‘छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवायला आम्हाला कुणाच्या परवानगीची गरज नाही’

जे शिवभक्त परवानगी मागून थकले त्यांना परवानगी मिळाली नाही, मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यासाठी कुणाच्या परवानगी कशाला हवी? असा सवाल खासदार नवनीत राणा यांनी उपस्थित केला आहे.

'छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवायला आम्हाला कुणाच्या परवानगीची गरज नाही'
अमरावतीत राडा
Follow us
| Updated on: Jan 16, 2022 | 3:28 PM

अमरावतीत सकाळपासून राजकारण जोरदार तापलंय. खासदार नवनीत राणा (Navneet rana) आणि आमदार रवी राणा (Ravi rana) आपल्या आक्रमक अंदाजामुळे नेहमीच चर्चेत असतात. पण आज जोडपं पुन्हा चर्चेत आलंय, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून. छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chatrapati Shivaji mahraj) पुतळा बसवण्यासाठी आम्हाला कुणाच्या परवानगीची गरज नाही, असे वक्तव्य खासदार नवनीत राणा यांनी केले आहे. राणा यानी बसवलेला पुतळा हाटवल्यानंतर अमरावतीत जोरदार राडा सुरू झाला. नवनीत राणांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांनी गर्दी केली. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यावेळी सरकारविरोधात कार्यकर्ते जोरदार घोषणाबाजी करताना दिसून आले. विनापरवनागी राणा यांनी पुतळा बसवला होता, तो मोठ्या पोलीस बंदोबस्तात हटवण्यात आला.

नवनीत राणा काय म्हणाल्या?

जे शिवभक्त परवानगी मागून थकले त्यांना परवानगी मिळाली नाही, मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यासाठी कुणाच्या परवानगी कशाला हवी? असा सवाल खासदार नवनीत राणा यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे अमरावती शहरात तणावाचे वातावरण दिसून आले. छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करणाऱ्या लोकांनी तीन वर्षे परवानगी न मिळाल्याने आम्ही पुतळा बसवला. ज्या उद्धव ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर मतदान मागतात, ते छत्रपती शिवाजी महाजांचे पुतळे हटवता. अशी टीका त्यांनी केली आहे. ज्या महाराजांच्या मुळे महाराष्ट्र घडला, मात्र आता कुठे बाळासाहेब ठाकरेंचे आदर्श, कुठे गेले बाळासाहेब ठाकरेंचे विचार? कुठे चाललाय माझा महाराष्ट्र म्हणत नवनीत राणा यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

उद्धव ठाकरेंविरोधात जोरदार घोषाबाजी

अमरावतीत आज फक्त उद्धव ठाकरे मुर्दाबादच्या घोषणा घुमत होत्या. नवनीत राणा यांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमल्यानंतर कार्यकर्त्यांनी आणि नवनीत राणा यांनी थेट मुख्यमंत्र्यांना टार्गेट करत, उद्धव ठाकरे मुर्दाबादच्या घोषणा सुरू केल्या. त्यामुळे पोलिसांना हस्तक्षेप करत कार्यकर्त्यांना ताब्यात घ्यावे लागली. मात्र पोलिसांच्या गाडीत चढतानाही कार्यकर्त्यांच्या मुख्यमंत्र्यांविरोधात घोषणा थांबल्या नाहीत. अमरावतीतला हा हायव्होल्टेज ड्रामा सध्या राज्याच्या राजकारणाचे लक्ष वेधून घेत आहे.

Ravi Rana | ‘ही शिवसेना नव्हे, ही तर काँग्रेस सेना’ शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्यावरुन राजकारण तापलं!

दुगाण्या झाडायला काय अक्कल लागते?, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची टोलेबाजी सुरूच

UP Election: युपीच्या राजकारणात बिकनीची चर्चा, करिअरचा राजकारणाशी संबंध जोडू नका

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.