आंदोलन नेतृत्वहीन, चर्चा नेमकी कुणाशी करायची? अनिल परबांचा सवाल; खासगीकरणाचा प्रस्ताव नसल्याचंही स्पष्ट

परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडून सातत्याने चर्चेसाठी आवाहन केलं जात आहे. मात्र, एसटी कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. अशा परिस्थितीत हे आंदोलन आता नेतृत्वहीन झालंय. चर्चा नेमकी कुणाशी करायची? ना ते युनियनचं ऐकतात ना भाजप नेत्यांचं, अशी मत अनिल परब यांनी व्यक्त केलंय.

आंदोलन नेतृत्वहीन, चर्चा नेमकी कुणाशी करायची? अनिल परबांचा सवाल; खासगीकरणाचा प्रस्ताव नसल्याचंही स्पष्ट
अनिल परब, परिवहन मंत्री


मुंबई : ऐन दिवाळीच्या तोंडावर सुरु झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांचा संप अद्यापही सुरुच आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वात शेकडो एसटी कर्मचारी मुंबईतील आझाद मैदानात ठाण मांडून आहेत. परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडून सातत्याने चर्चेसाठी आवाहन केलं जात आहे. मात्र, एसटी कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. अशा परिस्थितीत हे आंदोलन आता नेतृत्वहीन झालंय. चर्चा नेमकी कुणाशी करायची? ना ते युनियनचं ऐकतात ना भाजप नेत्यांचं, अशी मत अनिल परब यांनी व्यक्त केलंय. (Privatization of ST is not a consideration at present, explained Anil Parab)

कालच्या बैठकीत एसटी रुळावर आणण्यासाठी विविध पर्यायांचा विचार केला. संबंधित कंपनीला सूचना दिल्या आहेत. एसटीच्या खासगीकरणाचा विचार नाही. तो एक पर्यात आहे. विलिनीकरणाबाबतचा निर्णय समितीच घेईल, असं अनिल परब यांनी स्पष्ट केलंय. तसंच चर्चा नेमकी कुणाशी करायची? ना ते युनियनचे ऐकतात ना भाजप नेत्यांचं. हे आंदोलन आता नेतृत्वहीन झालंय. कामगारांनी सांगावं कुणाशी चर्चा करायची. आम्ही त्यांच्याशी बोलायला तयार आहोत, असंही परब म्हणाले.

‘आता निर्णय कामगारांनी घ्यायचा आहे’

सध्या एसटीच्या स्थितीवरुन वेगवेगळ्या राज्यांचा अभ्यास करत आहोत. तिथली वाहतूक व्यवस्था आणि कर्मचाऱ्यांचे वेतन याचा आढावा घेतला जात आहे. गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्याशी मी दोनवेळा बोललो. पण नंतर संपर्क नाही. त्यांनी कामगारांना आझाद मैदानात आणलं आहे. त्यापेक्षा चर्चा करा. आता निर्णय कामगारांनी घ्यायचा आहे.

‘फडणवीसांनी दिलेल्या फॉर्म्युल्यावर गांभीर्यानं विचार सुरु’

फडणवीस यांनी प्रवाशी कराचा फॉर्म्यूला सांगितला. जो आम्ही गांभीर्यानं घेतला आहे. कोरोनापूर्व काळात हा फॉर्म्यूला शक्य होता. आता खूप मोठा गॅप पडलाय. आताही तो करता येईल. त्यासाठी संप मागे घ्यावा लागेल. शासनाचे आर्थिक गणित पाहूनच मगच निर्णय घेतला जाईल, असंही परब यांनी स्पष्ट केलय. महत्वाची बाब म्हणजे जे रोजंदारी कर्मराची आहेत त्यांनी 24 तासांत कामावर हजर राहण्याचे अल्टिमेटम देण्यात आलं होतं. आता त्यांच्यावर कारवाई सुरु झाल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.

इतर बातम्या :

Kisan Andolan News: सर्वसामान्य जनतेची ताकद देशाला कळली; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा मोदींना टोला

अल्पवयीन असतानाच समीर वानखेडेंना बारचं परमीट मिळालं; मलिकांकडून वानखेडे कुटुंबाचा आणखी फर्जीवाडा उघड

Privatization of ST is not a consideration at present, explained Anil Parab

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI