AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पायलटच्या सीटवर डुलकी… अजित पवारांच्या अपघाताच्या 1 महिन्यानंतर धक्कादायक व्हिडीओ समोर, जय पवार म्हणाले…

अजित पवार यांच्या अपघाताला धक्कादायक वळण लागले आहे. अजित पवारांचा मुलगा जय पवार यांनी VSR कंपनीच्या मालकाचा पायलट सीटवर झोपलेला व्हिडिओ शेअर केला आहे. 

पायलटच्या सीटवर डुलकी... अजित पवारांच्या अपघाताच्या 1 महिन्यानंतर धक्कादायक व्हिडीओ समोर, जय पवार म्हणाले...
jay pawar ajit pawar
| Updated on: Mar 02, 2026 | 7:35 AM
Share

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या विमानाला २८ जानेवारी २०२६ रोजी अपघात झाला. या भीषण अपघातात अजित पवारांसह ५ जणांचा मृत्यू झाला. अजित पवारांच्या निधनानतंर आता या अपघाताभोवतीचे गूढ अधिक गडद झाले आहे. अजित पवारांच्या निधनाला एक महिना उलटल्यानंतर आता त्यांचे पुत्र जय पवार यांनी एक धक्कादायक पोस्ट शेअर केली आहे. त्यांच्या या पोस्टने सध्या महाराष्ट्रात खळबळ उडाल्याचे पाहायला मिळत आहे.

जय पवार यांनी नुकतंच त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्रामवरुन एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी ज्या VSR कंपनीच्या विमानात अजित पवार यांचा अंत झाला, त्या कंपनीच्या मालकावर गंभीर आरोप केले आहेत. जय पवार यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये, व्हीएसआर कंपनीचा मालक रोहित सिंह हा मुख्य पायलटच्या सीटवर बसलेला दिसत आहे. धक्कादायक बाब म्हणजे विमान आकाशात असताना रोहित सिंह चक्क झोपलेला आहे. या गंभीर निष्काळजीपणावर जय पवार यांनी संताप व्यक्त केला आहे.

जय पवार यांची पोस्ट

जय पवार यांनी या व्हिडीओ पोस्ट करत तीन प्रमुख मागण्या केल्या आहेत. माझ्या वडिलांना आपण गमावले… ही वेदना आयुष्यभर साथ देणार आहे. या व्हिडिओमध्ये VSR चे मालक रोहित सिंह मुख्य पायलटच्या सीटवर उड्डाणादरम्यान झोपलेले दिसत आहेत. आकाशात असताना असा निष्काळजीपणा असू शकत नाही. हे अत्यंत गंभीर आणि धक्कादायक आहे. मी DGCA ला ठामपणे मागणी करतो — या प्रकरणात तात्काळ कठोर कारवाई व्हावी. संपूर्ण चौकशी होईपर्यंत VSR ची सर्व विमाने तात्काळ ग्राउंड करण्यात यावीत आणि रोहित सिंह यांना त्वरित अटक करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. ही एका मुलाची आर्त हाक आहे… माझ्या वडिलांसाठी आणि प्रत्येक प्रवाशाच्या सुरक्षिततेसाठी, असे जय पवार यांनी म्हटले आहे.

View this post on Instagram

A post shared by Jay Pawar (@jayajitpawar)

दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा

दरम्यान जय पवार यांच्या या पोस्टनंतर आता व्हिएसआर कंपनीवर टीकेची झोळ उठताना दिसत आहे. अजित पवारांच्या विमान अपघातानंतर त्यांचे पुतणे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी कंपनीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. तसेच याप्रकरणी दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही ते सातत्याने करत आहेत. त्यामुळे आता जय पवारांनी शेअर केलेल्या व्हिडीओनंतर तरी दोषींवर गुन्हा दाखल होणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...