AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजित पवार यांना कोर्टाकडून सर्वात मोठा दिलासा, इनकम टॅक्स विभागाने जप्त केलेली मालमत्ता मुक्त

अजित पवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. ट्रिब्यूनल कोर्टाने आयकर विभागाने अजित पवारांची जप्त केलेली मालमत्ता मुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पवार कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे. आयकर विभागाने 2023 मध्ये संबंधित मालमत्तांवर जप्तीची कारवाई केली होती.

अजित पवार यांना कोर्टाकडून सर्वात मोठा दिलासा, इनकम टॅक्स विभागाने जप्त केलेली मालमत्ता मुक्त
अजित पवार, नेते, राष्ट्रवादीImage Credit source: ANI
| Updated on: Dec 06, 2024 | 10:14 PM
Share

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे. अजित पवार यांची आयकर विभागाकडून जप्त करण्यात आलेली मालमत्ता दिल्लीतील कोर्टाच्या आदेशानंतर मुक्त करण्यात आली आहे. दिल्ली ट्रिब्यूनल कोर्टाने याबाबतचा निर्णय दिला आहे. कोर्टाच्या या निर्णयाने अजित पवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार आणि पत्नी सुनेत्रा पवार यांच्याशी सबंधित जप्त मालमत्ताही कोर्टाने मोकळी केली आहे. अजित पवारांच्या स्पार्कलिंग सॉईल, गुरु कमोडिटी, फायर पॉवर अॅग्री फार्म आणि निबोध ट्रेडिंग कंपनीशी सबंधित मालमत्ता जप्त करण्यात आल्या होत्या. पण अखेर कोर्टाच्या आदेशानंतर या मालमत्ता मुक्त करण्यात आल्या आहेत.

विशेष म्हणजे अजित पवार यांनी 5 डिसेंबरला सहाव्यांदा राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर दुसऱ्याच दिवशी अजित पवारांना कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. आयकर विभागाने काही महिन्यांपूर्वी अजित पवार, सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्याशी संबंधित कंपन्यांच्या काही मालमत्तांवर आयकर विभागाने कारवाई केली होती. आयकर विभागाने संबंधित मालमत्ता जप्त करण्याची कारवाई केली होती. या कारवाई विरोधात पवार कुटुंबियांनी कोर्टात धाव घेतली होती.

संबंधित कारवाई ही 2023 मध्ये झाली होती. त्याविरोधात संबंधित कारवाई स्थगित करण्यात यावी, अशी मागणी करणाऱ्या याचिका वारंवार करण्यात आल्या होत्या. यानंतर स्थगितीची ऑर्डर काढण्यात आली होती. पण जप्त केलेली मालमत्ता मुक्त करण्यात आली नव्हती. त्यानंतर आता ट्रिब्यूनल कर्टाने जप्त केलेली मालमत्ता मुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे अजित पवारांना हा मोठा दिलासा मिळाला आहे.

नितीश बाबूंच्या पारड्यात कौल, तेजस्वी यादवांना राघोपूरमध्ये कडवी झुंज
नितीश बाबूंच्या पारड्यात कौल, तेजस्वी यादवांना राघोपूरमध्ये कडवी झुंज.
नितीश बाबूच पुन्हा मुख्यमंत्री! कलांनुसार NDA ला दणदणीत बहुमत
नितीश बाबूच पुन्हा मुख्यमंत्री! कलांनुसार NDA ला दणदणीत बहुमत.
अलीनगरमध्ये मैथिली ठाकूरची मोठी आघाडी, तब्बल 'इतक्या' मतांनी पुढे....
अलीनगरमध्ये मैथिली ठाकूरची मोठी आघाडी, तब्बल 'इतक्या' मतांनी पुढे.....
बिहार मे का बा? कलांनुसार...फिर एक बार नितीशबा, बहुमताकडे वाटचाल
बिहार मे का बा? कलांनुसार...फिर एक बार नितीशबा, बहुमताकडे वाटचाल.
काँग्रेस कमजोर, बिहारच्या जनतेनं लाथडलं; बावनकुळेंचा हल्लाबोल
काँग्रेस कमजोर, बिहारच्या जनतेनं लाथडलं; बावनकुळेंचा हल्लाबोल.
माजी मंत्री विजय शिवतारे यांचे जावई शिवदीप लांडे पिछाडीवर तर JDU वरचढ
माजी मंत्री विजय शिवतारे यांचे जावई शिवदीप लांडे पिछाडीवर तर JDU वरचढ.
NDA आघाडीवर, JDU भाजपपेक्षा पुढे; तेजप्रताप यादव यांना धक्का
NDA आघाडीवर, JDU भाजपपेक्षा पुढे; तेजप्रताप यादव यांना धक्का.
नेते बनलेले प्रशांत किशोर राजकारण सोडणार?
नेते बनलेले प्रशांत किशोर राजकारण सोडणार?.
बिहारमध्ये मोठा खेला होणार? शेअर बाजार लाल आकड्यंनी उघडला
बिहारमध्ये मोठा खेला होणार? शेअर बाजार लाल आकड्यंनी उघडला.
बिहारमध्ये कोण बाजी मारणार? टीव्ही9 मराठीच्या वेबसाइटवर बघा संपूर्ण
बिहारमध्ये कोण बाजी मारणार? टीव्ही9 मराठीच्या वेबसाइटवर बघा संपूर्ण.