AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मला ऑफर आली तर… त्या 8 खासदारांबाबतही अमोल कोल्हे काय म्हणाले, तातडीची पत्रकार परिषद घेत..

गेल्या दोन आठवड्यापासून राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. 6 खासदारांनी मोठी बंडखोरी केल्यानंतर एका आमदारानेही बंडखोरी केली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या खासदारांबद्दलही विविध चर्चा या रंगताना दिसल्या.

मला ऑफर आली तर... त्या 8 खासदारांबाबतही अमोल कोल्हे काय म्हणाले, तातडीची पत्रकार परिषद घेत..
Amol Kolhe
| Updated on: Jul 02, 2026 | 11:34 AM
Share

शिवसेना ठाकरे गटाच्या तब्बल 6 खासदारांनी मोठी बंडखोरी केली. त्यानंतर एक आमदारही एकनाथ शिंदेंच्या गळ्याला लागला. ठाकरे गटातील काही आमदार शिवसेना शिंदे गटात प्रवेश करतील, अशी चर्चा आहे. एका मागून एक मोठे धक्के शिवसेना ठाकरे गटाला बसत आहेत. एकनाथ शिंदे यांच्याकडून दुसऱ्या आठवड्यात दुसरा मोठा धक्का ठाकरे गटाला देण्यात आला. बंडखोरी खासदारांच्या मतदार संघात उद्धव ठाकरेंनी सभा घेतल्या. या सभा घेऊन उद्धव ठाकरे मुंबईत दाखल होताच सचिन आहिर यांनी थेट विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी अर्ज दाखल केला. सचिन आहिर हे आदित्य ठाकरेंच्या अत्यंत जवळचे नेते समजले जायचे. त्यांच्या शिंदे गटातील प्रवेशाने मोठा दणका बसला. शिंदे गटात प्रवेश करताच सचिन आहिर यांना थेट उपसभापतीपद मिळाले. यादरम्यानच खासदार अमोल कोल्हे बंडखोरी करणार असल्याची चर्चा रंगताना दिसली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी महायुतीबद्दल वक्तव्य केले. ज्यानंतर अमोल कोल्हे भाजपात जाणार असल्याची जोरदार चर्चा रंगताना दिसली. यावर आता अमोल कोल्हे बोलताना दिसले. अमोल कोल्हे म्हणाले की, मी रेल्वेच्या प्रश्नावर बोलत होतो आणि तशी काही ऑफर आहे का? असा प्रतिप्रश्न केला होता. त्यानंतर सध्याच्या राजकीय घडामोडींमध्ये वेगळा अर्थ काढला गेला.

पुणे नाशिक हायस्पीड रेल्वेबद्दलचा तो प्रश्न होता आणि त्याच्यावर माझे उत्तर होते. ऑफरवर विचार करू, या माझ्या वक्तव्याचा वेगळा अर्थ काढला गेला. पुणे नाशिक रेल्वेसंदर्भात माझे विधान होते. कधी कधी मला वाटते की, काही लोक दिवसा स्वप्न बघतात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हा पक्ष एकत्रच आहे आणि एकत्रच राहिल. मी एका वाक्यात सांगतो की, शरद पवार जे सांगतील ते धोरण आणि म्हणतील ते तोरण.

ही चर्चा कायम होत राहते. सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली आमचे 8 ही खासदार आम्ही ठामपणे एकत्र आहोत. शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ठामपणे एकत्र आहोत. त्यामुळे ज्यावेळी अशा काही काही चर्चा आणि वाबड्या उडतात, त्यावेळी फारसे लक्ष देत नाही. आम्ही पक्षात असून आमच्यापर्यंत अशा काही सूचना येत नाहीत. किंवा आमच्या काही गट आहेत, हे आम्हालाच माहिती नसते. पण सूत्रांना मात्र माहिती असते.

Follow Us
खाटूश्याम दर्शनाहून परतताना काळाचा घाला! धुळ्यातील 9 भाविकांचा...
खाटूश्याम दर्शनाहून परतताना काळाचा घाला! धुळ्यातील 9 भाविकांचा राजस्थानमध्ये भीषण अपघात
मुंबईत हुडहुडी! 11 वर्षांतील नोव्हेंबरमधील नीचांकी तापमानाची नोंद...
मुंबईत हुडहुडी! 11 वर्षांतील नोव्हेंबरमधील नीचांकी तापमानाची नोंद, प्रदूषणातही वाढ
मुंबईच्या रस्त्यांवर धावपटूंचा उत्साह! WNC नेव्ही हाफ मॅरेथॉनला शेकडो.
मुंबईच्या रस्त्यांवर धावपटूंचा उत्साह! WNC नेव्ही हाफ मॅरेथॉनला शेकडो धावपटूंचा प्रतिसाद
मंत्र्यांचे भाषण सुरू असतानाच भाजपच्या माजी आमदारांना व्यासपीठावरच...
मंत्र्यांचे भाषण सुरू असतानाच भाजपच्या माजी आमदारांना व्यासपीठावरच लागली डुलकी; VIDEO व्हायरल!
मुंबई जिल्हा बँकेत शिवसेना अतिरिक्त एका जागेसाठी आग्रही? अहिर म्हणाले?
Sachin Ahir : मुंबई जिल्हा बँकेत शिवसेना अतिरिक्त एका जागेसाठी आग्रही? सचिन अहिर काय म्हणाले?
मविआच्या कार्यकाळात पोलिसांच्या सुविधा मागे पडल्याचा देवेन भारतींचा...
Deven Bharati : डायल 112 पासून GPS ट्रॅकिंगपर्यंत…; मविआच्या कार्यकाळात पोलिसांच्या सुविधा मागे पडल्याचा देवेन भारतींचा दावा
चारा नसलेल्याने जनावरे डोंगरात सोडून देण्याची शेतकऱ्यांवर वेळ
Dharashiv Farmer : चारा नसलेल्याने जनावरे डोंगरात सोडून देण्याची शेतकऱ्यांवर वेळ
बाभळीच्या काट्यांच्या ढिगाऱ्यात भाविकांच्या उड्या; पुरंदरमधील गुळुंचे
Pune : बाभळीच्या काट्यांच्या ढिगाऱ्यात भाविकांच्या उड्या; पुरंदरमधील गुळुंचे गावची अनोखी काटेबारस यात्रा, व्हिडिओ बघाच
एकजूट नसल्यामुळेच यश...; EVM हटावच्या मागणीवर चंदनशिवे स्पष्टच बोलले
Nitin ChandanShive : एकजूट नसल्यामुळेच यश...; EVM हटावच्या मागणीवर नितीन चंदनशिवे स्पष्टच बोलले
माझ्याबाबत पवारांच्या मनात संशयाचं...; नरहरी झिरवाळांचं मोठं विधान
Narhari Zirwal on Sharad Pawar : माझ्याबाबत पवारांच्या मनात संशयाचं...; नरहरी झिरवाळांचं मोठं विधान