Bachchu Kadu | अकोला जिल्हा परिषदेचे निधी अपहार प्रकरण, पालकमंत्री बच्चू कडू यांना जामीन मंजूर

जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी जिल्हा नियोजन समितीच्या 13 कामांना स्थगिती दिली. आता पालकमंत्री कडू यांच्यावर पोलिसांनी गुन्हे दाखल करण्याची मागणी वंचितने केली आहे. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. धैर्यवेधन पुंडकर यांनी न्यायालयात धाव घेतली.

Bachchu Kadu | अकोला जिल्हा परिषदेचे निधी अपहार प्रकरण, पालकमंत्री बच्चू कडू यांना जामीन मंजूर
पालकमंत्री बच्चू कडू यांना जामीन मंजूर Image Credit source: t v 9
Follow us
| Updated on: Jun 17, 2022 | 4:53 PM

अकोला : जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू (Guardian Minister Bachchu Kadu) यांच्यावर प्रथमश्रेणी न्यायालयाने कलम 156 (3) नुसार सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यांनी सत्र न्यायालयात जामीन मिळविण्यासाठी अर्ज दाखल केला होता. या अर्जावर न्यायालयाने आज निकाल देत पालकमंत्री कडू यांना जामीन मंजूर केला आहे. दोन्ही पक्षातर्फे युक्तिवाद करण्यात आला. अकोल्यातील जिल्हा परिषदेकडून जिल्हा नियोजन समितीकडे (Zilla Parishad Zilla Planning Committee) पाठविलेल्या रस्त्यांच्या प्रस्तावामध्ये परस्पर बदल करून पालकमंत्री बच्चू कडू यांनी 1 कोटी 95 लाखांचा निधीचा अपहार केल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Aghadi) केला होता. या प्रकरणी ही सुनावणी झाली. यात बच्चू कडू यांना जामीन मिळाला. त्यामुळं बच्चू कडू यांना दिलासा मिळाला आहे.

समितीच्या 13 कामांना स्थगिती

जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी जिल्हा नियोजन समितीच्या 13 कामांना स्थगिती दिली. आता पालकमंत्री कडू यांच्यावर पोलिसांनी गुन्हे दाखल करण्याची मागणी वंचितने केली आहे. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. धैर्यवेधन पुंडकर यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने यामध्ये कमल 156 (3) नुसार पालकमंत्री बच्चू कडू यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.

बी. के. गांधी यांनी पाहिले काम

सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात पालकमंत्री कडू यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर पालकमंत्री कडू यांनी जामीन मिळविण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला. सत्र न्यायालयाने यामध्ये दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकल्यानंतर पालकमंत्री कडू यांना 9 मेपर्यंत जामीन मंजूर केला होता. या जामिनावर सुनावणी झाली. न्यायालयाने यामध्ये पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कडू यांना हजर राहण्याचे आदेश दिले होते. न्यायाधीश यांनी दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर पालकमंत्री कडू यांना जामीन मंजूर केला आहे. पालकमंत्री यांच्याकडून ऍड. बी. के. गांधी यांनी काम पाहिले.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.