मध्ये काही बातम्या वाचायला मिळाल्या, पण त्यात माझीही चूक : अजित पवार

मध्ये काही बातम्या वाचायला मिळाल्या, पण त्यात माझीही चूक : अजित पवार
Ajit Pawar

नागपूर : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज (7 फेब्रुवारी) राज्याची उपराजधानी नागपूरला भेट दिली. यावेळी त्यांनी नागपूरला अधिवेशन न घेण्यापासून त्यांची लांबलेली नागपूर भेटीसह अनेक गोष्टींवर भाष्य केलं. अजित पवार यांनी नागपूरला येणं टाळलं अशा स्वरुपाच्या बातम्यांवरुनही अजित पवारांनी माध्यमांसमोर नाराजी व्यक्त केली. मध्ये काही बातम्या वाचायला मिळाल्या. यात खरंतर माझीही चूक असल्याचीही कबुली अजित पवारांनी दिली (Ajit Pawar Press Conference in Nagpur comment on GST Corona Vaccination etc).

अजित पवार म्हणाले, “मध्ये बातम्या पण मला अशा वाचायला मिळाल्या. खरंतर यात माझीही चूक आहे. मी माझी चूक नाही असं म्हणणार नाही. माझ्याकडून काही कळण्याआधीच ‘अजित पवार यांनी नागपूरला येणं टाळलं’ अशा बातम्या वाचायला मिळाल्या. वास्तविक मी प्रत्येक विभागाच्या डीपीसीच्या बैठका घेतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी देखील घेतल्या. सर्वच विभागांमध्ये जाण्याचा आमचा प्रयत्न आहे. मागे जयंत पाटील देखील अर्थमंत्री असताना त्यांनी त्यांच्या परीने काम केलं. मी पण माझ्या परीने काम करतो. आजही मी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. मिहानबद्दल अलिकडे बैठक झाली नाही असंही अधिकाऱ्यांनी सांगितलं. त्यासाठी पाठपुरावा आवश्यक आहे.”

आपल्याकडे मुक्त प्राणीसंग्रहालय असावं अशी इच्छा होती. तेही झालं. पण, आजच्या घडीला देखील केंद्र सरकारने जे वन नेशन वन टॅक्स ठरवलं होतं, संसदेत शब्द दिला. पण 25 हजार कोटी रुपये दिलेले नाहीत. त्याचा परिणाम राज्यातील विकासावर होतोय. आम्हाला पगार तर द्यावाच लागतो, असंही अजित पवार यांनी नमूद केलं.

अजित पवार यांच्या पत्रकार परिषदेतील प्रमुख मुद्दे

 • शिक्षण, वैद्यकीय खात्याचा निधी कट होऊ दिला नाही
 • आम्ही आमदार निधी वाढविला, मात्र केंद्राने खासदार निधी कमी केला
 • मार्केटमध्ये तेजी यावी यासाठी आम्ही प्रयत्न केला त्याला चांगला प्रतिसाद मिळाला
 • केंद्राच्या बजेटकडे आपण लक्ष ठेऊन होतो, मात्र त्यातून काही मिळालं नाही
 • सिमेंट, लोखंडाच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या
 • गडकरी यांनी रस्ते बनविताना वेगवेगळे प्रयोग केले त्यामुळे खर्च कमी झाला ते चांगलं आहे
 • पेट्रोलच्या बॅरेलचा दर कमी झाला होता, तरी पेट्रोल, डिझेल, गॅसच्या किमती प्रचंड वाढल्या. याचा सरळ संबंध सामान्य माणसासोबत येतो. त्यामुळे प्रत्येक गोष्ट महाग होत आहे
 • लसीकरणाची काम केंद्रानेच करायला पाहिजे होतं, कारण त्याचा राज्याला मोठा भार पडतो
 • काही ठिकाणी लसीकरण कमी प्रमाणात होत आहे याची कारण काय? या विषयी लोकांच्या मनात शंका आहेत त्या दूर करायला पाहिजे
 • केंद्राला अर्थ संकल्प सादर करताना तारेवरची कसरत करावी लागली, तिच इथे पण करावी लागणार आहे, सगळी परिस्थिती पाहून अर्थ संकल्प सादर करावा लागेल, आम्ही सगळे मंत्री एकत्रित बसून त्यावर विचार करू
 • महाविकास आघाडीत कुठलाही विसंवाद नाही, आम्ही सगळे बसून निर्णय घेत असतो
 • सगळ्यांनी आपल्या ताकतीवर स्वराज्य संस्थांच्या निवडणूक लढल्या, आम्ही एकत्र काम करतो, त्यात कुठलाही विसंवाद नाही
 • जो कोणी अर्थ मंत्री असतो त्याला नेहमी व्हिलनच ठरवलं जातं
 • धोरण राबवता येतं, मात्र तिजोरीचा विचार सुद्धा करावा लागतो
 • शेतकरी कर्जमाफी केली

Ajit Pawar Press Conference in Nagpur comment on GST Corona Vaccination etc

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI