सहा महिन्यांत रुग्णालयाची नवी इमारत होणार, आमदार रवी राणा यांची माहिती

गोविंद हटवार, Tv9 मराठी

Updated on: Sep 26, 2022 | 4:28 PM

तत्कालीन पालकमंत्र्यांनी जिल्हा स्त्री रुग्णालयाचा सात कोटीचा प्रस्ताव मंजूर केला नाही.

सहा महिन्यांत रुग्णालयाची नवी इमारत होणार, आमदार रवी राणा यांची माहिती
आमदार रवी राणा यांची माहिती
Image Credit source: social media

सुरेंद्रकुमार आकोडे, Tv9 मराठी प्रतिनिधी, अमरावती : अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात काल आग लागली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी चौकशीचे आदेश दिले. आज अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी पवणीत कौर यांच्या अध्यक्षतेखाली तातडीची बैठक पार पडली. या बैठकीत भाजप खासदार अनिल बोंडे, आमदार रवी राणा, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर दिलीप सौंदळे उपस्थित होते. या ठिकाणी जिल्हा स्त्री रुग्णालयात पुढं आग लागणार नाही, यासाठी काळजी घेतली जाईल. आज चौकशी अहवाल हाती येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी पवणीत कौर यांनी दिली.

.. यांनी ढाळले मगरीचे अश्रू

या संदर्भात भाजप खासदार अनिल बोंडे यांनी माजी पालकमंत्री काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर सडकून टीका केली. काल नाना पटोले व यशोमती ठाकूर यांनी मगरीचे अश्रू ढाळले. तत्कालीन पालकमंत्र्यांनी जिल्हा स्त्री रुग्णालयाचा सात कोटीचा प्रस्ताव मंजूर केला नाही.

या प्रस्तावावरील धूरदेखील त्यांनी साफ केली नाही. म्हणून हे सगळं घडलं. त्यांनी मगरीचे अश्रू ढाळले, अशी खरमरी टीका भाजप नेते अनिल बोंडे यांनी केली.

माजी पालकमंत्र्यांवर टीका

आमदार रवी राणा यांनी सुद्धा माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर त्यांच्यावर सडकून टीका केली. जिल्हा स्त्री रुग्णालयातील आग म्हणून कोरोना काळातील पाप आहे.
सात कोटीचा मंजूर प्रस्ताव मंजूर करायला महाविकास आघाडीला वेळ नव्हता. तत्कालीन पालकमंत्रीला जाग आली नाही. आता सहा महिन्यांत जिल्हा स्त्री रुग्णांची इमारत उभी होईल, असं आश्वासन रवी राणा यांनी दिलं.

इलेक्ट्रिक वायरिंग जुन्या

रुग्णालयात आगीच्या घटनेनंतर माजी पालकमंत्री व काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांनीही प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, रुग्णालयात मृत्यू झालेल्या शिशूचे मृत्यूचं कारण काय आहे हे पाहिलं पाहिजे. पण अशा घटना वारंवार होत आहेत, हे अतिशय दुर्दैवी आहे.
या ठिकाणी इमारती जुन्या आहे. इलेक्ट्रिक वायरिंग जुन्या आहेत. त्यावर भर टाकला पाहिजे. या ठिकाणी खूप कंप्लेंट आहेत. त्यामुळे सर्वांनी जबाबदारीने बघितलं पाहिजे. माहिती लपवण्याचा प्रयत्न केला असेल तर चुकीचं आहे.


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI