AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जय भवानी जय शिवाजी! कार्यकर्त्यांसोबत खासदार नवनित राणा यांची घोषणाबाजी, पोलिसांनी कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात

शिवाजी महाराजांनी स्थापित केलेल्या राज्यात त्यांचाच पुतळा उभारणाऱ्यांवर सरकार कारवाई करते. याचा निषेध करण्यासाठी जमलेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी राणा दाम्पत्याच्या घरासमोरून ताब्यात घेतले. पण, त्यापूर्वी या कार्यकर्त्यांनी जय भवानी जय शिवाजी, ठाकरे सरकार मुर्दाबाद अशाप्रकारच्या घोषणा देऊन आज दुपारी परिसर दणाणून सोडला.

जय भवानी जय शिवाजी! कार्यकर्त्यांसोबत खासदार नवनित राणा यांची घोषणाबाजी, पोलिसांनी कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात
घराबाहेर राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी करताना खासदार नवनित राणा
| Edited By: | Updated on: Jan 16, 2022 | 4:28 PM
Share

अमरावती : खासदार नवनित राणा (MP Navneet Rana) यांनी घराबाहेरून निघून कार्यकर्त्यांसोबत चांगल्याच घोषणा दिल्या. जय जय जय जय जय शिवाजी, जय जय जय जय जय भवानी, अशा घोषणा कार्यकर्ते देत होते. पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड केली. पोलीस कार्यकर्त्यांना गाडीत कोंबत होते. कार्यकर्ते मात्र जोराजोरात घोषणाबाजी करत होते. आंदोलक समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यासाठी पोलिसांनी गाड्या बोलावल्या होत्या. मुर्दाबाद, मुर्दाबाद उद्धव ठाकरे मुर्दाबाद अशा प्रकारच्या घोषणा नवनित राणा (Rana’s sloganeering) घराबाहेर पडून देत होत्या. कार्यकर्ते त्यांना साथ देत होते. पोलीसांनी जबरदस्त बंदोबस्त लावला. मोठ्या संख्येने जमलेल्या कार्यकर्त्यांना अटक करत होते. हे सर्व शिवप्रेमी आहेत, असं नवनित राणा म्हणाल्या.

नवनित राणा म्हणाल्या, कुठे चाललाय महाराष्ट्र माझा

आम्ही जनतेच्या हितासाठी काम करतो. जनतेची मागणी असल्यानं त्याठिकाणी पुतळा उभारण्यात आला. त्याला विरोध होत असेल, तर ते योग्य नाही, असंही नवनित राणा यांनी म्हंटलं. कुठे चाललाय महाराष्ट्र माझा, असा सवाल यावेळी खासदार नवनित राणा यांनी विचारला. विशेष म्हणजे प्रकरण चिघळू नये, यासाठी पत्रकारांना राणा दाम्पत्याच्या घरी जाण्यापासूनही थांबविण्यात आलं. कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यावेळी नवनित राणा घराबाहेर आल्या. त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. गेल्या तीन वर्षांपासून परवानगी मागतोय. तरीही परवानगी मिळत नाही. मग, शिवप्रेमी काय करणार, असंही त्या म्हणाल्या.

महिला कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी घेतले ताब्यात

घोषणाबाजी करणाऱ्या काही महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पण, ताब्यात घेण्यापूर्वी महिलांनी जोरदार घोषणाबाजी केली. नवनित राणा यांना महिला मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करत होत्या. त्यामुळं घोषणांनी परिसर दणाणून गेला. शिवाजी महाराजांचा पुतळा रातोरात हटविल्यानंतर अमरावती राजकारण चांगलेच पेटले आहे. राणा दाम्पत्याला नजरकैदेत ठेवण्यात आले होते. राणा दाम्पत्याच्या घरासमोर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दुपारी मोठ्या संख्येने राणा यांचे समर्थक जमले. समर्थक आल्यानंतर त्यांना भेटण्यासाठीही रवी राणा बाहेर आले. त्यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. कार्यकर्त्यांना पळवून लावण्यात आले. राणा दाम्पत्याच्या घराला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे.

संबंधित बातम्या :

Amravati | Ravi Rana यांनी अमरावतीत विनापरवानगी बसवलेला शिवरायांचा पुतळा रातोरात हटवला

रवीजींचं नाव घेते मी सून राणांची… नवनीत राणांचा हटके उखाणा

Amaravati : राजस्थानातून तेलंगणाकडे जाणारे 58 उंट अमरावती पोलिसांच्या ताब्यात; खासदार नवनीत राणा यांच्या पुढाकाराने कारवाई

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.