Ajit Pawar: यातले तर आमचेच तिकडं गेलेत, भाजप आमदारांची डबल नावं टाकून यादी वाढवण्याची शक्कल अजित पवारांनी सभागृहात उघडी पाडली

उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी आज सभागृहात (vidhan sabha) भाजप (bjp) नेत्यांची पोलखोल करत त्यांची चांगलीच गोची केली. धानाच्या संदर्भात मागणी करण्याचं एक निवेदन भाजपने दिलं होतं.

Ajit Pawar: यातले तर आमचेच तिकडं गेलेत, भाजप आमदारांची डबल नावं टाकून यादी वाढवण्याची शक्कल अजित पवारांनी सभागृहात उघडी पाडली
भाजप आमदारांची डबल नावं टाकून यादी वाढवण्याची शक्कल अजित पवारांनी सभागृहात उघडी पाडलीImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 25, 2022 | 6:49 PM

मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी आज सभागृहात (vidhan sabha) भाजप (bjp) नेत्यांची पोलखोल करत त्यांची चांगलीच गोची केली. धानाच्या संदर्भात मागणी करण्याचं एक निवेदन भाजपने दिलं होतं. या निवेदनात भाजप नेत्यांनी डबल डबल सह्या केल्या होत्या. अजित पवार यांनी या सह्या कशा डबल झाल्या आहेत हे दाखवून दिलं. तसेच आमदारांची नाव डबल टाकून यादी वाढवण्याची भाजपची शक्कलही उघडी पाडली. तसेच या यादीत ज्या आमदारांची नाव होती, त्यातील 30 ते 35 टक्के आमदार आमच्याकडूनच तुमच्याकडे गेलीत असं सांगून अजितदादांनी विरोधकांची फिरकीही घेतली. हे सांगताना अजितदादांनी थेट विरोधकांची नावही घेतली. अजितदादांनी पोलखोल केल्यावर भाजप आमदारांनी त्यावर आक्षेप घेण्यास सुरुवात केली. तेव्हा चुकलं ते चुकलं हे मान्य करा. डबल सह्या करून आकडा वाढवण्याचा प्रयत्न झालाय, असं सांगत विरोधकांना सुनावलेही.

उपमुख्यमंत्री अजित पवार आज सभागृहात अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलत होते. यावेळी त्यांनी विरोधकांना चांगलेच धारेवर धरले. फडणवीस साहेब मला मुख्यमंत्र्यांकरीता एक पत्रं दिलं गेल. त्यात तुमची सहीच नाही. बाकीच्यांच्या सह्या आहेत. मुनगंटीवार यांनी स्वत:ची पहिली सही घातली. राधाकृष्ण विखे पाटील आमच्यातून तुमच्याकडे गेले त्यांची दुसरी सही घातली. बाकी बबनराव पाचपुते वगैरे त्यातले दहा वीस टक्के तर आमच्यातून तुमच्याकडे गेले आहेत. ते काही बाहेरची लोक नाहीत, असं अजितदादा म्हणाले.

अजितदादा म्हणाले की,

विधानसभेत बोलताना अजित पवार यांनी आपल्या भाषणात म्हटलंय की,…

या सह्या करतानाची गंमत दाखवतो. एका पानावर राधाकृष्ण विखे पाटलांची सही आहे. दादाजी केचे यांची सही आहे. श्वेताताई महालेंची सही आहे. पुढे गेला तर राधाकृष्ण विखे पाटलांची सही आहे. दादाराव केचेंची पुन्हा सही आहे. आणि पुन्हा श्वेता महालेंची सही आहे. (अजितदादा वाचत असतानाच दोन निवेदने असतील अशी ओरड विरोधकांनी सुरू केली.) नाही बाबा दोन कॉप्या नाहीत. मी बारकाईने गिरीशजी बघितलं. नाही साहेब… हे बघा जे चुकलं ते चुकलं. डबल डबल सह्या करून आकडा वाढवण्याचा प्रयत्न केला. मी आता दाखवतो ना. त्यात विशेष काही नाही.

तुम्हाला कसं सांभाळून घेतलं काय माहीत?

विरोधकांनी धानाबाबत एकरी धानाबाबत काही मागणी केली होती. हरकत नाही. एकरी काढण्याच्या संदर्भात आम्ही सूचना केल्या आहेत. तुम्ही थोडंही पेशन्स ठेवत नाही. तुम्हाला कसं काहींनी संभाळलं कुणास ठावूक?, असा टोलाही त्यांनी लगावला.

संबंधित बातम्या:

CM Uddhav Thackeray: कोविड घोटाळ्यापासून मलिकांच्या राजीनाम्यापर्यंत; मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील 10 मोठे मुद्दे

मुंबई ते दिल्ली “पेनड्राईव्ह बॉम्ब”ची दहशत, मुंबईत फडणवीस तर दिल्लीत नवनीत राणांकडून पुरावे सादर

Maharashtra News Live Update : केंद्रानं दिलेली व्हेंटिलेटर चालली नाहीत, त्याची टेंडर काढलेली का? : उद्धव ठाकरे

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.