AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘पक्ष फोडायला अक्कल लागत नाही’, शरद पवारांचा फडणवीसांवर घणाघात

"शिंदेंनी काही लोक घेतले आणि गुहाटीला जाऊन बसले. उद्धव ठाकरेंचे सरकार पाडले. पक्ष फोडून सत्ता मिळवणे ही लोकशाही आहे का? पक्ष फोडल्याचे देवेंद्र फडणवीस स्वतः म्हणाले. पक्ष उभा करायला अक्कल लागते. मात्र फोडायला अक्कल लागत नाही", असा घणाघात शरद पवारांनी केला.

'पक्ष फोडायला अक्कल लागत नाही', शरद पवारांचा फडणवीसांवर घणाघात
| Updated on: Nov 13, 2024 | 4:15 PM
Share

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची आज अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी येथे प्रचारसभा पार पडली. यावेळी शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. “पक्ष निर्माण करायला अक्कल लागते, पक्ष फोडायला अक्कल लागत नाही”, अशा शब्दांत शरद पवारांनी देवेंद्र फडणवीसांना खोचक टोला लगावला. यावेळी त्यांनी आमदार प्राजक्त तणपुरे यांचंदेखील कौतुक केलं. “पक्ष निर्माण करायला अक्कल लागते. फोडायला लागत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी 30-40 आमदार गोळा केले. गुवाहाटीला जाऊन बसले. ही एक व्यक्ती देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होती. उद्धव ठाकरेंच्या मंत्रीमंडळात होती. असं असतानाही त्यांनी पक्ष फोडण्याची भूमिका घेतली. लोकांना हे पटलं नाही. देवेंद्र फडणवीसांनी सगळ्यात मोठं काम काय केलं? विचारल्यानंतर पक्ष फोडला म्हणून सांगतात. पक्ष निर्माण करायला अक्कल लागते, पक्ष फोडायला अक्कल लागत नाही”, असा घणाघात शरद पवारांनी आपल्या भाषणात केला.

“लोकसभा निवडणुकीच्या वेळी मी राहुरीला आलो होतो. तुम्ही आपला उमेदवार निवडून दिला त्याबद्दल तुमचे आभार. मागच्यावेळी काँग्रेसचा एक आणि आमचे चार खासदार होते. मात्र घटना धोक्यात असल्याने तुम्ही आमचे 31 खासदार निवडून दिले. आता भाजप आणि आमच्यातल्या फुटून गेलेल्या लोकांचे राज्य आहे. उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे, अजित पवारांसह अनेकजण मंत्री होते. मात्र शिंदेंनी काही लोक घेतले आणि गुहाटीला जाऊन बसले. उद्धव ठाकरेंचे सरकार पाडले. पक्ष फोडून सत्ता मिळवणे ही लोकशाही आहे का? पक्ष फोडल्याचे देवेंद्र फडणवीस स्वतः म्हणाले. पक्ष उभा करायला अक्कल लागते. मात्र फोडायला अक्कल लागत नाही”, असा पुनरुच्चार शरद पवार यांनी केला.

‘त्याने घटाघटा विष पिलं आणि…’

“देशात आम्ही सगळ्या विरोधी पक्षाच्या नेत्यांनी इंडिया आघाडी स्थापन केली. 400 डाव उद्ध्वस्त करायचं ठरवलं. डाव उद्ध्वस्थ करण्यासाठी एकत्र आलं पाहिजे होतं. निवडणुका आल्यानंतर आम्ही भूमिका मांडली. ज्या महाराष्ट्रात कॉंग्रेसचा 1 खासदार, राष्ट्रवादीचे 4 खासदार होते. तुम्ही आम्हाला 48 पैकी 31 खासदार दिले, राष्ट्रवादीला 8 खासदार दिले. लोकसभेच्या निकालानंतर यांची चिंता वाढली. नवनवीन योजना आणताय. विधानसभा निवडणुकीच्या अगोदर यांनी काही योजना राबवल्या. मात्र आज महाराष्ट्रात स्त्रिया सुरक्षित नाहीत. महाराष्ट्रात अनेक बहिणींचा पत्ता लागत नाही आणि तुम्ही लाडक्या बहिणी म्हणता. आज महाराष्ट्रात गेल्या वर्षभरात 1100 पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. शेतकऱ्यांच्या हाताला आलेलं पीक वाया गेलं, शेतकऱ्याला कर्ज फेडता आलं नाही. पीकाला भाव मिळाला नाही. त्याने घटाघटा विष पिलं आणि आत्महत्या केली. त्यामुळे भाजपला सत्तेवर बसण्याचा अधिकार नाही”, अशी टीका शरद पवारांनी केली.

शरद पवारांकडून प्राजक्त तनपुरेंच्या मंत्रीपदाचे संकेत

यावेळी शरद पवार यांनी आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या मंत्रिपदाचे संकेत दिले. “प्राजक्त तनपुरेसारखा जानकार, अभ्यासू आमदार तुमच्याकडे आहे. कमी काळ मंत्री होते. मात्र त्यांनी काम चांगल केलं. चंद्रपुरात सभा संपल्यानंतर लोकांना विचारलं की वीजेचे प्रश्न सुटले का? प्राजक्त तनपुरेसारखा मंत्री दिला तो आमच्यापासून टोकाला आला आणि आमचे सगळे प्रश्न सोडवले. जे जे काम आम्ही घेऊन गेलो, नम्रपणे वर्तवणूक करतो, याचा आनंद आहे असं ते बोलले. मला अभिमान आहे प्राजक्त तनपुरेंने जनतेसाठी कामं केली. पुन्हा एकदा प्राजक्त तनपुरेला महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवा. पहिल्या निवडणुकीत त्यांच्या कामाची पद्धत ओळखली. महाराष्ट्राची सत्ता आम्हाला दिली तर प्राजक्त तनपुरे राज्यासाठी काम करतील”, असं शरद पवार म्हणाले.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.