AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रोहित पाटलांच्या ‘बघून घेतो’च्या भाषेवर अजित पवारांचं पहिल्यांदाच उत्तर; सांगलीत वाद चिघळणार?

सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ येथील नगरपंचायत निवडणुकीतून राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर आर पाटील यांचे पुत्र रोहित पाटील हे निवडणुकीसाठी उभे आहेत. त्यांच्या विरोधात एक राष्ट्रवादीचा गट सक्रीय असल्याचे बोलले जात आहे. त्यावर अजित पवार यांची प्रतिक्रिया

रोहित पाटलांच्या 'बघून घेतो'च्या भाषेवर अजित पवारांचं पहिल्यांदाच उत्तर; सांगलीत वाद चिघळणार?
| Edited By: | Updated on: Dec 16, 2021 | 2:37 PM
Share

मुंबईः आर. आर. पाटील यांचे पुत्र रोहित पाटील (Rohit Patil) सांगली जिल्ह्यातील कवठे महांकाळ नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचाराची धुरा सांभाळत आहेत.  मात्र त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचा आणखी एक गट सक्रीय झाला असून या 25 वर्षीय नेत्याला हरवण्यासाठी सर्व विरोधक एकवटले आहेत, असं वक्तव्य एका नेत्याने केलं. याविषयी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले, ‘स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्या-त्या जिल्ह्याचं राजकारण पाहून निर्णय घ्यावा लागतो.’ अजित पवार यांच्या अशा वक्तव्यामुळे सांगलीतील वाद चिघळण्याची चिन्ह दिसत आहेत.

काय म्हणाले अजित पवार?

रोहित पाटील यांच्याविरोधात चाललेल्या राजकारणाविषयी विचारले असता अजित पवार म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्या त्या जिल्ह्याचं राजकारण पाहून निर्णय घ्यायचा आहे. प्रांत अध्यक्ष हे त्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. मीही रोहितला फोन करून विचारेन. रोहित गेल्याच आठवड्यात मला भेटला होता. पण असं कोण कुणाला एकटं पाडेल असं वाटत नाही. रोहितची कामाची पद्धत चांगली आहे. मी त्या संदर्भात माहिती घेऊन त्याला काय मदत पाहिजे ती देण्याचं काम करेन.’

कवठेमहांकाळ नगरपंचायत निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित आर आर पाटील विरोधात महाविकास आघाडी असं चित्र आहे. कवठेमहांकाळमधील राष्ट्रवादीकडील सगळे गट महाविकास आघाडीकडे गेले आहेत. खासदार संजय काका पाटील (भाजप), घोरपडे (शिवसेना), सगरे गट (राष्ट्रवादी) आणि गजानन कोठावळे गट असे सर्व जण एकत्र येऊन महाविकास आघाडी निर्माण केली आहे.

‘माझं वय 23 , दोन वर्षात काही शिल्लक ठेवत नाही’

कवठेमहांकाळमध्ये राष्ट्रवादीची प्रचार सभा होती. यावेळी रोहितच्या भाषणाआधी पक्षातील ज्येष्ठ नेते म्हणाले, की 25 वर्षांच्या तरुणा विरोधात सगळे एकत्र आले आहेत. यावर रोहितने उत्तर दिले की “राष्ट्रवादी पक्ष आणि आबांचं कुटुंबीय हे या तालुक्यात सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलेले घटक आहेत. सगळे एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीचे निष्ठावान कार्यकर्ते अशी परिस्थिती आहे. येणाऱ्या काळात असा भीमटोला देण्याची आवश्यकता आहे. माने सर, आपण सांगितलं की 25 वर्षांच्या तरुणाला हरवायला सगळे जण एकत्र आले आहेत. माझं वय 23 आहे. 25 होईपर्यंत काही शिल्लक ठेवत नाही”

रोहित पाटील यांनी कवठेमहांकाळ नगरपंचायत स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतल्याने राष्ट्रवादी विरुद्ध महाविकास आघाडी असे पॅनल लागले आहे. कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या 13 जागांसाठी ही निवडणूक लागली आहे. येत्या 23 तारखेला मतदान पार पडणार आहे.

इतर बातम्या-

VIDEO : Anil Parab| आतापर्यंत 10 हजार कर्मचारी निलंबित, संपामुळे सतावर्तेंचं नुकसान होत नाही : अनिल परब

Ajit Pawar | हा अधिकार त्यांचाच आहे म्हणत अजित पवारांनी राज्यपालांना लोकशाहीचा धडा सांगितला, नेमकं काय म्हणाले?

तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा.
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का.
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया.
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया.
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा.
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार.
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा.
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का.
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा...
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा....
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी.