AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अगं आई गंsss! व्हेंटिलेटरच्या स्फोटानंतर आगडोंब, अवघ्या काही दिवसांचा कोवळा जीव मृत्युमुखी

अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील आग प्रकरणी महत्त्वाची अपडेट! आग का लागली? आगीनंतर काय घडलं? माहिती समोर

अगं आई गंsss! व्हेंटिलेटरच्या स्फोटानंतर आगडोंब, अवघ्या काही दिवसांचा कोवळा जीव मृत्युमुखी
| Updated on: Sep 26, 2022 | 8:52 AM
Share

स्वप्निल उमप, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी, अमरावती : अमरावतीच्या (Amravati Fire News) जिल्हा स्त्री रुग्णालयात रविवारी रात्री आग लागली होती. व्हेंटिलेटरचा (Ventilator) स्फोट होऊन आग भडकली आणि यात एका बाळाचा मृत्यू (Baby died) झाल्याची दुर्दैवी घटना घडली. दरम्यान, आधीच व्हेंटिलेटरवर असलेल्या आणखी एका चिमुरड्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळतेय. त्याच्यावर उपचार सुरु आहेत. आगीमुळे बाळ दगावल्यानं हळहळ व्यक्त केली जातेय.

शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा संशय व्यक्त केला जातोय. रविवारी दुपारी अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये लागलेल्या आगीने भंडाऱ्याच्या रुग्णालयातील अग्नितांडवाच्या आठवणी ताज्या झाल्या होत्या. व्हेंटिलेटर पेटल्याचं लक्षात येतात कर्तव्यावर असलेल्या नर्सने नवजात शिंशूंना तातडीने बाजूला घेऊन जात सुरक्षित स्थळी नेलं.

एकूण 12 बालकं या वॉर्डमध्ये होती. त्यांना दुसऱ्या ठिकाणी नेण्यात आलं. पण तोपर्यंत वॉर्डमध्ये आगीचा धूर सर्वत्र पसरला होता. अखेर अग्निशमन दलाने रुग्णालयात येऊन आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. सर्व बाळांना सुरक्षित स्थळी हलवल्यानंतर त्यांच्यावर तिथे उपचार सुरु करण्यात आले होते. काही वेळानंतर ही आग आटोक्यातही आणण्यात आली.

रुग्णालयाच्या ज्या विभागात आग भडकली, त्या विभागात एकूण तीन व्हेंटिलेटर होते. त्यापैकी एका व्हेंटिलेटरचा स्फोट झाला आणि आग लागली. शॉर्ट सर्किट झाल्यामुळे व्हेंटिलेटरमध्ये तांत्रिक बिघाड होऊन आग लागल्याचा अंदाज वर्तवला जातोय.

दरम्यान, शनिवारपासूनच व्हेंटिलेटर चालू-बंद होत होते, असंही बोललं जातंय. एकूण 27 बालकांवर उपचार करण्याची क्षमता या वॉर्डमध्ये आहेत. पण क्षमतेपेक्षा जास्त रुग्ण या वॉर्डमध्ये होते. रविवारी देखील 37 चिमुरड्यांवर उपचार केले जात होते.

महत्त्वाचं म्हणजे रुग्णालयात फायर ऑडिट करण्यात आलं होतं. त्यानंतरही आग लागण्याची घटना कशामुळे घडली, असा प्रश्नही आता उपस्थित केला जातो आहे. एका नवजात बाळाचा या दुर्घटनेत मृत्यू झाल्यानं त्या मुलाच्या आईवडिलांवर मोठा आघात झाला आहे. चिमुरड्याच्या मृत्यूने रुग्णालय प्रशासनाविरोधातही तीव्र संताप रुग्णांच्या नातेवाईकांनी व्यक्त केलाय.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.