत?
प्रितमताई निवडणुकीच्या रिंगणात उतरणार? पंकजा मुंडेंनी काय दिले संकेत?.
फडणवीसांकडून होमगार्ड्सना भेट, मानधन दुप्पट, आता प्रतिदिन 570 ऐवजी...
फडणवीसांकडून होमगार्ड्सना भेट, मानधन दुप्पट, आता प्रतिदिन 570 ऐवजी....
पंकजा मुंडे जरांगे पाटलांच्या दसरा मेळाव्यावर स्पष्टच म्हणाल्या...
पंकजा मुंडे जरांगे पाटलांच्या दसरा मेळाव्यावर स्पष्टच म्हणाल्या....
जरांगेंच्या नारायणगडावरील मेळाव्याचा बघा ड्रोनव्ह्यू,मराठ्यांचा जनसागर
जरांगेंच्या नारायणगडावरील मेळाव्याचा बघा ड्रोनव्ह्यू,मराठ्यांचा जनसागर.
गुन्हेगारी, राजकारण अन् सध्यस्थितीवर काय म्हणाले सरसंघचालक भागवत?
गुन्हेगारी, राजकारण अन् सध्यस्थितीवर काय म्हणाले सरसंघचालक भागवत?.
'हीच वचपा काढण्याची अन् क्रांतीची वेळ', राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?
'हीच वचपा काढण्याची अन् क्रांतीची वेळ', राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?.
नवनीत राणा यांच्या जीवाला धोका, अश्लील भाषेत धमकीचं पत्र अन्...
नवनीत राणा यांच्या जीवाला धोका, अश्लील भाषेत धमकीचं पत्र अन्....
‘लाडकी बहीण योजने’साठी सरकारकडून पुन्हा संधी,'या' तारखेपर्यंत करा अर्ज
‘लाडकी बहीण योजने’साठी सरकारकडून पुन्हा संधी,'या' तारखेपर्यंत करा अर्ज.