भाजपची सत्ता असणाऱ्या पालिकेनं परवानगी नाकारली, तरी ठाकरे मुर्दाबाद, पुतळ्यामागचे राजकारण काय?

अमरावती महापालिकेत सध्या भाजपची सत्ता आहे, मग पुतळ्याला परवानगी तर पालिकेने नाकरली, मग त्यानंतरही राणांच्या टार्गेटवर पुन्हा उद्धव ठाकरे का? मग या पुतळ्यामागचे राजकारण काय? असा सवाल उपस्थित होणे साजिकच होते आणि आता हाच वाद वाढण्याची शक्यता आहे.

भाजपची सत्ता असणाऱ्या पालिकेनं परवानगी नाकारली, तरी ठाकरे मुर्दाबाद, पुतळ्यामागचे राजकारण काय?
अमरावतीत राडा
Follow us
| Updated on: Jan 16, 2022 | 4:02 PM

अमरावती : पहाटेच्या थंडीत अमरावतीतल्या राजकारणात ठिणग्या उडत आहेत. कारण महापालिकेने परवानगी न देता छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chatrapati Shivaji mahraj) पुतळा बसल्याने, पहाटे मोठ्या पोलीस बंदोबस्तात पालिकने हा पुतळा हटवला. त्यानंतर खासदार नवनीत राणा (Navneet rana) आणि रवी राणा (Ravi rana) गप्प बसतील असे कसे होईल? त्यांना आणखी एक चान्स मिळाला ठाकरे सरकारला टार्गेट करण्याचा आणि काही वेळातच ते दिसून आले, कारण अमरावीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टार्गेट करत उद्धव ठाकरे मुर्दाबादच्या घोषणा घुमू लागल्या. मात्र अमरावती महापालिकेत सध्या भाजपची सत्ता आहे, मग पुतळ्याला परवानगी तर पालिकेने नाकरली, मग त्यानंतरही राणांच्या टार्गेटवर पुन्हा उद्धव ठाकरे का? मग या पुतळ्यामागचे राजकारण काय? असा सवाल उपस्थित होणे साजिकच होते आणि आता हाच वाद वाढण्याची शक्यता आहे.

राणा-अडसूळ राजकीय समीकरणामुळे सेना टार्गेट?

नवणीत राणा अमरावतीच्या खासदार होण्याआधी इथे शिवसेनेचे आनंद अडसूळ यांची जागा पक्की होती. येत्या लोकसभेतही सहाजिकच नवनीत राणा यांच्याविरोधात अमरावतीत शिवसेनेच्या आनंदराव अडसूळांचं आव्हान आहे. त्यामुळे उद्या लोकसभेला भाजपचा पाठिंबा मिळावा म्हणून हा राजकीय डावपेच आहे का? असा सवालही विचारण्यात येत आहे. शिवसेना अमरावतीत मुख्यप्रतिस्पर्धी राहिल्याने नवनीत राणा आणि रवी राणा सतत ठाकरे सरकारला टार्गेट करताना मागील दोन वर्षात दिसून आले. आता या पुतळ्याच्या राजकणावरून नवा वाद पेटला आहे.

शिवसेना काँग्रेससेना झाली-राणा

टीव्ही 9 मराठीशी फोनवरुन बोलताना खासदार नवनीत राणा यांचे पती आमदार रवी राणा यांनी शिवसेनेवर सडकून टीका केली आहे. उद्धव ठाकरे सरकार शिवप्रेमींची गळचेपी करत असल्याचा आरोप रवी राणा यांनी केला. तसंच ‘आताची शिवसेना ही शिवसेना नसून ती काँग्रेस सेना झाली आहे’ अशी टीका रवी राणा यांनी यावेळी व्यक्त केली आहे. एखाद्या अतिरेक्यांप्रमाणे आमच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं गेलं. ही पद्धत अत्यंत चुकीची असल्याचं रवी राणा यांनी म्हटलंय.

परवानगीची गरज काय?

पालिकेनं केलेल्या दाव्यानुसार हा पुतळा परवानगी न घेता उभारण्यात आला होता. त्यामुळे या पुतळ्यावर कारवाई करण्यात आली आहे. दुसरीकडे गेल्या अनेक वर्षांपासून हा पुतळा बसवण्यासाठी परवानगी देण्यात यावी, अशी मागणी राणा दाम्पत्यानं सातत्यानं केली होती. मात्र ही परवानगी नाकारण्यात आल्यानं अखेर राणा दाम्पत्यानं शिवप्रेमींच्या मागणीखातर हा पुतळा उभारला असल्याचा दावा केला आहे. आता या पुतळ्यावर कारवाई केल्यानंतर रवी राणा यांच्यासोबत नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. मात्र जर परवानगी पालिकेने नाकारली तर यात उद्धव ठाकरे यांचा संबंध कुठून येतो? असा सवाल सर्वाना उपस्थित आहे.

जय भवानी जय शिवाजी! कार्यकर्त्यांसोबत खासदार नवनित राणा यांची घोषणाबाजी, पोलिसांनी कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात

‘छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवायला आम्हाला कुणाच्या परवानगीची गरज नाही’

Ravi Rana | ‘ही शिवसेना नव्हे, ही तर काँग्रेस सेना’ शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्यावरुन राजकारण तापलं!

Non Stop LIVE Update
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.