AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ajit Pawar Plane Crash : 5 की 6, विमानात नक्की किती लोक होते? उज्ज्वल निकम यांनी स्पष्टच सांगितलं

अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत सुरू असलेल्या तर्कवितर्कांवर ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांनी महत्त्वाची भूमिका मांडली आहे. पुराव्याविना घातपाताचा संशय व्यक्त करणे चुकीचे असल्याचे सांगत, त्यांनी जस्टिस लोया यांच्या मृत्यूबाबत केले जाणारे दावे देखील पुराव्यांच्या आधारे खोडून काढले आहेत.

Ajit Pawar Plane Crash : 5 की 6, विमानात नक्की किती लोक होते? उज्ज्वल निकम यांनी स्पष्टच सांगितलं
ajit pawar 1
| Updated on: Feb 02, 2026 | 12:46 PM
Share

उपमुख्यमंत्री अजित पवारांचे विमान अपघातात निधन झाले. यानंतर आता महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. अजित पवारांचा मृत्यू घातपात आहे, असा संशय व्यक्त केला जात आहे. त्यातच आता ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ आणि खासदार उज्ज्वल निकम यांनी अत्यंत कडक शब्दांत आपली भूमिका मांडली आहे. यावेळी उज्जवल निकम यांनी अजित पवारांशी संबंधित विमान अपघात आणि जस्टिस लोया यांच्या मृत्यूबाबत केले जाणारे दावे पुराव्यांच्या आधारे खोडून काढले आहेत.

त्या विमानात ६ प्रवासी होते

अजित पवारांच्या विमानाचा जो अपघात झाला, त्यावरून सध्या अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. यावर उज्ज्वल निकम म्हणाले की, “विमानाने प्रवास करताना प्रत्येक गोष्टीची नोंद असते. एखाद्या खासगी विमानाने प्रवास केला जातो, तेव्हा विमान प्राधिकरणाच्या (Aviation Authorities) अधिकाऱ्यांकडे त्याची रीतसर नोंद असते. मात्र, त्या विमानात ६ प्रवासी होते, असा कोणताही अधिकृत पुरावा आजवर समोर आलेला नाही.”

वेगळी कलाटणी देणे चुकीचे

विमानात इंधनाचा साठा मोठ्या प्रमाणात होता. त्यामुळे आग लागल्यानंतर मृतदेह पूर्णपणे जळून खाक झाले होते. जर कोणी यामागे कट (Conspiracy) असल्याचे म्हणत असेल, तर कायद्यानुसार तो सिद्ध करण्यासाठी ठोस पुराव्याची गरज असते. केवळ संशय व्यक्त करून एखाद्याच्या निधनासारख्या गंभीर विषयाला वेगळी कलाटणी देणे चुकीचे आहे, असे उज्ज्वल निकम यांनी म्हटले.

तसेच खासदार संजय राऊत यांनी जस्टिस लोया यांच्या मृत्यूबाबत पुन्हा एकदा शंका उपस्थित केल्यानंतर उज्ज्वल निकम यांनी वस्तुस्थिती मांडली. जस्टिस लोया हे एका लग्नकार्यासाठी नागपूरला गेले होते. त्या रात्री त्यांच्यासोबत जे इतर न्यायाधीश उपस्थित होते, त्यांच्याशी मी स्वतः वैयक्तिकरित्या बोललो होतो. त्यांचा मृत्यू हा हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानेच झाला होता. परंतु, अशा संवेदनशील विषयावर राजकारण करणे हे अत्यंत दुर्दैवी आहे, असे उज्ज्वल निकम यांनी म्हटले.

अपघात कसा झाला?

मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार हे बुधवारी सकाळी ८.१० च्या दरम्यान मुंबई विमानतळावरुन बारामतीच्या सभेसाठी निघाले होते. अजित पवारांचे विमान हे बारामती विमानतळाजवळ पोहोचले, पण बुधवारी लँडिंगच्या वेळी दृश्यमानता (Visibility) अत्यंत कमी होती. विमानतळावर सुरक्षित लँडिंगसाठी किमान ५ किलोमीटर दृश्यमानतेची गरज असते, मात्र अपघाताच्या वेळी ती केवळ ३ किलोमीटर इतकी होती. यामुळे वैमानिकाने सुरुवातीचे लँडिंग रद्द करून विमान पुन्हा हवेत वळवण्याचा (Go-around) प्रयत्न केला, मात्र त्याच दरम्यान हा भीषण अपघात घडला. या अपघातानंतर विमान कंपनीसोबतच बारामती विमानतळाबद्दलही अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

Follow Us
8 ते 10 दिवस थांबा, सर्व बाहेर येईल, सतीश सालियांन यांच्या सुचक...
8 ते 10 दिवस थांबा, सर्व बाहेर येईल, सतीश सालियांन यांच्या सुचक विधानाचा अर्थ काय?
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू-बदामावरून संजय शिरसाट संतापले; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदामावरून संजय शिरसाट संतापले; म्हणाले, आम्ही बदनाम...
शेतकऱ्यांची पिकं दुष्काळामुळे करपली अन् आढावा बैठकीत नेत्यांचा बदामावर
शेतकऱ्यांची पिकं दुष्काळामुळे करपली अन् आढावा बैठकीत नेत्यांचा काजु-बदामावर ताव
सर्वोच्च न्यायालयाची NTA ला पेपरफुटीप्रकरणी कडक ताकीद, उपाययोजनांची तप
सर्वोच्च न्यायालयाची NTA ला वरंवार पेपरफुटीप्रकरणी कडक ताकीद, उपाययोजनांची तपासणी
दिशा सालियान प्रकरण अपघात म्हणून मिटलं तरी... संजय राऊतांचां दावा
दिशा सालियान प्रकरण अपघात म्हणून मिटलं तरी... संजय राऊतांच्या मोठ्या दाव्याने खळबळ
गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान, दोन मंत्री...
गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान, दोन मंत्र्यांना तातडीचे आदेश
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान...
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान थेट वकीलांसह 'मातोश्री'ला जाणार
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, बंगाल...
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, नेमकं प्रकरण काय?
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठवताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट.... बंगालमध्ये राजकीय हालाचाली वाढल्या?