राज्यात नोटीस देण्याची पद्धत नव्हती, जबाबदार व्यक्तीने बोलताना भान बाळगावं; अजितदादांचा सल्ला

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना आलेल्या नोटिशीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वक्तव्य केलं आहे. नोटीशी देण्याची पद्धत राज्यात नव्हती. पण जबाबदार व्यक्तीनेही बोलताना भान बाळगलं पाहिजे, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

राज्यात नोटीस देण्याची पद्धत नव्हती, जबाबदार व्यक्तीने बोलताना भान बाळगावं; अजितदादांचा सल्ला
ajit pawarImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 13, 2022 | 8:19 AM

पुणे: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना आलेल्या नोटिशीवर उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी वक्तव्य केलं आहे. नोटीशी देण्याची पद्धत राज्यात नव्हती. पण जबाबदार व्यक्तीनेही बोलताना भान बाळगलं पाहिजे, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. अजित पवार यांनी सकाळपासून पुण्यातील (pune) विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करण्याचे काम सुरू केले आहे. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांना नोटीस आली आहे. त्याबाबत अजित पवार यांना विचारण्यात आलं होतं, त्यावर त्यांनी हा सल्ला दिला. तसेच जनतेला राजकारण्यांचे एकमेकांवरील आरोप-प्रत्यारोप ऐकण्यात अजिबात रस नाही. त्यांना त्यांच्या भागाचा विकास हवा आहे, असंही अजित पवार म्हणाले. दरम्यान, पोलीस आज देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी जाऊन त्यांनी केलेल्या आरोपांची माहिती घेणार आहेत. त्यामुळे त्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

नोटीसा देण्याची परिस्थिती कधीही नव्हती. या संदर्भात वेगवेगळ्या यंत्रणांचा वापर करणं योग्य नाही. मी पंतप्रधानांसमोर याबाबत थोडंबहुत विधान केलं होतं. प्रत्येकानं आपआपलं काम करावं. जनतेने ज्यांना पाठिंबा दिला आहे, लोकशाहीत जनता ज्यांच्या पाठिशी असेल त्यांनी त्यांच्या पद्धतीने काम करावं असं माझं मत आहे. यशवंतराव चव्हाणांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर पदावरील व्यक्तीने कसं वागलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे, कसं काम केलं पाहिजे, कसं सर्वांना घेऊन गेलं पाहिजे याचा आदर्श घालून दिला आहे. हे सर्व स्तरावर झालं पाहिजे. लोकांना एकमेकांवरील आरोप-प्रत्यारोप ऐकण्यात अजितबात रस नाही, असं अजित पवार यांनी सांगितलं.

सर्वांनी मिळून बंद केलं पाहिजे

सूसच्या लोकांचे पाणी, वीज, स्मशानभूमी, ड्रेनेजचे प्रश्न आहेत. पण हे प्रश्न राहतात बाजूला अन् नोटिसा काढल्या जातात. त्याबाबतची विधाने होतात. यात वेळ घालवला जातो. सर्वांनी मिळून हे बंद केलं पाहिजे. विकासाला प्राधान्य दिलं पाहिजे, असंही ते म्हणाले.

अजितदादांचे आजचे कार्यक्रम

  1. सकाळी 7 वाजता सुस गाव येथील नाला व रस्ता रूंदीकरणाच्या कामांची पाहणी
  2. सकाळी 7.30 वाजता वारजे माळवाडी येथे क्रीडा संकुल व क्लब हाऊस- भूमिपूजन समारंभ
  3. सकाळी 8 वाजता- वारजे येथे कै. सुभदा प्रभाकर बराटे मल्टिस्पेशालिटी व मॅटर्निटी रूग्णालयास सदिच्छा भेट
  4. सकाळी 8.30 वाजता- शिवणे येथे शिवणे-नांदेड पूलाचा उद्घाटन समारंभ व विविध विकास कामांचे लोकार्पण, उद्घाटन व भूमिपूजन
  5. सकाळी 9 वाजता कात्रज डेअरी सरहद शाळा चौक येथे कात्रज डेअरीमधून जाणारा 24 मीटर सहकार महर्षी मामासाहेब मोहोळ रस्ता लोकार्पण सोहळा
  6. सकाळी 9.45 वाजता- राजीव गांधी नगर बालाजी नगर, पुणे येथे स्व.माणिकचंद नारायणदास दुगड रूग्णालयाचा लोकार्पण सोहळा
  7. सकाळी 10.25 वाजता- सुखसागर नगर येथे विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा 1) डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम क्रीडा संकुल 2) पोलीस चौकी 3)महिला बचत गट कार्यालय 4) कै. किसनराव माऊली कदम उद्यान प्रयाण
  8. सकाळी 11 मिठानगर, काँढवा खुर्द, येथे 1) माँ खदीजा (र.अ.) प्रसुतिगृहाचा लोकार्पण सोहळा 2) हजरत अब्दुल रहेमान (रहे) ओटा मार्केटचा लोकार्पण सोहळा
  9.  सकाळी 11.45 वाजता- कौसर बाग येथे विविध विकास कामांचा भूमिपूजन कार्यक्रम 1) डॉ. सय्यदना मोहम्मद बुराउद्दीन उद्यान 2) ‘बाग जन्नत’ कब्रस्तान 3)मुख्य भैरोबानाला ते एन.आय.बी.एम परिसर मलवाहिनी
  10. दुपारी 12.30 वाजता वानवडी येथे विविध विकास कामांचा भूमिपूजन / लोकार्पण सोहळा 1) 45 फूट उंच राष्ट्रध्वज भूमिपूजन 2) 100 बेडचे रूग्णालय व 3) बॅडमिंटन हॉल लोकार्पण
  11. दुपारी 1.15 वाजता 110 रामटेकडी, प्रभाग क्र. 24 येथे विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा – 1) पंचशील बुद्ध विहार 2) डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन
  12.  दुपारी 3 वाजता कृषिभवन, शिवाजीनगर येथे जिल्हास्तरीय धान्य महोत्सव कार्यक्रमास भेट
  13. दुपारी 4.10 वाजता पंचशील चौक, ताडीवाला रोड, पुणे येथे आगमन नूतनीकृत शिल्पाचे लोकार्पण
  14. दुपारी 4.30 वाजता प्रभाग क्र. फुलेनगर-नागपूर चाळ, आळंदी रोड येथे स्वर्गीय माजी महापौर भारतजी सावंत पाम उद्यानाचे उद्घाटन
  15. सायंकाळी 5.15 वाजता धानोरी जकात नाका, धानोरी येथे विविध विकास कामांचे उद्घाटन 1) राजयोग मेडिटेशन सेंटर 2) अग्निशामक केंद्र 3) माजी सैनिक सांस्कृतिक भवन 4) भव्य उद्यान
  16. सायंकाळी 6 वाजता वडगांव शिंदे रोड, लोहगाव, येथे’ब्रिलियंट इंटरनॅशनल स्कूल’ भूमिपूजन सोहळा
  17. सायंकाळी 6.50 वाजता प्रभाग क्रं. 03, खराडी, येथेऑक्सिजन पार्कचे भूमिपूजन व सभा

संबंधित बातम्या:

दिवसभर घरीच असेल कधीही या, देवेंद्र फडणवीसांचं ट्विट; पोलीस सागर बंगल्यावर येऊन चौकशी करणार

अजित पवारांच्या 31, चंद्रकांत पाटलांच्या १० कार्यक्रमांचे पुण्यात उद्घाटन

खासदार सुनील मेंढे कबड्डीच्या आखाड्यात उतरतात तेव्हा… दोघांना केलं चितपट, सुनील मेंढेंचा व्हिडीओ व्हायरल

Non Stop LIVE Update
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?.
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका.
माझ्याशी विश्वासघात केला की सत्यनाश, देवेंद्र फडणवीस काय नेमक म्हणाले?
माझ्याशी विश्वासघात केला की सत्यनाश, देवेंद्र फडणवीस काय नेमक म्हणाले?.
पहाटेच्या शपथविधीवरील दाव्यामध्ये गोंधळ, एका आठवड्यात दादांचे दोन दावे
पहाटेच्या शपथविधीवरील दाव्यामध्ये गोंधळ, एका आठवड्यात दादांचे दोन दावे.
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे मुंबईतील 'या' मतदारसंघातून अपक्ष लढणार?
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे मुंबईतील 'या' मतदारसंघातून अपक्ष लढणार?.
जरांगेंना काहीच समजत..., जरांगे आणि छगन भुजबळांमध्ये पुन्हा वार-पलटवार
जरांगेंना काहीच समजत..., जरांगे आणि छगन भुजबळांमध्ये पुन्हा वार-पलटवार.
मोदी-अमित भाईंचा फोन गेला की टाटा सरळ..., अजित पवारांचं विधान वादात
मोदी-अमित भाईंचा फोन गेला की टाटा सरळ..., अजित पवारांचं विधान वादात.
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.