Amravati Violence : अमरावतीमधील इंटरनेट सेवा पूर्ववत, सामान्यांना दिलासा; संचारबंदी मात्र कायम

भाजपकडून अमरावती बंदची हाक देण्यात आली होती. या बंदमध्येही तोडफोड आणि दगडफेकीच्या घटना घडल्या. या पार्श्वभूमीवर अमरावती शहरात अफवा रोखण्यासाठी इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. हिंसाचाराच्या घटनेला 6 दिवस पूर्ण झाल्यानंतर परिस्थितीचा आढावे घेत आज शहरातील इंटरनेट सेवा पूर्ववत करण्यात आली आहे.

Amravati Violence : अमरावतीमधील इंटरनेट सेवा पूर्ववत, सामान्यांना दिलासा; संचारबंदी मात्र कायम
अमरावती हिंसाचार
Follow us
| Updated on: Nov 19, 2021 | 4:42 PM

अमरावती : त्रिपुरातील कथित घटनेनंतर महाराष्ट्रातील अमरावती, मालेगाव आणि नांदेडमध्ये मुस्लिम बांधवांनी काढलेल्या मोर्चात मोठा हिंसाचार पाहायला मिळाला. त्यानंतर भाजपकडून अमरावती बंदची हाक देण्यात आली होती. या बंदमध्येही तोडफोड आणि दगडफेकीच्या घटना घडल्या. या पार्श्वभूमीवर अमरावती शहरात अफवा रोखण्यासाठी इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. हिंसाचाराच्या घटनेला 6 दिवस पूर्ण झाल्यानंतर परिस्थितीचा आढावे घेत आज शहरातील इंटरनेट सेवा पूर्ववत करण्यात आली आहे. (Internet service resumed in Amravati, but curfew was maintained)

अमरावती शहरात झालेल्या हिंसाचारात दगडफेक, तोडफोड आणि जाळपोळीच्या घटना घडल्या होत्या. त्यात अनेक वाहनं आणि दुकानांचंही नुकसान झालं. त्यानंतर सोशल मीडियावरुन पसरणाऱ्या अफवा रोखण्यासाठी इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. अखेर सहा दिवसानंतर शहरात इंटरनेट सेवा सुरु करण्यात आलीय. त्यामुळे ऑनलाईन शिक्षण घेणारे विद्यार्थी, वर्क फ्रॉम होम करणारे आणि सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे. आता अमरावती शहर हळूहळू पूर्वपदावर येत असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, शहरातील संचारबंदी मात्र अद्यापही कायम ठेवण्यात आली आहे.

काय घडलं होतं अमरावतीत?

अमरावतीत 12 नोव्हेंबर रोजी अमरावतीत मुस्लिम समाजाने काढलेला मोर्चाला हिंसक वळण मिळाले होते. या हिंसक कारवायांचा निषेध करत भारतीय जनता पार्टीने अमरातीत 13 नोव्हेंबर रोजी अमरावती बंदचे आवाहन केले. यातदेखील भाजप व हिंदुत्ववादी संघटनांनी जाळपोळ आणि तोडफोड केली. त्यामुळे शनिनारी 1 वाजेपासून अमरावतीत संचारबंदी लागू करण्यात आली. तसेच शहरातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती.

12 नोव्हेंबरच्या घटनांमध्ये 11, तर 13 नोव्हेंबरच्या घटनांमध्ये 24 असे एकूण 35 गुन्हे आतापर्यंत दाखल झाले आहेत. तोडफोड व जाळपोळ प्रकरणी हे 35 गुन्हे नोंदवण्यात आले असून, एकूण 188 संशयितांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक राजेंद्र सिंह यांनी मंगळवारी दिली होती.

अकोल्यातही 21 नोव्हेंबरपर्यंत संचारबंदी

त्रिपुरा येथील हल्ल्याच्या निषेधार्थ अमरावतीत 12 नोव्हेंबर रोजी निघालेल्या रॅलीला हिंसक वळण लागले होते. त्याचे पडसाद अकोल्यातही दिसून आले होते. त्यामुळे गेल्या 13 नोव्हेंबरपासून अकोला शहरात संचारबंदी लागू करण्यात आली होती. आता 21 नोव्हेंबरपर्यंत या संचारबंदीत वाढ करण्यात आली आहे.

यामध्ये सर्व नियम कायम आहेत. पण यापुढे धरणे, आंदोलन किंवा मोर्चे असतील या सर्वांना निर्बंध असणार आहेत. मात्र. आता सायंकाळी सात वाजेनंतर कोणीही बाहेर दिसल्यास किंवा संचारबंदीचे नियम मोडल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

इतर बातम्या :

आंदोलन नेतृत्वहीन, चर्चा नेमकी कुणाशी करायची? अनिल परबांचा सवाल; खासगीकरणाचा प्रस्ताव नसल्याचंही स्पष्ट

पवारांना जेलमध्ये गेलेल्या देशमुखांचे दुःख, परबांना अहंकार; ST आंदोलनात लढाई सुरू झाल्याचा दरेकरांचा इशारा

Internet service resumed in Amravati, but curfew was maintained

Non Stop LIVE Update
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.