शिवसेनेचा महापालिकेत 100 कोटींचा ट्रेंचिंग घोटाळा, भाजप आमदार कोटेचा यांची चौकशीची मागणी

भाजपने शिवसेनेवर ट्रेंचिंग निवदा घोटाळ्याचा आरोप केला आहे. शिवसेनेने पालिका प्रशासनाशी संगनमत साधून 100 कोटी रुपयांचा हा घोटाळा केला आहे.

शिवसेनेचा महापालिकेत 100 कोटींचा ट्रेंचिंग घोटाळा, भाजप आमदार कोटेचा यांची चौकशीची मागणी
mihir kotecha

मुंबई: भाजपने शिवसेनेवर ट्रेंचिंग निवदा घोटाळ्याचा आरोप केला आहे. शिवसेनेने पालिका प्रशासनाशी संगनमत साधून 100 कोटी रुपयांचा हा घोटाळा केला आहे. त्यामुळे ही निविदा तातडीने रद्द करून त्याची चौकशी करावी अशी मागणी भाजपचे आमदार मिहीर कोटेचा यांनी केली आहे.

भाजप आमदार मिहीर कोटेचा यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ही मागणी केली. यावेळी पालिकेतील भाजपा गटनेते प्रभाकर शिंदे, प्रदेश प्रवक्ते व नगरसेवक भालचंद्र शिरसाट, महापालिकेतील पक्ष नेते विनोद मिश्रा, प्रविण छेडा आदी उपस्थित होते. महापालिकेतील पक्ष नेते विनोद मिश्रा यांनी महापालिका आयुक्तांना 28 ऑक्टोबर रोजी पत्र पाठवून ट्रेंचिंग निविदेत सत्ताधारी शिवसेनेच्या मदतीने काही कंत्राटदार संगनमताने घोटाळे करतील तसेच या निविदांच्या अटी व शर्ती बदलल्या जातील असे कळविले होते. 17 नोव्हेंबर रोजीही मिश्रा यांनी आयुक्तांना पुन्हा पत्र पाठवून निविदा प्रक्रियेतील संभाव्य घोटाळ्यांची पूर्वसूचना दिली होती. कंत्राटदारांकडून आपसात संगनमत करून कोणत्या दरांमध्ये निविदा भरली जाईल याचाही उल्लेख या पत्रात करण्यात आला होता. 18 नोव्हेंबर रोजी निविदा सूचना प्रसिद्ध झाल्यानंतर मिश्रा यांनी आयुक्तांना दिलेली माहिती खरी होती हेच सिद्ध झाले आहे, असं कोटेचा यांनी सांगितलं.

तीन महिन्यातच रक्कम वाढली

मिश्रा यांनी आयुक्तांना पत्र पाठवूनही महापालिका प्रशासनाने निविदेत घोटाळे होऊ नयेत यासाठीची प्रतिबंधात्मक दक्षता घेतली नाही. 26 ऑगस्ट रोजी ट्रेंचिंगच्या याच कामाची निविदा प्रसिद्ध झाली होती. त्यावेळी पाच कंत्राटदारांनी या निविदेत 380 कोटींची बोली सादर केली होती. मात्र 18 नोव्हेंबर रोजी 569 कोटींची निविदा प्रसिद्ध झाली आहे. अवघ्या 3 महिन्यात निविदा रकमेत एवढी मोठी वाढ झाली आहे. या घोटाळ्याची पालिका आयुक्तांनी गंभीर दखल घेऊन तातडीने उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली.

‘डीजे’ मालकाने घेतली सुपारी

एका ‘डीजे’ मालकाने या निविदेसाठी 100 कोटींची सुपारी घेतली असल्याचा आरोप विनोद मिश्रा यांनी यावेळी केला. या निविदा भरणाऱ्या कंत्राटदारांवर पालिकेची फसवणूक केल्याबद्दल एफआयआर दाखल करावा, तसेच या या कंत्राटदारांचे मोबाईलवरील संभाषण, व्हाटसअप चॅट तसेच या मंडळींच्या विलेपार्ले येथील हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीचे सीटीव्हीही चित्रीकरण मिळवावे, आदी मागण्याही मिश्रा यांनी केल्या.

 

संबंधित बातम्या:

वाह रे कॉपी बहाद्दर… मास्कमध्ये चिप, कानात ज्वारीच्या दाण्याएवढा ब्लूटूथ, आलाय पोलीस भरतीच्या परीक्षेसाठी!

VIDEO: 18 वर्ष पूर्ण झाल्यावर आई-वडिलांचा धर्म लागू होत नाही, वानखेडेंची बाजू भक्कम; प्रकाश आंबेडकरांनी दिला सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा दाखला

प्रियंका गांधी यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र, लखीमपूर हिंसा प्रकरणात विचारले तिखट सवाल

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI