AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तूर्तास धनंजय मुंडे यांचा राजीनामा नाही?, दमानियांचे पुरावे, मुख्यमंत्र्यांची भेट; आता अजितदादा नेमकं काय म्हणाले?

अंजली दमानिया यांनी अजित पवार यांची भेट घेतली होती, त्यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली, त्यानंतर आज अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे, या भेटीकडे राज्याचं लक्ष लागलं होतं.

तूर्तास धनंजय मुंडे यांचा राजीनामा नाही?, दमानियांचे पुरावे, मुख्यमंत्र्यांची भेट; आता अजितदादा  नेमकं काय म्हणाले?
ajit pawar dhananjay munde
| Updated on: Jan 28, 2025 | 6:10 PM
Share

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती, त्यांनी मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली, त्यानंतर आज अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे, या भेटीकडे राज्याचं लक्ष लागलं होतं. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत या भेटीत काय निर्णय होणार याबाबत मोठी उत्सुकता होती, त्यावर आता अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नेमकं काय म्हणाले अजित पवार? 

दमानिया यांनी काही कागदपत्रं माझ्याकडे दिली आहेत. मी ती घेतली पाहिली. मी आज रात्री मुख्यमंत्र्यांची भेट घेणार होतो.  पण त्यांना नागपूरला जायचं असल्यानं मी त्यांना आत्ताच भेटलो. त्यांनी मला सांगितलं तुम्हाला जशा दमानिया भेटल्या तशा त्या मलाही भेटल्या. मलाही त्यांनी काही कागदपत्रं दिले आहेत. या प्रकरणात तीन प्रकारच्या चौकशा सुरू आहेत. एसआयटी, सीआयडी आणि न्यायालयीन. ही कागदपत्रे मी सीआयडी आणि एसआयटीकडे दिली आहेत.  कुणी पुरावे दिले तर त्याची शहानिशा करावी लागते, म्हणून ते सीआयडी आणि एसआयटीकडे देण्यात आले आहेत.  जी वस्तुस्थिती समोर येईल त्यानुसार पुढच्या गोष्टी काय करायच्या ते ठरवलं जाईल, असं मुख्यमंत्री यांनी सांगितल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान ते पुढे बोलताना म्हणाले की,  मी आणि मुख्यमंत्र्यांनी आधीपासूनच सांगितलं. जी घटना सरपंचांच्याबाबत बीड जिल्ह्यात घडली. त्याची चौकशी सुरू आहे. दोषी असतील त्यांना फाशी दिली पाहिजे, तसा प्रयत्न सुरू आहे. चौकशी चालू आहे. कुणाची आणखी नावे आली तर त्यावरही कारवाई केली जाईल. पण कुणाचा संबंधच नसेल तर कारवाईचा प्रश्नच येत नाही. संबंध असेल तर कुणालाही पाठी घालणार नाही. ही माझी, मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे यांची भूमिका आहे. माझ्यावर आरोप झाले, तेव्ही मी राजीनामा दिला होता. माझी गोष्ट वेगळी होती. माझ्या वेळी जी घटना घडली होती मला ते असह्य झालं, म्हणून मी राजीनामा दिला. आता चौकशी सुरू आहे. दोषींना पाठिशी घालणार नाही, कारवाई केली जाईल, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

Follow Us
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...
पुण्यातील लक्ष्मी रोडवरील प्रमुख 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद, बापट म्हणाले...
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर...
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर आरोप
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर...
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर हल्लाबोल
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला