Amravati Shiv Sainik | अमरावतीत हनुमान चालीसावरून वातावरण तापलं, शिवसैनिक धडकले रवी राणा यांच्या घरासमोर, शिवसैनिक ताब्यात 

हनुमान चालीसा म्हणण्यासाठी शिवसैनिक राणा दाम्पत्याच्या घरासमोर धडकले. पोलिसांनी बंदोबस्त लावला होता. पोलिसांनी शिवसैनिकांना ताब्यात घेतलं. तरीही काही शिवसैनिक हनुमान चालीसा म्हणण्याचा प्रयत्न करत होते.

Amravati Shiv Sainik | अमरावतीत हनुमान चालीसावरून वातावरण तापलं, शिवसैनिक धडकले रवी राणा यांच्या घरासमोर, शिवसैनिक ताब्यात 
हनुमान चालीसा म्हणण्यासाठी शिवसैनिक राणा दाम्पत्याच्या घरासमोर धडकलेImage Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Apr 17, 2022 | 12:27 PM

अमरावती : शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते रवी राणा (Ravi Rana) यांच्या घरावर धडकले. घरात घुसण्याचा शिवसैनिकांनी प्रयत्न केला. पोलिसांनी शिवसैनिकांना अडवले. आमदार रवी राणांच्या घराजवळ रवी राणांच्या कार्यकर्त्यांनी हनुमान चालीसा सुरू केला. हातात हनुमानाची प्रतिमा घेऊन ते उभे आहेत. राणा यांच्या निवासस्थानाच्या दिशेने शिवसैनिकांचा मोर्चा निघाला. या मोर्चात मोठ्या प्रमाणात महिला व शिवसैनिक सहभागी आहेत. अमरावतीत हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) प्रकरणावरुन वातावरण तापले. आज शिवसैनिक राणा यांच्या घरासमोर हनुमान चालीसा वाचण्याचा इशारा दिला. राणा यांच्या घरासमोर व कार्यालयासमोर पोलिसांचा (Amravati Police) तगडा बंदोबस्त करण्यात आलाय. पोलिसांनी शिवसैनिकांना ताब्यात घेतले. बॅरिकेट्स लावून सर्व शिवसैनिकांना हलविलं.

काय आहे प्रकरण?

राणा दाम्पत्यांनी हनुमान चालीसाचे प्रकरणावरून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्यांच्या मातोश्रीवर हनुमान चालीसा पठण करण्याचा इशारा दिला होता. या प्रकरणावरून शिवसैनिक संतप्त झाले. राणा यांची मातोश्रीवर जाण्याची हिंमत नाही. त्यांनी आधी अमरावतीच्या शिवसैनिकांना ऐकून घ्यावे, असा इशाराही अमरावती महानगर प्रमुख पराग गुडधे यांनी दिला आहे. याच पार्श्वभूमीवर अमरावतीमध्ये राणा यांच्या घरासमोर व कार्यालयासमोर पोलिसांनी तगडा बंदोबस्त केलाय. हातात बांगळ्या घेऊन महिला शिवसैनिक रवी राणांच्या घरावर धडकले.पण, पोलिसांनी त्यांना अडकाव केला.

राणा म्हणतात, मातोश्रीवर जाणारच

शिवसेनेच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणांच्या घराजवळ कडेकोट बंदोबस्त लावण्यात आलाय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान दिल्यामुळे आमदार रवी राणा यांच्या घरावर शिवसैनिक धडकले. आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या आव्हानाला प्रतिउत्तर देण्यासाठी शेकडो शिवसैनिक दाखल झाले. राजापेठ चौकामधील शिवसेना कार्यालयाजवळ शिवसैनिक जमा झाले. त्यानंतर त्यांनी राणा यांच्या घराकडं कूच केली. मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा म्हणणारच असा पुनरुच्चार रवी राणा यांनी केला आहे. त्यामुळं हा वाद कुठपर्यंत राहणार हे वेळच सांगेल.

Nagpur Crime | रामटेकमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग, मुलीच्या आईने आरोपीस चपलेने बदडले

Akola Fire | अकोल्यातील शेतकऱ्याच्या स्वप्नाची राखरांगोळी, कांद्याने डोळ्यात आणले पाणी, 80 क्विंटल कांदा जळून खाक!

Nagpur Crime | नागपुरात सराफा व्यापाऱ्यावर चाकू हल्ला, डोळ्यात मिरचीपूड टाकून दोन किलो सोने लुटले

Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.