इच्छाशक्ती असेल तर कॅन्सरवरही मात करता येते, आबांच्या आठवणीने अजित पवार भावूक

"आर. आर. पाटील यांनी सांगितलेलं ऐकलं असतं तर ते आपल्यात असते", असं सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar remember RR Patil) यांनी राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर. आर. पाटील यांची आठवण काढली.

इच्छाशक्ती असेल तर कॅन्सरवरही मात करता येते, आबांच्या आठवणीने अजित पवार भावूक

पुणे : “आर. आर. पाटील यांनी सांगितलेलं ऐकलं असतं तर ते आपल्यात असते”, असं सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar remember RR Patil) यांनी राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर. आर. पाटील यांची आठवण काढली. बारामतीत आज (8 मार्च) कॅन्सर तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन अजित पवार यांच्या (Ajit Pawar remember RR Patil) हस्ते करण्यात आले.

“आर. आर. पाटील यांनी सांगितलेलं ऐकलं असतं तर ते आपल्यात असते. आर.आर. पाटील ब्रीच कॅन्डीमध्ये दाखल झाले. डॉक्टरांनी आर.आर. पाटील यांच्यावर शस्त्रक्रिया केली. त्यानंतर पवारसाहेबांना मी याची माहिती दिली. मी देखील आर.आर. पाटील यांना भेटलो, तेव्हा आर. आर. पाटील यांनी हातात हात घेतला आणि दादा, तुमचे दहा वर्षापूर्वी ऐकले असते, तर ही अवस्था झाली नसती असे म्हटले”, असं अजित पवार यांनी सांगितले.

“आर. आर. पाटील यांची आठवण काढत अजित पवार भावनिक झाले होते. त्याचवेळी त्यांनी शरद पवार यांनी कॅन्सरशी दिलेल्या लढ्याचं उदाहरणंही उपस्थितांना दिलं. जेव्हा पवारसाहेबांना कॅन्सर झाला तेव्हा त्यांनी तातडीने शस्त्रक्रिया केली. तेथे डॉक्टर त्यांना वेगळे काही सांगत होते, मात्र पवारसाहेबांनी त्या डॉक्टरांना अगोदर तुम्हाला पोचवेन, नंतर मी जाईन असे सांगतिले होते. इच्छाशक्ती असेल तर कॅन्सरवरही मात शक्य करता येते”, असही अजित पवार यांनी सांगितले.

अजित पवार म्हणाले, “2004 च्या निवडणुकीवेळी तुमचे सरसेनापती नाहीत, आता तुम्हालाच प्रचार करायचाय असं पवारसाहेबांनी सांगितल्यानंतर आमच्या डोळ्यात पाणी आलं.”

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *