AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

12 हजार स्क्वेअर फुटांचा प्लॉट अन्….जलील यांचे शिरसाट यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाले चौकशी केली तर…

एमआयएमचे नेते तथा माजी खासदार इम्तियाज जलाली यांनी संजय शिरसाट यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे धक्कादाकय आरोप केले आहेत.

12 हजार स्क्वेअर फुटांचा प्लॉट अन्....जलील यांचे शिरसाट यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाले चौकशी केली तर...
sanjay shirsat and imtiaz jaleel
Follow us
| Updated on: Jun 11, 2025 | 6:55 PM

Imtiaz Jaleel Vs Sanjay Shirsat : एमआयएमचे नेते तथा माजी खासदार इम्तियाज जलील यांनी पुन्हा एकदा छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. संजय शिरसाट यांनी कमी किमतीने छत्रपती संभाजीनगरमधील जिल्हा न्यायालयासमोर जबिंदा नावाच्या बिल्डरकडून बारा हजार स्क्वेअर फुटांचा प्लॉट फक्त 4800 प्रति प्रति स्क्वेअर फुटाणे घेतल्याचा आरोप जलील यांनी केला आहे. हा प्लॉट मुलगा सिद्धांत शिरसाट आणि पत्नी विजया शिरसाट यांच्या नावावर केल्याचा आरोप इम्तियाज जलील यांनी केला आहे. जलील यांच्या या आरोपानंतर आता एकच खळबळ उडाली आहे.

मी तिथे जाऊन त्या हॉटेलचे काम बघणार

संजय शिरसाट यांनी विट्स हॉटेलच्या खरेदीत पाच सहकारी कोण आहेत, हे त्यांनी सांगितलेले नाही. MIDC मधील प्लॉटच्या खरेदीसंदर्भातही ते बोलले नाही. संजय शिरसाट यांचे त्र्यंबकेश्वरमध्ये हॉटेलचे काम सुरू आहे. मी तिथे जाऊन त्या हॉटेलचे काम बघणार आहे. शिरसाट यांनी मागच्या महिन्यात परिवाराच्या नावावर कोट्यवधीची जमीन घेतली आहे, असा आरोप जलील यांनी शिरसाट यांच्यावर केला आहे.

सिद्धांत आणि तुषार शिरसाट या दोन मुलांच्या नावावर…

तसेच, वर्ग 2 ची जमीन आणि हरीजनांना दिलेलr जागा हस्तांतरीत केली जाऊ शकत नाही. शाजापूर येथील गट क्रमांक 8 मधील 10 एकर जागा संजय शिरसाट यांनी त्यांच्या मुलाच्या नावावर घेतली. या जागेत एक वृत्तपत्र संपादक आणि एक माजी पोलीस अधिकारी त्या ठिकाणी प्लॉटिंग करत आहेत. सिद्धांत आणि तुषार शिरसाट या दोन मुलांच्या नावावर एक कोटी दहा लाख रुपयांत जमीन घेतली गेली. लक्ष्मण भिका बनसोडे यांच्या नावावर ही जमीन होती. हा गरीब हरिजन शेतकरी असावा. पालकमंत्री एवढे गरीब आहेत का की ते सरकारी जमीन सोडत नाहीयेत, असा सवाल जलील यांनी केला.

बळजबरी शिक्का घेण्याचा प्रयत्न

चौकशी केली तर मी जे बोलतो ते सगळे सत्य असल्याचे समोर येणार आहे. त्यावेळी एक महिला तहसीलदार होती. तिच्यावर दबाव आणण्यात आला होता. बागडे नावाचे तलाठी जे अनेकदा सस्पेंड झाले आहेत, त्याला सेवेत घेऊन त्याला एक महिन्याची पोस्टिंग दिली गेली. तहसीलदार यांच्याकडून बळजबरी शिक्का घेण्याचा प्रयत्न केला गेला. त्यासाठी रमेश मूनलोड या तहसीलदारांनी मदत केली. त्या नंतर ही जमीन एक कोटी दहा लाखमध्ये सिद्धांत शिरसाट आणि तुषार शिरसाट या संजय शिरसाट यांच्या मुलांच्या नावावर करण्यात आली, असा खळबळजनक आरोप जलील यांनी केला.

 4800 रुपये प्रति स्क्वेअर फूट किंमतीने…

दुसरे प्रकरण हे जालना रोड अदालत समोरील आहे. येथे 12 हजार स्क्वेअर फूट जागा सिद्धांत शिरसाट मुलगा, विजया शिरसाट यांच्या नावावर घेतली. जबिंदा बिल्डर कडून ही जागा घेण्यात आली. ही जागा 2025 मध्ये घेण्यात आली. ही जागा पाच कोटी 83 लाख 94 हजार रुपयात घेतली गेली. 4800 रुपये प्रति स्क्वेअर फूट किंमतीने ही जागा घेण्यात आली. मी आयुष दवाखान्यासाठी जमीन मागितली होती, पण उपलबद्ध नसल्याचे सांगण्यात आले, असा गंभीर आरोप जलील यांनी केला.

कुठलीही रॉयल्टी न काढता…

शाजापूर येथील गट नंबर 34 मध्ये दोन गुंठे जागा सिद्धांत शिरसाट यांच्या नावावर घेतली गेली. ही जागा एक कोटी रुपयांमध्ये मध्ये घेतली गेली. सप्टेंबर 2024 मध्ये 2 एकर जागा साठ लाखात घेतली. ही जागा विजया शिरसाट यांच्या नावावर घेतली गेली. या 34 गट नंबरमध्ये एक मोठ्या हॉटेलचे काम सुरू आहे. त्या हॉटेलचे काम सुरू असताना कुठलीही रॉयल्टी न काढता मुरूम काढला जात आहे. कसाब खेडा, तिसगाव आणि धरमपूर या गावाच्या हद्दीतून मुरूम काढला जात आहे, असा आरोप करून जलील यांनी या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय चौकशी नेमली पाहिजे, अशी मागणी जलील यांनी केली.

उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे यांच्यात घमासान, अ‍ॅम्ब्युलन्स, मुडदा अन्...
उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे यांच्यात घमासान, अ‍ॅम्ब्युलन्स, मुडदा अन्....
मनसे युतीबाबत ठाकरे सकारत्मक, जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत दिला एकच आदेश
मनसे युतीबाबत ठाकरे सकारत्मक, जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत दिला एकच आदेश.
हिंदी बोलेंगे, पढेंगे कोई रोक सके तो..,सदावर्तेंचं राज ठाकरेंना चॅलेंज
हिंदी बोलेंगे, पढेंगे कोई रोक सके तो..,सदावर्तेंचं राज ठाकरेंना चॅलेंज.
एअर इंडियाच्या पक्षी धडकला अन्... आणखी एक दुर्घटना टळली, बघा काय घडलं?
एअर इंडियाच्या पक्षी धडकला अन्... आणखी एक दुर्घटना टळली, बघा काय घडलं?.
फडणवीसांच्या कार्यक्रमात खडसे; म्हणाले, ते आले पण पदरात काहीच पडल नाही
फडणवीसांच्या कार्यक्रमात खडसे; म्हणाले, ते आले पण पदरात काहीच पडल नाही.
स्मशानभूमीत नग्न दाम्पत्याकडून अघोरी पूजा, CCTVमध्ये जे दिसलं त्यानं..
स्मशानभूमीत नग्न दाम्पत्याकडून अघोरी पूजा, CCTVमध्ये जे दिसलं त्यानं...
पुणेकरांनो शहरातील हे 20 रस्ते 23 जूनपर्यंत वाहतुकीसाठी बंद, कारण काय?
पुणेकरांनो शहरातील हे 20 रस्ते 23 जूनपर्यंत वाहतुकीसाठी बंद, कारण काय?.
झिंज्या उपटल्या, रक्तबंबाळ होईपर्यंत हाणामारी.. लोकलमधला VIDEO व्हायरल
झिंज्या उपटल्या, रक्तबंबाळ होईपर्यंत हाणामारी.. लोकलमधला VIDEO व्हायरल.
फडणवीस मंचावर, खडसेंना स्थान नाही? नाव घेणंही टाळलं; जळगावात काय घडलं?
फडणवीस मंचावर, खडसेंना स्थान नाही? नाव घेणंही टाळलं; जळगावात काय घडलं?.
मुसळधार पावसानं विजेचा DP कोसळला अन्...बघा VIDEO तुम्हालाही भरेल धडकी
मुसळधार पावसानं विजेचा DP कोसळला अन्...बघा VIDEO तुम्हालाही भरेल धडकी.