AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गोडसे साकारल्यावर टीका झाली, पण ज्योतिबा साकारताना… अमोल कोल्हेंनी अखेर मौन सोडलं

अभिनेता आणि खासदार अमोल कोल्हे यांनी आपल्या वैचारिक भूमिकेचा खुलासा करताना एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे. ते नेमकं काय म्हणाले जाणून घ्या...

गोडसे साकारल्यावर टीका झाली, पण ज्योतिबा साकारताना... अमोल कोल्हेंनी अखेर मौन सोडलं
Amol KolheImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Jun 10, 2026 | 1:26 PM
Share

आज राष्ट्रवादी पक्षाचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. वाय बी चव्हाण सेंटर येथे वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, खासदार अमोल कोल्हे, महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे अशा अनेक बड्या नेत्यांनी हजेरी लावली. दरम्यान, अभिनेता आणि खासदार अमोल कोल्हे यांनी आपल्या वैचारिक भूमिकेचा खुलासा करताना एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे. २०१७ साली अनवधानाने नथुराम गोडसे यांची भूमिका साकारल्याबद्दल प्रचंड टीका झाली, मात्र सावित्रीबाई फुले मालिकेत जोतिबा फुले यांची भूमिका साकारताना कोणत्याही प्रकारचे कौतुक किंवा समर्थन मिळाले नाही, याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

अमोल कोल्हे म्हणाले, “वैचारिक बैठक कमी पडत आहे का असा प्रश्न पडू लागला आहे. झेनझीची सध्या चर्चा आहे, परंतु त्यांची वैचारिक बैठक खरंच आहे का याचा देखील अभ्यास व्हायला हवा.”

गोडसे भूमिकेची टीका vs जोतिबा फुले भूमिका

२०१७ साली जेव्हा अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसे यांची भूमिका केली, तेव्हा ते राजकारणात नव्हते. तरीही नंतर प्रचंड टीका झाली. मात्र सावित्रीबाई फुले मालिकेत जोतिबा फुले यांची भूमिका साकारत असताना कोणतेही हात कौतुकासाठी पुढे आले नाहीत, याचे त्यांना वाईट वाटत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मालिका पुन्हा सुरू करणार

सावित्रीबाई फुले मालिका १४ जून रोजी बंद होत आहे. याबाबत बोलताना अमोल कोल्हे यांनी ठाम भूमिका घेतली. ते म्हणाले, “मी आता घोषित करतोय की मला माहिती नाही, माझी वैचारिक बैठक पक्की आहे. त्यामुळे पैसा कसा उभा करेल, कोणत्या वाहिनीवर मालिका असेल याची माहिती नाही, परंतु १४ जून नंतरच्या पहिल्याच आठवड्यात पुन्हा मालिका सुरू करणार आहे.”

२१ जूनपासून राज्यव्यापी दौरा

अमोल कोल्हे यांनी पुढील योजना जाहीर करताना सांगितले की, २१ जून पासून ते महाराष्ट्र राज्यात दौरा सुरू करणार आहेत. “महाराष्ट्र धर्म जागवण्यासाठी मी फिरणार आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. अमोल कोल्हे यांच्या या विधानाने राजकीय आणि सांस्कृतिक वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. एकीकडे त्यांनी भूतकाळातील टीकेचा उल्लेख करत आपल्या वैचारिक दृढतेचा संदेश दिला, तर दुसरीकडे सांस्कृतिक आणि सामाजिक जागृतीसाठी राज्यव्यापी मोहीम हाती घेण्याची घोषणा केली आहे.

Follow Us
अर्वाच्च भाषेतील ऑडीओ क्लिप व्हायरल; बड्या अधिकाऱ्यावर मोठी कारवाई,
अर्वाच्च भाषेतील ऑडीओ क्लिप व्हायरल; बड्या अधिकाऱ्यावर मोठी कारवाई,  ठाकरेंच्या नगरसेवकाला... नेमकं प्रकरण काय?
भाजप आमदाराच्या पत्नीच्या गाडीचा भीषण अपघात; डोक्याला अन्....
मोठी बातमी! भाजप आमदाराच्या पत्नीच्या गाडीचा भीषण अपघात; डोक्याला आणि पायाला दुखापत
40 वर्षांच्या अनुभवासह धीरज सेठ यांच्याकडे देशाच्या सुरक्षेची धुरा
Dhiraj Seth | भारतीय लष्कराला नवे सेनाप्रमुख! 40 वर्षांच्या अनुभवासह धीरज सेठ यांच्याकडे देशाच्या सुरक्षेची धुरा
अजितदादांप्रमाणेच एकनाथ शिंदेंचाही घातपात होणार? बड्या नेत्याच्या
अजितदादांप्रमाणेच एकनाथ शिंदेंचाही घातपात होणार? बड्या नेत्याच्या दाव्याने एकच खळबळ; नेमकं काय सांगितलं?
भिवंडीत गॅस पाईपलाईनला गळती; जेसीबीच्या धक्का लागताच...
Bhiwandi | भिवंडीत गॅस पाईपलाईनला गळती; जेसीबीच्या धक्का लागताच...अनर्थ टाळण्यासाठी मोठी तारांबळ!
पाढरी पट्टी प्रकरणात मोठी अपडेट! 'आम्ही काही बांगड्या घातलेल्या नाहीत
पाढरी पट्टी प्रकरणात मोठी अपडेट! 'आम्ही काही बांगड्या घातलेल्या नाहीत म्हणून देशपांडेंनी...' जैनी मुंनींचा थेट इशारा
विरारच्या रिसॉर्टमध्ये मोठा राडा! खुर्च्या, दांडे आणि ड्रमने दोन....
VIRAL VIDEO: विरारच्या रिसॉर्टमध्ये मोठा राडा! खुर्च्या, दांडे आणि ड्रमने दोन गटांमध्ये तुफान हाणामारी
बसू द्या 8-10 दिवस, CCTV लावा अन्... रोहित पवारांच्या अन्नत्यागावर...
बसू द्या 8-10 दिवस,  CCTV लावा अन्... रोहित पवारांच्या अन्नत्यागावर लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका, म्हणाले, शेतकऱ्यांना...
एल निनोचा मान्सूनवर मोठा घाव! महाराष्ट्रात पावसाला ब्रेक, बळीराजाची...
Monsoon Update | एल निनोचा मान्सूनवर मोठा घाव! महाराष्ट्रात पावसाला ब्रेक, बळीराजाची चिंता वाढली
अनेक विवाह, 17 तोळे सोनं अन्... लग्नाच्या महिन्याभरातच विवाहितेचं...
अनेक विवाह, 17 तोळे सोनं अन्... लग्नाच्या महिन्याभरातच विवाहितेचं भयंकर कांड ! असं फुटलं बिंग