AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘त्यांनी विद्यार्थ्यांना फोडाफोडीची अन् गद्दारीची…’; गुलाबराव पाटलांवर दानवेंचा हल्लाबोल

अंबदास दानवे यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी शेतकरी कर्जमाफीवर बोलताना आता थेट इशारा दिला आहे.

'त्यांनी विद्यार्थ्यांना फोडाफोडीची अन् गद्दारीची...'; गुलाबराव पाटलांवर दानवेंचा हल्लाबोल
| Updated on: Apr 13, 2025 | 5:46 PM
Share

शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी पुन्हा एकदा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.  आम्ही जसे पक्षातील कार्यकर्ते फोडतो तसे तुम्ही विद्यार्थी फोडा असं वक्तव्य शाळेतील पटसंख्या वाढवण्यासंदर्भात बोलताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं होतं, पाटील यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना दानवे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

नेमकं काय म्हणाले दानवे?

आम्ही जसे पक्षातील कार्यकर्ते फोडतो तसे तुम्ही विद्यार्थी फोडा असं वक्तव्य शाळेतील पटसंख्या वाढवण्यासंदर्भात बोलताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं होतं, पाटील यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना दानवे यांनी जोरदा टोला लगावला आहे. मला वाटतं की गद्दारीची आणि फोडाफाडीची सवय त्यांनी विद्यार्थ्यांना लावू नये, असा टोला यावेळी अंबादास दानवे यांनी मंत्री पाटील यांना लगावला आहे.

दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली, या भेटीवेळी त्यांनी आपल्या फाईलींवर अर्थ खातं सह्या करत नसल्याची तक्रार अमित शाह यांच्याकडे केली. यावर देखील दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सगळे मिळूनच या गोष्टी करत असतात, जशा यांच्या फाईल अडवल्या जातात तशा त्यांचीही काही गोष्टी अडवल्या जातात. मला असं वाटतं हे राज्याच्या मंत्रिमंडळातील मोठे नेतेच करत असतात. ज्याच्यात दम आहे त्याच्या फाईली बरोबर मंजूर होतात, असं यावेळी दानवे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान सध्या शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून राज्यात पुन्हा एकदा वातावरण तापण्याची शक्यता आहे. महायुतीच्या नेत्यांच्या कर्जमाफीसंदर्भातील वक्तव्यांमुळे कर्जमाफी संदर्भात शेतकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम असल्याचं दिसून येत आहे. यावर देखील दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या सरकारने त्यांच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचं आश्वासन दिलं होतं. हे सरकारने पूर्ण केलं पाहिजे.आता फक्त शेतकरी आवाज उठवत आहेत, येणाऱ्या काळात सर्व पक्ष मिळून जनआंदोलन या महाराष्ट्रात उभा करू असा इशाराही यावेळी दानवे यांनी दिला आहे.

Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा