संस्था चालवण्यासाठी प्रमुख कोण हे महत्त्वाचं, शिवराम भाऊंनी तळहाताच्या फोडासारखं बँकेला जपलं, अजित पवारांकडून उजाळा

संस्था चालवण्यासाठी प्रमुख कोण हे महत्त्वाचं, शिवराम भाऊंनी तळहाताच्या फोडासारखं बँकेला जपलं, अजित पवारांकडून उजाळा
ajit pawar

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे चक्रीवादळ, अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान व मदत आणि पुनर्वसनाचा आढावा या बैठकीत घेतला जाणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री काय घोषणा करणार, याकडे नागरिकांचे लक्ष आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: मनोज कुलकर्णी

Dec 26, 2021 | 1:24 PM

सिंधुदुर्गः कुठलिही संस्था चालवणारा प्रमुख कोण असतो, यावर तिचे यशापयश अवलंबून असते. शिवराम भाऊंनी तळहाताच्या फोडासारखं बँकेला जपलं, असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. पवार डीपीडीसी बैठकीसाठी आणि कोरोनाचा आढावा घेण्यासाठी आले असताना बोलत होते. यावेळी त्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना जोरदार टोले हाणले.

काय म्हणाले पवार?

अजित पवार यांनी सुरुवातीला सर्वांना नवीन वर्षाच्या आणि नाताळच्या शुभेच्छा दिल्या. आपण डीपीडीसी आणि कोरोनाचा आढावा घेण्यासाठी आलो असल्याचे सांगितले. शिवराम भाऊ जाधव यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सहकाराचे मोठे काम करून ठेवले आहे. त्यांच्याशिवाय या जिल्ह्याचा इतिहास लिहिताच येणार नाही. हेच ध्यानात घेता यावेळी अजित पवारांनी शिवराम भाऊ जाधवांच्या कार्याला उजाळा दिला. ते म्हणाले, शिवराम भाऊंनी तळहाताच्या फोडासारखं बँकेला जपलं. कुठली संस्था चालवायची असेल, तर त्याचा प्रमुख कोण याला महत्त्व असतं. किंवा पाठिशी कोण राहणार याला ही महत्त्व असतं, हे सांगायलाही ते विसरले नाहीत.

राणेंना टोला

अजित पवार म्हणाले की, बँक ही त्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची आर्थिक नाडी म्हणून ओळखली जाते. खरे तर इथे पीक कर्ज इथे कमी दिलं जातं. मात्र, आमच्याकडं हजारो कोटी दिलं जात असल्याचं त्यांनी सांगितलं. अजित पवार म्हणाले की, पूर्वी सतीश सावंत यांच्या मागे असणारी मंडळी काय काय काम सांगायची. तसं नसतं, बँक ही बँक असते, असे म्हणत त्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना टोला हाणला. शिवाय फार विचारपूर्वक मतदान करा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

पहिलाच दौरा

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे सिंधुदुर्ग येथील चिपी विमानतळावर विशेष विमानाने आगमन झाले. यावेळी त्यांच्यासोबत गृहराज्य मंत्री सतेज पाटील देखील उपस्थित होते. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी या दोघांचेही विमानतळावर स्वागत केले. राष्ट्रवादीचे कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत व महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही यावेळी मंत्र्यांचे स्वागत केले. अजित पवार यांचा हा पहिलाच सिंधुदुर्ग दौरा आहे. ते यावेळी जिल्हा मुख्यालयातील डीपीडीस सभागृहात सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीच्या कामकाजाचा घेणार आढावा आहेत.

घोषणांकडे लक्ष

डीपीडीसी बैठकीसोबत जिल्ह्यातील कोविड 19 विषाणू प्रादुर्भाव व उपाय योजनांचा आढावा यावेळी घेतला जाणार आहे. जिल्ह्याचे चक्रीवादळ व अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान व मदत व पुनर्वसनाचा देखील घेणार आढावा यावेळी घेण्यात येणार असल्याचे समजते. बैठकीला पालकमंत्री उदय सामंत, गृहराज्य मंत्री सतेज पाटील, माजी पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक उपस्थित राहणार आहेत. उपमुख्यमंत्री या दौऱ्यात काय घोषणा करतात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

इतर बातम्याः

Salman Khan : सलमान खानला सापानं केला दंश; पनवेलच्या फार्महाऊसमधली घटना

मांडवलीसाठी नाशिकमध्ये उद्योजकाला मागितली 2 कोटींची खंडणी; भूमाफियाची तुरुंगातून उठाठेव

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें