सुनील देशमुख आणि अनिल बोंडे यांच्यात कलगीतुरा, एकमेकांवर आरोपाच्या फैरी

अमरावती शहरात संचारबंदीत 9 तासांची शिथिलता आली आहे. जनजीवन पूर्वपदावर येणं गरजेचं आहे. शहरात शांतता प्रस्थापित करणं आवश्यक आहे. आता विकासकामं सुरू झाली पाहिजेत. तणाव निर्माण झाल्यामुळं विकासकामं खोळंबली होती. त्यामुळं सर्वांचच नुकसान झालंय, असं मत अनिल बोंडे यांनी व्यक्त केलंय.

सुनील देशमुख आणि अनिल बोंडे यांच्यात कलगीतुरा, एकमेकांवर आरोपाच्या फैरी
सुरेंद्रकुमार आकोडे

| Edited By: गोविंद हटवार, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Nov 20, 2021 | 2:11 PM

अमरावती : अमरावतीत दोन माजी मंत्र्यांमध्ये सध्या आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. माजी मंत्री सुनील देशमुख आणि माजी मंत्री अनिल बोंडे यांच्यात कलगीतुरा रंगलाय. अमरावतीत तणाव निर्माण झाला. याला भाजप जबाबदार असल्याचा आरोप सुनील देशमुख यांनी केला होता. तर हे प्रशासनावर वचक नसल्यानं विकासकामांना खिळ बसतेय, असा आरोप अनिल बोंडे यांनी केलाय.

अमरावती शहरात संचारबंदीत 9 तासांची शिथिलता आली आहे. जनजीवन पूर्वपदावर येणं गरजेचं आहे. शहरात शांतता प्रस्थापित करणं आवश्यक आहे. आता विकासकामं सुरू झाली पाहिजेत. तणाव निर्माण झाल्यामुळं विकासकामं खोळंबली होती. त्यामुळं सर्वांचच नुकसान झालंय, असं मत अनिल बोंडे यांनी व्यक्त केलंय.

सुनील देशमुखांनी केला होता आरोप

महानगरपालिकेच्या निवडणुकीवर डोळा ठेऊन भाजपनं हा हिंसाचार घडवल्याचा आरोप माजी मंत्री सुनील देशमुख यांनी केला होता. त्यावर भाजपचे नेते अनिल बोंडे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. अमरावतीची जनता भाजपकडं वळत असल्याचं सुनील देशमुख यांना कळलंय. त्यामुळं भाजप सोडून काँग्रेसमध्ये जाण्याचा सुनील देशमुख यांना पश्च्याताप होईल, असा टोला अनिल बोंडे यांनी सुनील देशमुख यांना लगावला.

 

यापुढं शांतता भंग होऊ नये

यापुढं कधीही एकोपा व शांतता भंग होऊ नये, यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करण गरजेचे आहे. मात्र आरोप-प्रत्यारोप अजूनही सुरू आहेत. शहरांमध्ये शस्त्रांचा खूप मोठा साठा आहे. या सर्व गोष्टींवर पोलिसांचं लक्ष हवं. शहरात गुटखाविक्री सर्रासपणे होत आहे.
वाळूमाफिया मोठ्या प्रमाणात सक्रिय आहेत, असा आरोपही अनिल बोंडे यांनी केलाय.

 

सायबर क्राईमचा वॉच हवा

अमरावतीतील दंगल सोशल मीडियाच्या माध्यमातून जोरात पसरली. सोशल मीडियावर सायबर क्राईमचा वॉच पाहिजे. दुसऱ्या राज्यात घडलेल्या घटनेवरून संपूर्ण शहराला वेठीस धरणे योग्य नव्हते. इंटरनेटबंदीचा फटका साऱ्या शहराला अनुभवावा लागला. त्याचा त्रासही सहन करावा लागला. पुढच्या काळामध्ये कोणतेही मोर्चे, चर्चासत्र झाल्यास त्यावर आयबीचं स्ट्राँग नेटवर्क असणं गरजेचं आहे. गांजा, शस्त्रसाठा, वाळूमाफिया, गुटखा विक्री या साऱ्यांवर पोलिसांचं लक्ष हवंय. अस झाल्यास तणाव फोफावणार नाही, असं मतही अनिल बोंडे यांनी व्यक्त केलं.

शिवसेनेचा महापालिकेत 100 कोटींचा ट्रेंचिंग घोटाळा, भाजप आमदार कोटेचा यांची चौकशीची मागणी

एसटीच्या महिला कर्मचारी अनिल परबांची साडी-चोळी आणि नारळाने ओटी भरणार! पडळकरांनी सांगितली आंदोलनाची पुढील दिशा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें